आजचे राशीभविष्य
बुधवार, १९ ऑगस्ट २०२६
शुभ कालावधी
सकाळी ८.२३ ते सकाळी ९.२७ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
सकाळी ९.२७ ते सकाळी १०.३० - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.
सकाळी १०.३० ते सकाळी ११.३४ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
सकाळी ११.३४ ते दुपारी १२.३८ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
दुपारी १२.३८ ते दुपारी १.४२ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.
दुपारी १.४२ ते दुपारी २.४५ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
दुपारी २.४५ ते दुपारी ३.४९ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
दुपारी ३.४९ ते दुपारी ४.५३ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त
साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.
डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६
बारसे - १,३,५,१५,१६,३०
जावळ - ५,९,२६,२७,२८.
गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०
१९ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यात भरपूर उत्साह आहे. कोणताही विषय ठराविक पद्धतीने हाताळणे तुम्हाला आवडते. शास्त्र, संशोधन, शोध प्रबंध यात तुम्हाला रस असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः आणि त तेही झटपट घेतात. विविध मैदानी खेळांची आवड असते. तुम्ही अत्यंत उतावीळ असतात. इतरांची सिक्रेटस तुम्ही जपून ठेवतात. त्याचा गैरवापर किंवा उच्चार करत नाहीत. तुम्ही यशस्वी, प्रामाणिक आहेत. मात्रतुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. बोलण्यापेक्षा लेखनातून तुम्हीं अधिक चांगले व्यक्त होऊ शकतात. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि ज्ञानामुळे इतरांच्या मनात तुमच्याबद्दल आदराची भावना निर्माण होते. वडील, सासरे, बायको, आई इत्यादी नातेवाईकांच्या मुळे तुम्हाला आर्थिक फायदा होतो. वयाच्या 46 व्या वर्षापासून तुम्हाला यश मिळते. तुम्ही नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत असतात आणि तुम्हाला धंद्यातही यश मिळते. तुम्ही प्रामाणिक आहात. स्वतःच्या विचारशक्तीमुळे आणि स्वभाव वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला कीर्ती मिळते किंवा कधी कधी अपकर्ती देखील होऊ शकते. तुमचे आरोग्य चांगले असते आणि आजारपणातून तुम्ही लवकर बरे होतात. तुम्ही चाकोरीच्या बाहेर जाऊन इतरांना मदत करतात. मात्र तुम्हाला तसेच सहकार्य मिळेलच असे नाही. तुम्ही अत्यंत कल्पक, चपळ, उत्साही आणि कला प्रिय आहात. तुम्हाला निसर्गाची आवड आहे. जीवनातला आनंद तुम्ही उपभोगत असतात. तुमचा स्वभाव काहीसा संशयी आहे आणि निर्णय घेण्यास तुम्हाला वेळ लागतो. तुम्ही समाजाच्या सर्व थरामध्ये सहज मिसळू शकतात. अनेकदा तुम्हाला एकटेपणा जाणवतो. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. बऱ्याच विषयाचे तुम्हाला चटकन आकलन होते. तुम्ही बुद्धिमान आहात आणि सभा संमेलना तुम्ही गाजवू शकतात. तुमची इच्छा शक्ती जबरदस्त आहे. तुमच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत. तुम्ही आशावादी असतात. कधी कधी तुम्ही अधिक काटकसरी आणि व्यवहारिक होतात. दुराग्रही स्वभाव, इतरांवर टीका करणे आणि त्यांचे दोष दाखवणे तुम्ही टाळले पाहजे.
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शक, मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, कॅन्टीन, बँकिंग, सेल्स मॅनेजर, पुस्तक विक्रेता, आणि आयात निर्यात अधिकारी.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, मंगळवार.
शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, जांभळा.
शुभ रत्न:- माणिक, पुष्कराज, अंबर.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
बुधवार, १९ ऑगस्ट २०२६
श्रावण शुक्ल सप्तमी / संध्याकाळी ७.२० नंतर अष्टमी. वर्षा ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क – 8087520521
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
आजचा दिवस चांगला आहे. आज शीतला सप्तमी आहे. सकाळी ६.४७ नंतर विशाखा नक्षत्र सुरू होईल. विशाखा नक्षत्र वर्ज्य असल्याने या काळात महत्त्वाची कामे शक्यतो टाळावीत. इतर वेळेत विचारपूर्वक केलेली कामे यशस्वी होण्याची शक्यता आहे.
नक्षत्र – स्वाती / सकाळी ६.४७ नंतर विशाखा.
चंद्र राशी – तूळ.
चंद्र केंद्र बुध.
टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
कामात प्रगती होईल. चंद्र-बुध केंद्र योगामुळे संवादकौशल्याचा चांगला उपयोग होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवा.
वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन संधी मिळतील. प्रवासात काळजी घ्या आणि महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका.
मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
चंद्र-बुध केंद्र योगामुळे बुद्धिमत्ता आणि संवादकौशल्य वाढेल. विद्यार्थी आणि व्यापारी वर्गासाठी दिवस अनुकूल आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील.
कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मानसिक शांतता राखून काम करा.
सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल.
कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
आर्थिक नियोजन यशस्वी होईल. कामातील अडचणी दूर होतील. बौद्धिक कार्यात प्रगती होईल. महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.
तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास वाढेल. चंद्र-बुध केंद्र योगामुळे विचारशक्ती आणि निर्णयक्षमता चांगली राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक कार्यातून मानसिक समाधान मिळेल.
धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भागीदारीच्या कामात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे.
मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास कामे वेळेत पूर्ण होतील.
कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. नवीन कल्पनांचा योग्य उपयोग करता येईल. सर्जनशील कार्यात यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.
मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क – 8087520521

Comments
Post a Comment