पत्रकार असोसिएशन ऑफ कोल्हापूर आयोजित ‘ऐ मेरे वतन के लोगो’; देशभक्तीपर गीतांची अनोखी मानवंदना
कोल्हापूर १४ सिटी न्यूज नेटवर्क
स्वातंत्र्यदिनानिमित्त पत्रकार असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने देशभक्तीपर गीतांची मानवंदना देणारा ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हा विशेष लाईव्ह शो शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पत्रकार, राजकीय नेते, अधिकारी, पोलीस तसेच नागरिक एकाच मंचावर येऊन देशभक्तीपर गीते सादर करणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आवाजातून देशप्रेमाची भावना जागवणारी गीते सादर केली जाणार असून, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूरकरांना देशभक्तीच्या सुरांची अनोखी मेजवानी अनुभवता येणार आहे.
‘स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीतांची मानवंदना’ या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. संगीत आणि देशभक्तीचा सुंदर संगम असलेल्या या कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
देशभक्तीची भावना मनामनात जागवणाऱ्या या विशेष कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रम : ‘ऐ मेरे वतन के लोगो’
आयोजक : पत्रकार असोसिएशन ऑफ कोल्हापूर
दिनांक : १४ ऑगस्ट २०२६
वेळ : सायंकाळी ५ वाजता
स्थळ : राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर
कोल्हापूरकरांनो, देशभक्तीच्या सुरांमध्ये सहभागी व्हा आणि ‘ऐ मेरे वतन के लोगो’च्या माध्यमातून भारतमातेला संगीतमय मानवंदना द्या!
अधिक माहितीसाठी संपर्क : 9146746565, 9657778006, 9637192290, 9423801280, , 7038819900

Comments
Post a Comment