आजचे राशीभविष्य
गुरुवार, २० ऑगस्ट २०२६.
शुभ कालावधी
सकाळी ८.२३ ते सकाळी ९.२७ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
सकाळी ९.२७ ते सकाळी १०.३१ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.
सकाळी १०.३१ ते सकाळी ११.३५ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
सकाळी ११.३५ ते दुपारी १२.३८ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
दुपारी १२.३८ ते दुपारी १.४१ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
दुपारी १.४१ ते दुपारी २.४५ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.
दुपारी २.४५ ते दुपारी ३.४९ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
दुपारी ३.४९ ते दुपारी ४.५२ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त
साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.
डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६
बारसे - १,३,५,१५,१६,३०
जावळ - ५,९,२६,२७,२८.
गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०
२० ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र आणि रवी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला भरपूर मित्र असतात आणि स्त्रियांपासून तुम्हाला फायदा होतो. तुम्ही लेखक म्हणून प्रसिद्धीस येतात. तुमचा भाग्योदय पाणथळ जागी होतो. लोकांच्या कल्याणाचा तुम्हाला ध्यास असतो. तुम्ही प्रेमळ आणि दयाळू आहात. तुम्हाला उपजतच वरच्या दर्जाची कल्पनाशक्ती आणि उच्च ध्येयवादअसतो. इतरांना तुमच्याबद्दल विलक्षण आकर्षण असते. समारंभात तुम्हाला मानाचा स्थान असते. सूक्ष्म आणि गूढ बाबींकडे तुमचा ओढा असतो. मनाची सूक्ष्म शक्ती तुमच्याजवळ असते. पुढे घडणाऱ्या घटना अनेकदा तुमहाला आधीच समजतात. आयुष्यात सर्वसाधारण यश मिळते. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. गुप्त शत्रूंपासून सावध राहिले पाहिजे. तुम्ही मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या उच्च प्रतीचे आहात. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या मध्ये जबरदस्त कल्पनाशक्ती आहे. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याची तुम्ही प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे रूपांतर करू शकतात. तुम्ही विचारी आहात आणि निस्वार्थी तसेच विचारवंत देखील आहात. इतरांच्या भावनांचे तुम्ही कदर करतात. तुम्ही एक उत्तम सहकारी असतात. कोणत्याही कामाचे तुम्ही उद्दिष्ट विसरत नाहीत. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेला समाजापासून एकटे राहणे आणि स्वप्नात रंगणे आवडते. तुमच्यावर प्रतिष्ठा, कल्पकता आणि अधिकार असतो. मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम आकलन होते. कोणत्याही व्यवसाय मध्ये तुम्ही सर्वोच्च पद गाठू शकतात. तुम्हाला थिएटर्स, सहली, प्रवास, सिनेमा, भ्रमंती यांची आवड असते. तुमच्यामध्ये अनेक कला असतात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब असतो. तुम्ही लोकांना आकर्षित करून घेऊ शकतात.
व्यवसाय:- संगीतकार, कथालेखक, कादंबरी लिखाण, पेंटिंग्स, कविता, नाट्यकृती लिहिणे, द्रव पदार्थ संबंधित व्यवसाय, ज्योतिषी, केमिस्ट, प्रयोगशाळा संबंधित व्यवसाय, दंतवैद्य, बँकिंग, सर्जरी.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, बिस्किटी.
शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
गुरुवार, २० ऑगस्ट २०२६
श्रावण शुक्ल अष्टमी / नवमी. वर्षा ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००
"सकाळी ९.०० नंतरचा दिवस चांगला आहे. महत्त्वाची कामे, आर्थिक व्यवहार आणि नवीन निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. सकाळी ९.०० पूर्वी महत्त्वाची कामे शक्यतो टाळावीत." दुर्गाष्टमी.
नक्षत्र - विशाखा / सकाळी ९.०८ नंतर अनुराधा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक.
रवी केंद्र चंद्र.
चंद्र प्रतियुती हर्षल.
चंद्र त्रिकोण नेपच्यून.
टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
कामात प्रगती होईल. सकाळी ९.०० नंतर महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक व्यवहारातून लाभ होण्याची शक्यता आहे. अनावश्यक घाई टाळा.
वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संवादकौशल्यामुळे कामे पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला लाभ मिळेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.
कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नवीन जबाबदारी मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
कामात उत्साह राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे.
कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
आर्थिक व्यवहारात फायदा होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. नियोजनपूर्वक काम केल्यास यश मिळेल.
तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
भागीदारीच्या कामात प्रगती होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन योजना यशस्वी ठरतील. आर्थिक नियोजनावर भर द्या.
वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास वाढेल. चंद्र-हर्षल प्रतियुतीमुळे मनात अचानक बदल होऊ शकतात, त्यामुळे घाईचे निर्णय टाळा. चंद्र-नेपच्यून त्रिकोणामुळे कल्पकता वाढेल. संयमाने काम केल्यास यश मिळेल.
धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्याची साथ लाभेल. धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात प्रगती होईल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. प्रवास लाभदायक ठरू शकतो.
मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल.
कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. मानसिक समाधान लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. नवीन संधींचा योग्य उपयोग करा.
मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. चंद्र-नेपच्यून त्रिकोणामुळे कल्पक विचारांना चालना मिळेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521

Comments
Post a Comment