आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 शनिवार, १५ ऑगस्ट २०२६



शुभ कालावधी


सकाळी ८.२२ ते सकाळी ९.२६ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.


सकाळी ९.२६ ते सकाळी १०.३१ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.


सकाळी १०.३१ ते सकाळी ११.३५ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.


सकाळी ११.३५  ते दुपारी १२.४० - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  

 

दुपारी १२.४० ते दुपारी १.४४ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 


दुपारी १.४४ ते दुपारी २.४७ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.


दुपारी २.४७ ते दुपारी ३.५१ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.


दुपारी ३.५१ ते संध्याकाळी ४.५५ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


१५ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर शुक्र, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही जबाबदारीच्या जागा पैलू शकतात. तुमचा स्वभाव महत्वाकांक्षी आहे. गूढ विद्यांची आवड असते. तुमचे घर, संसार आणि मित्र यांच्याबद्दल अत्यन्त आपुलकी असते. भाषणे, लेखन, रेडिओ वरील श्रुतिका यात तुम्हाला यश मिळते. तुम्ही वरून शांत दिसतात मात्र आतून अस्वस्थ असतात. तडजोड करत नाहीत. तुमची स्मरणशक्ती चांगली असते. तुम्ही निष्कारण काळजी करतात. 


     तुम्ही कलाकार आणि कलाप्रिय आहात. बोलण्यात आकर्षकपणा असल्याने इतर लोक तुमच्याकडे ओढले जातात. तुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. सामाजिक रूढी तुम्ही मानत नाहीत. पैसे खर्च करण्याची वृत्ती असते. आपले आयुष्य आरामदायक आणि आनंदात जावे याकडे तुमचा कल असतो. तुमच्या कामाबद्दल प्रशंसा झाली तगर ते काम करण्यात तुम्हाला विशेष आनंद मिळतो. वृत्ती अभ्यासू असते.


व्यवसाय: गृहसजावट, जवाहिर, संगीतकार हॉटेल मॅनेजनमेंट, जमीन खरेदी -विक्री.


शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.


शुभ रंग: निळा, गुलाबी.


शुभ रत्ने:- पाचू, मोती, हिरा.

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त


साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.


डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६


बारसे - १,३,५,१५,१६,३०


जावळ - ५,९,२६,२७,२८.  


गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८


शनिवार, १५ ऑगस्ट २०२६

श्रावण शुक्ल तृतीया / चतुर्थी. वर्षा ऋतू.

पराभव नाम संवत्सर – शके १९४८ – संवत २०८२


चंद्र – सिंह राशीत / सकाळी ९.३५ नंतर कन्या राशीत

नक्षत्र – उत्तरा फाल्गुना.


राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

संपर्क – 8087520521


राहुकाळ – सकाळी ९.०० ते १०.३०


आज आनंदी दिवस आहे. *स्वातंत्र्य दिवस* दर शनिवारी पिंपळ, शनी, मारुती, नृसिंह पूजन करावे.


ग्रहयोग –

चंद्र केंद्र मंगळ.

चंद्र त्रिकोण हर्षल.

चंद्र प्रतियुती नेपच्यून.

बुध युती गुरू.


विशेष: शनिवार – शनिदेवाचा दिवस. संयम, शिस्त आणि कर्तव्यभावनेने कार्य केल्यास उत्तम यश मिळेल. बुध-गुरू युतीमुळे ज्ञान, नियोजन आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. महत्त्वाची कामे शांतपणे आणि नियोजनपूर्वक पूर्ण करा.


मेष (Aries)

धाडस आणि आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाची संधी मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

उपाय: हनुमान चालीसाचे पठण करा.


वृषभ (Taurus)

घरातील वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी कामात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल.

उपाय: शनिदेवाला काळे तीळ अर्पण करा.


मिथुन (Gemini)

बुध-गुरू युतीमुळे बौद्धिक कार्यात यश मिळेल. संवादकौशल्यामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. प्रवास लाभदायक ठरेल.

उपाय: श्रीगणेशाला दूर्वा अर्पण करा.


कर्क (Cancer)

आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नियोजनबद्ध कामातून यश मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.

उपाय: भगवान शिवाचे नामस्मरण करा.


सिंह (Leo)

सकाळी ९.३५ पर्यंत राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. त्यानंतर कामात अधिक शिस्त व नियोजन आवश्यक राहील. महत्त्वाची कामे सकाळी पूर्ण करणे लाभदायक ठरेल.

उपाय: सूर्याला अर्घ्य द्या.


कन्या (Virgo)

सकाळी ९.३५ नंतर राशीस्थानी चंद्र आल्याने आत्मविश्वास वाढेल. चंद्र-मंगळ केंद्र योगामुळे कार्यक्षमता वाढेल, तर चंद्र-हर्षल त्रिकोण योगामुळे नवीन संधी मिळतील.

उपाय: विष्णू सहस्रनामाचा जप करा.


तुळ (Libra)

मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक व्यवहारात लाभ मिळेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील.

उपाय: महालक्ष्मीची उपासना करा.


वृश्चिक (Scorpio)

संयमाने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांची कृपा राहील.

उपाय: भगवान शिवाला जल अर्पण करा.


धनु (Sagittarius)

भाग्याची साथ लाभेल. धार्मिक व शैक्षणिक कार्यात यश मिळेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.

उपाय: गुरू मंत्राचा जप करा.


मकर (Capricorn)

कामातील अडचणी दूर होतील. आर्थिक नियोजन यशस्वी होईल. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

उपाय: शनिदेवाला तेल अर्पण करा.


कुंभ (Aquarius)

नवीन कल्पना यशस्वी ठरतील. स्पर्धात्मक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. मानसिक उत्साह वाढेल.

उपाय: गरजू व्यक्तींना अन्नदान करा.


मीन (Pisces)

चंद्र-नेपच्यून प्रतियुतीमुळे भावनिक निर्णय टाळा. बुध-गुरू युतीमुळे योग्य सल्ला आणि ज्ञानाचा लाभ होईल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल.

उपाय: भगवान विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा.


– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

संपर्क – 8087520521

Comments