आजचे राशीभविष्य
रविवार, १६ ऑगस्ट २०२६
. *शुभ कालावधी*
सकाळी ८.२२ ते सकाळी ९.२६ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
सकाळी ९.२६ ते सकाळी १०.३१ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
सकाळी १०.३१ ते सकाळी ११.३५ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
सकाळी ११.३५ ते दुपारी १२.३८ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.
दुपारी १२.३८ ते दुपारी १.४४ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
दुपारी १.४४ ते दुपारी २.४७ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
दुपारी २.४७ ते दुपारी ३.५१ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.
दुपारी ३.५१ ते दुपारी ४.५५ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
१६ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर नेपच्यून रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही भावनाप्रधान आणि हळवे आहात. जितक्या लवकर तुम्ही अस्वस्थ होतात तितक्याच लवकर तुम्ही शांत होतात. इतरांची लुडबुड तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात सहन होत नाही. प्रकृतीची सतत कुरबुर चालू असते. तसे तुम्हीं शांतताप्रिय आहात. तुम्हाला कष्टाची कामेआवडत नाहीत.तुम्हला कलेत रमणे, निसर्ग, सहली, सिनेमा, नाटक यांची आवड आहे. वैवाहिक जीवनात काहीतरी न्यून जाणवत असते. मनात सदैव खळबळ चालू असते. तुम्ही मनाने विशाल असून जीवनाचे तुम्हाला उत्तम ज्ञान असते. तुम्ही मुलत: स्वतंत्र विचाराचे आहात. दूरवरच्या प्रदेशांबद्दल तुम्हाला आवड असल्याने तुमचा परदेश किंवा दूर देशाशी संबंध येतो. तुमच्यामध्ये अहंकार आहे. तुम्हाला आध्यात्मिक लाभ होतात. कधी कधी तुमचे विचार हट्टी आणि आग्रह होतात त्यामुळे इतरांच्या विचारांची उपेक्षा केले जाते. तुम्ही उत्तम पैसा कमवू शकतात. धर्माविषयी तुमच्या कल्पना चमत्कारिक असतात. ठराविक चाकोरीत वावरणे तुम्हाला आवडत नाही. तुम्ही निसर्गात: अस्वस्थ असतात. तुम्ही भावनाप्रधान असतात आणि तुमच्या भावना तुम्ही मित्रांकडे व्यक्त करत नाहीत. तुम्हाला उच्च प्रतीच्या लोकांमध्ये मिसळणे आवडते. स्वतःचे ज्ञान आणि अधिकार्याची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुम्ही उत्तम सल्लागार असतात. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात. तुमच्या वागण्यात नियमित पणा आणि पद्धतशीर पण आहे. तुम्ही इतरांना उत्साह आणि चांगला सल्ला देतात. तुमचे व्यक्तिमत्व धीर गंभीर आहे. इतरांना तुमच्याबद्दल आदर वाटतो. मनाने तुम्ही मोकळ्या आहात. आणि तुमच्या कृतीमध्ये एक प्रकारचा मुक्तपणा आहे. तुमच्यावर निर्बंध लादल्यास तुम्ही बंडखोरी करतात.
व्यवसाय:- आयात निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, केमिकल्स, सुगंधी द्रव्य, वैद्यकीय क्षेत्र.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.
शुभ रंग:- हिरवा आणि निळा.
शुभ रत्न:- पुष्कराज आणि पाचू.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त
साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.
डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६
बारसे - १,३,५,१५,१६,३०
जावळ - ५,९,२६,२७,२८.
गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.
रविवार, १६ ऑगस्ट २०२६
श्रावण शुक्ल चतुर्थी / पंचमी. वर्षा ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
राहुकाळ - सायंकाळी ४.३० ते ६.००
आज संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस आहे. महत्त्वाची कामे, आर्थिक व्यवहार आणि नवीन योजना संध्याकाळी ५.०० नंतर सुरू केल्यास अधिक अनुकूल ठरतील. *विनायकी चतुर्थी, दुर्वा गणपती व्रत, ऋक हिरण्यकेशी श्रावणी, नागचतुर्थी (उपवास)*
नक्षत्र - हस्त.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या.
चंद्र लाभ बुध.
चंद्र लाभ गुरू.
चंद्र युती शुक्र.
चंद्र प्रतियुती शनी.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
संध्याकाळी ५ नंतर महत्त्वाची कामे पूर्ण करा. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. आत्मविश्वास वाढेल.
वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. चंद्र-शुक्र युतीमुळे सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. आर्थिक व्यवहारात यश मिळेल.
मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
चंद्र-बुध लाभ योगामुळे संवादकौशल्याचा उत्तम लाभ मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल.
कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.
सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास वाढेल. चंद्र-बुध व चंद्र-गुरू लाभ योगामुळे ज्ञान, आर्थिक लाभ आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. चंद्र-शुक्र युतीमुळे मान-सन्मान व कौटुंबिक सुख मिळेल. चंद्र-शनी प्रतियुतीमुळे भावनिक तणाव टाळून संयमाने वागा.
तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
भागीदारीच्या कामात लाभ मिळेल. बोलण्याचा प्रभाव वाढेल. नवीन संपर्क भविष्यात फायदेशीर ठरतील.
वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळा.
धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रवासाचे योग संभवतात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. भाग्याची साथ मिळेल.
मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. संयमाने काम करा.
कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. दिवस समाधानकारक जाईल.
मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
धार्मिक आणि सर्जनशील कार्यात प्रगती होईल. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. संध्याकाळी ५ नंतर महत्त्वाची कामे करणे लाभदायक ठरेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521

Comments
Post a Comment