आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 रविवार, २३ ऑगस्ट २०२६. 



*शुभ कालावधी*


सकाळी ८.२३ ते सकाळी ९.२७ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  

 

सकाळी ९.२७ ते सकाळी १०.३१ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 


सकाळी १०.३१ ते सकाळी ११.३३ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.


सकाळी ११.३३ ते दुपारी १२.३८ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.



दुपारी १२.३८ ते दुपारी १.४० - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.


दुपारी १.४० ते दुपारी २.४४ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.


दुपारी २.४४ ते दुपारी ३.४७ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.


दुपारी ३.४७ ते दुपारी ४.५१ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त


साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.


डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६


बारसे - १,३,५,१५,१६,३०


जावळ - ५,९,२६,२७,२८.  


गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०


२३ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर बुध, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. तुमची स्वतःची स्वतंत्र विचार पद्धती असते. तुम्ही दयाळू आणि स्वातंत्र्य प्रिय असतात. बोलण्यात हुशार असतात. घरातील दुर्बल व्यक्तीची तुंचायवर जबाबदारी असते. इतरांवरहुकूमतगाजवणे तुम्हाला आवडते. तुम्ही कठोर स्वभावाचे असतात आणि इतरांवर टीका करतात. तुम्ही उंच आणि देखणे आहात. इतरांनातुम्ही दुखावत नाहीत.स्त्रिया सुखी असतात मात्र संतती होताना त्रास होऊ शकतो.कोडे सोडवण्याचा, लॉटरी आणि जुगार याचा छंद असू शकतो. इतरांची तुमच्यावर भक्ती असते. तुम्ही मितभाषी असतात.  तुम्ही अत्यंत हुशार, बुद्धिमान, संशोधक, शास्त्राची आवड असणारे, व्यापारी वृत्तीचे आणि व्यवहार चतुर असतात. तुमच्या व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्हाला आळशी पण आवडत नाही. कोणत्याही कामाच्या तुम्ही उत्तम पूर्व नियोजन करतात. अवघड परिस्थितीतून बाहेर कसे पडावे याचे तुम्हाला आपोआप मार्गदर्शन मिळते. तुमच्यात कधी कधी नैराश्य आणि अस्वस्थपणा येतो मात्र तो लवकरच निघून जातो. मनाने तुम्ही विशाल आहात. तुम्हाला थेटर्स, सिनेमा आणि सहली यांची आवड आहे. तुम्ही उत्तमपणे प्रशिक्षण वर्ग चालवू शकतात. निसर्गाशी एकरूप होऊन त्याचा आनंद लुटणे तुम्हाला आवडते. तुमच्यामध्ये अनेक कला असतात. तुमची वृत्ती साशंक असते. तुमची चटकन खात्री होत नाही आणि विश्वास बसत नाही. तुम्ही नेहमीच सावध असतात. तुम्ही महत्त्वाकांक्षा आणि उत्साह आहात. हुशार आणि बुद्धिमान लोकांकडे तुमचा ओढा असतो. धर्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांची तुम्हाला आवड असते.


व्यवसाय:-  बँकिंग वैद्यकीय क्षेत्र संशोधन गणित कंपनी सेक्रेटरी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र केमिस्ट


शुभ दिवस:- बुधवार शुक्रवार शनिवार


शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा


शुभ रत्न:- पाचवा आणि हिरा

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


रविवार, २३ ऑगस्ट २०२६


श्रावण शुक्ल एकादशी. वर्षा ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521


राहुकाळ - सायंकाळी ४.३० ते ६.००


आज दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे. महत्त्वाची कामे, आर्थिक व्यवहार आणि नवीन योजना दुपारी ३.०० पूर्वी पूर्ण करणे अधिक अनुकूल ठरेल. त्यानंतर महत्त्वाचे निर्णय शक्यतो टाळून शांतपणे व विचारपूर्वक काम करावे. पुत्रदा एकादशी असल्याने भगवान विष्णूची उपासना, व्रत आणि धार्मिक कार्यासाठी दिवस विशेष अनुकूल आहे.


नक्षत्र - मूळ / संध्याकाळी ५.४५ नंतर पूर्वाषाढा.

आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु.


चंद्र प्रतियुती मंगळ.

चंद्र केंद्र नेपच्यून.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

दुपारी ३.०० पूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करा. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रांचे सहकार्य लाभेल. चंद्र-मंगळ प्रतियुतीमुळे घाईघाईने निर्णय घेणे टाळा.


वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. आर्थिक नियोजनातून फायदा होईल. दुपारपूर्वी महत्त्वाचे व्यवहार पूर्ण करणे योग्य ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा.


मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

कामात प्रगती होईल. संवादकौशल्याचा योग्य उपयोग करा. व्यापारी वर्गाला लाभाचे संकेत आहेत. नवीन योजना दुपारी ३.०० पूर्वी राबवणे फायदेशीर ठरेल.


कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. भावनिक निर्णय टाळा.


सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.


कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

आर्थिक व्यवहारात लाभ मिळू शकतो. रखडलेली कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नियोजनपूर्वक काम करा आणि अनावश्यक वाद टाळा.


तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

भागीदारीच्या कामात लाभ मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. आर्थिक व्यवहार दुपारी ३.०० पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.


वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

कामात उत्साह राहील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. चंद्र-मंगळ प्रतियुतीमुळे धाडस वाढेल, मात्र आक्रमकपणा टाळा. आरोग्याची काळजी घ्या.


धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास वाढेल. चंद्र-मंगळ प्रतियुतीमुळे उत्साह आणि कार्यक्षमता वाढेल, पण घाईचे निर्णय टाळा. चंद्र-नेपच्यून केंद्रामुळे कल्पनाशक्ती वाढेल. दुपारी ३.०० पूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करा.


मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेताना वास्तवाचा विचार करा.


कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन कल्पना सुचतील. चंद्र-नेपच्यून केंद्रामुळे भावनिक निर्णय टाळून विवेकाने वागा.


मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. दुपारी ३.०० पूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करणे लाभदायक ठरेल.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521

Comments