आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६.





 शुभ कालावधी


सकाळी ८.२२ ते सकाळी ९.२७ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 


सकाळी ९.२७ ते सकाळी १०.३० - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.


सकाळी १०.३० ते सकाळी ११.३५  - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.


दुपारी ११.३५ ते दुपारी १२.३७ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.


दुपारी १२.३७ ते दुपारी १.४१ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.


दुपारी १.४१ ते दुपारी २.४५ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.


दुपारी २.४५ ते दुपारी ३.४८ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  


दुपारी ३.४८ ते दुपारी ४.५२ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त


साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.


डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६


बारसे - १,३,५,१५,१६,३०


जावळ - ५,९,२६,२७,२८.  


गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०


२१ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर गुरु रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही एक प्रेमळ आणि दयाळू पिता असतात. आयुष्यत उशिरा प्रसिद्धी आणि सुख मिळते. तुम्ही अत्यंत गुणवान आहात मात्र स्वभाव संशयी आहे. मान - पान बद्दल तुम्ही जास्त संवेदनशील असतात. तुमच्यात अधिकार वृत्ती, महत्वाकांक्षा, उत्स्फूर्तपणा आणि पोकळ दिखाऊ वृत्ती असते. एकांतवास आवडतो. जीवनाचा आनंद उपभोगता. भिन्न लिंगी व्यक्तीचे आकर्षण असते. तुम्ही मनाने हळुवार आणि संवेदनशील असतात. तुम्ही ध्येयवादी आहात. एक उत्तम व्यवस्थापक आणि प्रशासक असतात.कला, साहित्य, मनोरंजन आणि विज्ञान याची तुम्हाला आवड असते. तुम्ही साहित्य निर्मिती आणि कथा लेखक बनू शकतात. तुम्ही शुद्ध प्रेम असणारे, नैतिक, कायदा प्रेमी, दयावान, न्यायी आणि परोपकारी आहात. इतरांना मदत करणे तुम्हाला आवडते. तुम्ही इतरांशी उत्तम संवाद साधू शकतात. दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी तुम्ही स्वतः मेहनत घेतात. तुम्ही धार्मिक आहात मात्र भावनाशील नाहीत. तुम्ही संयमी आहात. सहसा भावनेच्या आहारी जात नाहीत. तुमच्यामध्ये अफाट इच्छाशक्ती आणि उत्साह आहे. कामामध्ये सातत्य असते. तुम्ही प्रत्येक प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडवतात. स्वतःचे काम स्वतः करणे तुम्हाला आवडते. त्या कामात इतरांनी ढवळाढवळ केलेली चालत नाही. तुम्ही शक्यतो एकटे राहतात. बुद्धिमान व्यक्तींकडे तुमचा ओढा असतो. जीवनात तुम्ही यशस्वी होतात. तुम्ही न्यायाधीश, धर्मगुरू, तत्त्वज्ञानी, शिक्षक होऊ शकतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. दिखाउपणाची जराशी तुम्हाला आवड असते. मनाने तुम्ही तरुण असतात आणि वृत्तीने आनंदी असतात. मैदानी खेळांची तुम्हाला आवड आहे. तुम्ही मनाने उदार आणि सहिष्णू आहात. इतरांचा द्वेष करणे, मत्सर करणे तुम्हाला आवडत नाही. तुमचा गैरफायदा इतरांनी घेऊ नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे.


व्यवसाय:-  न्यायमूर्ती, सेक्रेटरी, राजदूत, मुत्सद्दी, उच्चपदस्थ अधिकारी, संरक्षण खाते, प्राध्यापक, धार्मिक प्रवचनकार, डॉक्टर, शिक्षक, मोल्डिंग, तेल गिरण्या, शेती, जंगल, कारखाने, लाकूड, खनिज द्रव्य, खाद्यपदार्थ.


शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.


शुभ रत्न:- पुष्कराज, लसण्या, अमेथीस्ट.

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६


श्रावण शुक्ल नवमी / दशमी. वर्षा ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


"आज वर्ज्य दिवस असून वैधरुती योग आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे, मोठे आर्थिक व्यवहार आणि नवीन निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. आवश्यक कामे असल्यास शांतपणे आणि विचारपूर्वक करावीत."


नक्षत्र - अनुराधा / सकाळी ११.५३ नंतर ज्येष्ठ.

आज जन्मलेल्या बाळाची राशी - वृश्चिक.


चंद्र त्रिकोण गुरू.

चंद्र लाभ शुक्र.

चंद्र त्रिकोण शनी.

शुक्र प्रतियुती शनी.


टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

कामात संयम ठेवा. वर्ज्य दिवस असल्याने महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकला. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.


वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.


मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

कामात प्रगती होईल, मात्र महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. संवादातून गैरसमज दूर होतील. व्यापारी वर्गाने आर्थिक व्यवहार जपून करावेत.


कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. चंद्र-गुरू त्रिकोणामुळे योग्य मार्गदर्शन मिळेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. आरोग्याची काळजी घ्या.


सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन काम सुरू करण्याची घाई करू नका. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे.


कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. आर्थिक नियोजनावर भर द्या. अनुभवी व्यक्तींचा सल्ला लाभदायक ठरेल. अनावश्यक खर्च टाळा.


तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

मित्रांचे सहकार्य मिळेल. चंद्र-शुक्र लाभ योगामुळे आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सामाजिक संपर्कातून फायदा होईल. मात्र मोठे आर्थिक निर्णय पुढे ढकलणे हिताचे.


वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

राशीस्थानी चंद्रामुळे मनात चंचलता राहू शकते. चंद्र-गुरू आणि चंद्र-शनी त्रिकोणामुळे योग्य मार्गदर्शन व संयम मिळेल. शुक्र-शनी प्रतियुतीमुळे आर्थिक व कौटुंबिक विषयात सावधगिरी बाळगा.


धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

भाग्याची साथ मिळेल, पण वर्ज्य दिवस असल्याने महत्त्वाची कामे पुढे ढकलणे योग्य ठरेल. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. अनुभवी व्यक्तींचा सल्ला लाभेल.


मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

कामात शिस्त आणि संयम ठेवा. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. जुन्या कामांना गती देण्यासाठी दिवस उपयोगी ठरेल.


कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन कल्पना सुचतील. सामाजिक संपर्क वाढतील. मात्र नवीन मोठे निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचा नीट विचार करा.


मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

चंद्र-गुरू त्रिकोणामुळे आत्मविश्वास वाढेल. चंद्र-शुक्र लाभ योगामुळे आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सर्जनशील कार्यात प्रगती होईल. भावनिक निर्णय टाळा.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521

Comments