आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६.






 *शुभ कालावधी*


सकाळी ८.२२ ते सकाळी ९.२६ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.


सकाळी ९.२६ ते सकाळी १०.३१ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  

 

सकाळी १०.३१ ते सकाळी ११.३५ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 


दुपारी ११.३५ ते दुपारी १२.३९ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.


दुपारी १२.३९ ते दुपारी १.४४ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.


दुपारी १.४४ ते दुपारी २.४८ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.


दुपारी २.४८ ते दुपारी ३.५३- सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.


दुपारी ३.५३ ते दुपारी ४.५७ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


११ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर चंद्र आणि रवी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. या तारखेला एक विशिष्ट शक्ती प्राप्त झालेली आहे. तुम्हाला उपजतच वरच्या दर्जाची कल्पनाशक्ती आहे. उच्च ध्येयवाद आहे. तुमच्यात विद्युतशक्ती प्रमाणे स्पंदने असून इतरांना तुमच्याबद्दल विलक्षण आकर्षण वाटते. अनेक समारंभात तुम्हाला मनाचे स्थान प्राप्त होते. सूक्ष्म व गूढ गोष्टींकडे तुमचा ओढा असतो. तुमचा कारक ग्रह चंद्र असल्याने तुमच्याकडे मनाची सुप्त शक्ती आहे. पुढे होणाऱ्या घटनांचे आकलन तुम्हाला आधीच होऊ शकते. आयुष्यात सर्वसाधारण यश मिळते. प्रेमातही यश मिळते. तुम्ही मित्रांशी सच्चेपणाने वागतात. गुप्त शत्रूंपासून तुम्ही सावध राहिले पाहिजे. तुमच्यात प्रगल्भ कल्पनाशक्ती आहे. तुम्ही योग्य तर्हेने विचार करणारे, नि:स्वार्थी असून इतरांच्या भावनांची कदर करतात. कोणत्याही कामातील उद्दीष्ट न विसरता त्यातील सर्व बारीक सारीक गोष्टी तुम्ही त्यात उतरवतात. तुम्ही उत्तम सहकारी असतात. तुम्ही शास्त्रशुद्ध, व्यवस्थित आणि टापटीप असतात. तुम्ही स्वप्नाळू आणि एकांतात रमणारे आहात. तुमच्यात प्रतिष्ठा, मोठपण, कल्पकता, अधिकार या गोष्टी असतात. मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम आकलन होते. व्यवसायात तुम्ही सर्वोच्च पद गाठू शकतात. रंगमंच, सिनेमा, सहली यांचे तुम्हाला आकर्षण असते. तुमच्यात उत्स्फूर्त आणि उपजत कला असतात. तुमच्या वागण्यात रुबाब असतो. तुम्हाला भरपूर मित्र असतात आणि स्त्रियांपासून तुम्हाला फायदा होतो. तुम्ही लेखक म्हणून प्रसिद्धीस येतात. तुमचा भाग्योदय पाणथळ जागी होतो. लोकांच्या कल्याणाचा तुम्हाला ध्यास असतो. तुम्ही प्रेमळ आणि दयाळू आहात. तुम्हाला उपजतच वरच्या दर्जाची कल्पनाशक्ती आणि उच्च ध्येयवादअसतो. इतरांना तुमच्याबद्दल विलक्षण आकर्षण असते. समारंभात तुम्हाला मानाचा स्थान असते. सूक्ष्म आणि गूढ बाबींकडे तुमचा ओढा असतो.  मनाची सूक्ष्म शक्ती तुमच्याजवळ असते. पुढे घडणाऱ्या घटना अनेकदा तुमहाला आधीच समजतात. आयुष्यात सर्वसाधारण यश मिळते. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. गुप्त शत्रूंपासून सावध राहिले पाहिजे. तुम्ही मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या उच्च प्रतीचे आहात. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या मध्ये जबरदस्त कल्पनाशक्ती आहे. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याची तुम्ही प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे रूपांतर करू शकतात. तुम्ही विचारी आहात आणि निस्वार्थी तसेच विचारवंत देखील आहात. इतरांच्या भावनांचे तुम्ही कदर करतात. तुम्ही एक उत्तम सहकारी असतात. कोणत्याही कामाचे तुम्ही उद्दिष्ट विसरत नाहीत. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेला समाजापासून एकटे राहणे आणि स्वप्नात रंगणे आवडते. तुमच्यावर प्रतिष्ठा, कल्पकता आणि अधिकार असतो. मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम आकलन होते. कोणत्याही व्यवसाय मध्ये तुम्ही सर्वोच्च पद गाठू शकतात. तुम्हाला थिएटर्स, सहली, प्रवास, सिनेमा, भ्रमंती यांची आवड असते. तुमच्यामध्ये अनेक कला असतात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब असतो. तुम्ही लोकांना आकर्षित करून घेऊ शकतात.


व्यवसाय:-  संगीतकार, कथालेखक, कादंबरी लिखाण, पेंटिंग्स, कविता, नाट्यकृती लिहिणे, द्रव पदार्थ संबंधित व्यवसाय, ज्योतिषी, केमिस्ट, प्रयोगशाळा संबंधित व्यवसाय, दंतवैद्य, बँकिंग, सर्जरी.


शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पांढरा, निळा, बिस्किटी.


शुभ रत्न:- मोती आणि हिरा.

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त


साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.


डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६


बारसे - १,३,५,१५,१६,३०


जावळ - ५,९,२६,२७,२८.  


गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०


मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६

आषाढ कृष्ण चतुर्दशी. ग्रीष्म ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

(संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


"आज वर्ज्य दिवस आहे. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आवश्यक असल्यास शांतपणे व विचारपूर्वक निर्णय घ्यावेत."


चंद्रनक्षत्र - पुनर्वसू / सकाळी १०.१० नंतर पुष्य.

आज जन्मलेल्या बाळाची राशी - कर्क. (विष्टी आणि शकुनी करण शांती)  


चंद्र युती बुध.

चंद्र युती गुरू.

चंद्र लाभ शुक्र.

चंद्र लाभ हर्षल.

चंद्र त्रिकोण नेपच्यून.


टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

अनावश्यक वाद टाळा. महत्त्वाच्या कामात घाई करू नका. बुध-गुरू युतीमुळे योग्य सल्ला मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा.


वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. नवीन गुंतवणूक पुढे ढकलणे हिताचे ठरेल. संयम लाभदायक ठरेल.


मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

चंद्र-बुध युतीमुळे संवादकौशल्याचा चांगला उपयोग होईल. व्यापारी वर्गाला लाभाचे संकेत आहेत. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.


कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

राशीस्थानी चंद्र, बुध व गुरू यांच्या प्रभावामुळे आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.


सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

मानसिक शांतता राखा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रवास शक्यतो टाळावा. विश्रांतीला प्राधान्य द्या.


कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

मित्रांचे सहकार्य लाभेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील.


तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. संयमाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील.


वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. प्रवासात काळजी घ्या.


धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

आर्थिक व्यवहार सावधपणे करा. महत्त्वाची कागदपत्रे तपासूनच निर्णय घ्या. संयम आणि विवेक लाभदायक ठरेल.


मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नवीन योजना विचारपूर्वक राबवा. वाद टाळा.


कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. कामाचे योग्य नियोजन करा.


मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

चंद्र-शुक्र लाभ योगामुळे आर्थिक लाभाचे संकेत आहेत. चंद्र-हर्षल लाभ योगामुळे नवीन संधी मिळू शकतात. चंद्र-नेपच्यून त्रिकोणामुळे कल्पकता वाढेल, मात्र भावनिक निर्णय टाळा.


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

  8087520521

Comments