आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६. 






शुभ कालावधी


सकाळी ८.२२ ते सकाळी ९.२६ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.


सकाळी ९.२६ ते सकाळी १०.३१ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.


सकाळी १०.३१ ते सकाळी ११.३५ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  

 

सकाळी ११.३५ ते दुपारी १२.४० - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 


दुपारी १२.४० ते दुपारी १.४३ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.


दुपारी १.४३ ते दुपारी २.४८ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.


दुपारी २.४८ ते दुपारी ३.५२ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.


दुपारी ३.५२ ते दुपारी ४.५६ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


१३ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर हर्षल, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही हुशार असून तुमच्यात आपुलकीची भावना आहे. तुम्हाला शास्त्रीय पुस्तके आणि वाङ्मयीन वाचनाची  आवड आहे. तुम्ही सतत कार्यमग्न असतात. इतरांना तुमचा स्वभाव आणि सहवास मनापासून आवडतो. तुम्ही धोक्यांना सहजपणे तोंड देतात.तुम्ही उंच, दिसायला चांगले असून बुद्धिमान आणि हुशार लोकांमध्ये राहणे आवडते. तुमचा स्वभाव आटोपशीर आहे. आयुष्यात यश आणि कीर्ती झटपट मिळावी अशी अपेक्षा असते. आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान आहात. दृष्टीकोन व्यावहारिक असतो. इच्छाशक्ती तीव्र असते. धर्मादाय संस्था, अपंग संस्था यांसाठी काम करणे आवडते. भिन्न लिंगीव्यक्तीबद्दल जबरदस्त आकर्षण असते. स्वतःच्या कल्पना इतरांच्या मदतीने प्रत्यक्षात आणण्यात तुमचा हातखंडा असतो. तुमची शरीरयष्टी उंच असून डोळे सुंदर असतात. स्वभावात अस्थिरताअसते आणि काही वेळेस अकल्पनिय वागणे असते. भिन्न लिंगी व्यक्तींपासून तुम्हला फायदा होतो. कौटुंबिक जीवन सुखाचे असते. आयुष्यातील ४० नंतर भाग्योदय होतो. पूर्वार्ध कष्टाचा असतो. प्रेमात अनेक अडथळे येतात. आयुष्यात काही असाधारण घटना घडू शकतात. जीवनात अनेक बदल घडतात मित्र, मैत्रिणी देखील बदलत राहतात. स्वभाव चिकित्सक आणि तर्कनिष्ठ आहे. शास्त्रीय पुस्तके, वाङ्मय, याची तुम्हाला आवड आहे. वयाच्या ३१ नंतर तुमचा भाग्योदय होतो. तुम्ही स्वभावाने गरीब दिसत असलात तरी आतून तुम्ही हट्टी असतात. विचाराने स्वतंत्र असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या राहतात असावी असे तुम्हाला वाटते. तुमच्या योजना तुम्ही काटेकोरपणेआखतात आणि त्यात तुम्हाला यश येते. धोक्यांना सामोरे जाणे तुम्हाला आवडते. तुमच्यात मोठेपणा आणि प्रतिष्ठा असते. व्यवसायात तुम्ही मोठ्या पदावर जातात. तुम्ही उंच आणि देखणे असतात. उत्साह जोमाने प्रगती हे तुमचे वैशिष्ट्ये आहेत. तुमचे आयुष्य अनेक चळवळींनी भरलेले आहे. तुम्हाला अनपेक्षित गोष्टींचा नेहमी अनुभव येतो. तुमच्या मनाची पातळी वरच्या दर्जाची आहे. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्ही तुमचे स्वतःचे विचार इतरांवर लादत असतात. तुम्ही वादविवाद टाळले पाहिजेत. त्यामुळे गुप्त शत्रू निर्माण होत असतात आणि गैरसमज पसरत असतात. तुम्हाला थेटर्स, सिनेमा आणि भ्रमंती याची आवड असते. तुम्ही हरहुन्नरी आहात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब आहे. आणि तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडतात मात्र ते तुमच्या चांगल्यासाठीच असतात. परंपरा, रूढी आणि बंधने तुम्ही तोडून टाकतात. तुमच्या मध्ये मनाचा एककल्लीपणा जाणवतो. तुम्ही इतरांपुढे संपूर्ण व्यक्त होत नाहीत मात्र सर्व प्रकारच्या अडचणींवर तुम्ही सक्षमपणे मात करतात. न आवडणाऱ्या गोष्टींचा तुम्ही जोरदार विरोध करतात. तुमच्या विचारांमध्ये आग्रहीपणा आणि अट्टाहास असतो. तुम्ही सतत कार्य मग्न असतात.


व्यवसाय:-  यंत्रसामुग्री, विज्ञान, इलेक्ट्रिसिटी, वाहतूक यंत्रणा, इंजिनिअर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, संशोधन, कारखानदारी, हस्तसामुद्रिक, ज्योतिषी, अध्यात्म, बँकिंग सल्लागार.


शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शनिवार.


शुभ रंग:- निळा, पांढरा, मरून.


शुभ रत्न:- हिरा, पोवळे, मोती.

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त


साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.


डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६


बारसे - १,३,५,१५,१६,३०


जावळ - ५,९,२६,२७,२८.  


गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०


गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६

श्रावण शुक्ल प्रतिपदा. वर्षा ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आजचा दिवस चांगला असून महत्त्वाची कामे, आर्थिक व्यवहार आणि नवीन निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे."


नक्षत्र - मघा.

आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह. (वरिया योग, किंस्तुघ्न करण)


चंद्र लाभ मंगळ.

चंद्र केंद्र हर्षल.

बुध लाभ शुक्र.


टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

नवीन कामांना गती मिळेल. धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल.


वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक नियोजन यशस्वी होईल. दैनंदिन कामे सुरळीत पार पडतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.


मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

संवादकौशल्यामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. व्यापारी वर्गाला लाभ मिळेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील.


कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आरोग्य उत्तम राहील.


सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. चंद्र-मंगळ लाभ योगामुळे आर्थिक व व्यावसायिक प्रगतीची संधी मिळेल. चंद्र-हर्षल केंद्र योगामुळे नवीन संधी मिळतील. बुध-शुक्र लाभ योगामुळे संवादकौशल्य आणि संबंधातून लाभ होईल.


कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

संयमाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. घरगुती कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.


तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. लहान प्रवास लाभदायक ठरेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत.


वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

बोलण्यातील प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यवसायात प्रगती होईल. नवीन उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होतील.


धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.


मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

कामात अपेक्षित यश मिळेल. वरिष्ठांची कृपा राहील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नियोजनबद्ध कामातून लाभ मिळेल.


कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. मानसिक शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. संयमाने घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील.


मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. दिवस समाधानकारक जाईल.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521

Comments