आजचे राशीभविष्य
सोमवार, २४ ऑगस्ट २०२६.
शुभ कालावधी
सकाळी ८.२३ ते सकाळी ९.२७ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, नवीन व्यवसाय सुरुवात, शुभ कामे, घर खरेदी, धार्मिक विधी, तीर्थयात्रा.
सकाळी ९.२७ ते सकाळी १०.३० - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, ऑपरेशन्स, औषध योजना, रासायनिक पृथक्करण.
सकाळी १०.३० ते सकाळी११.३३ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे, उच्च शिक्षण, सरकारी कामे, कायदा, व्यवस्थापन.
सकाळी ११.३३ ते दुपारी १२.३७ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, वाहन खरेदी, कपडे, आभूषणे, चैनीच्या वस्तू खरेदी, गृहसजावट, वास्तू, महागड्या वस्तूंची खरेदी, सहल.
दुपारी १२.३७ ते दुपारी १.४० - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण, मोबाइल खरेदी, संगणक, ट्रान्सपोर्ट वाहन खरेदी, कायदा, वकिली, रसायने, विमा पोलिसी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रसिद्धी, अँप्स बनवणे.
दुपारी १.४० ते दुपारी २.४३ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता, रत्ने खरेदी, संगीत, प्रेम, नातेसंबंध.
दुपारी २.४३ ते दुपारी ३.४७ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग, देणे फेडणे, पूर्वजांचे स्मरण, माघार घेणे, तह, शांतता करार,
दुपारी ३.४७ ते दुपारी ४.५० - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, नवीन व्यवसाय सुरुवात, शुभ कामे, घर खरेदी, धार्मिक विधी, तीर्थयात्रा.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त
साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.
डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६
बारसे - १,३,५,१५,१६,३०
जावळ - ५,९,२६,२७,२८.
गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०
२४ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शुक्र रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. उच्च पदस्थ लोकांकडून मदत कशी मिळवायची हे तुम्हाला चांगले जमते. तुमचा विवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो. त्यानंतर भाग्योदय होतो. आपल्या भवती सुंदर आणि चांगल्या गोष्टी सदैव असाव्यात असे तुम्हाला वाटते. खाजगी जीवनात आणि सामाजिक जीवनात तुम्ही अंतर राखतात. शिकणे आणि शिकवणे यांची आवड असते. तुम्ही जबाबदारीच्या जागा पेलू शकतात. तुम्ही अति महत्वाकांक्षा बाळगणारे आहात. गूढ विद्यांची आवड आहे. शांत दिसतात पण आतून अस्वस्थ असतात. धडपड्या आणि बढाईखोर स्वभाव आहे. घर, बायको, संसार याबाबत अत्यंत हळवे आणि संवेदनशील आहात. भाषणे, लेखन, श्रुतिका यात यश मिळते. विनाकारण काळजी करणे तुम्ही सोडून दिले पाहिजे. तुम्ही प्रेमळ आहात तसेच कलाकार आणि कला प्रिय देखील आहात. तुमच्या वागण्यात, बोलण्यात एक प्रकारचा आकर्षकपणा आणि मोहक पण आहे. इतरांना तुमच्याबद्दल आकर्षण वाटते. रूढी परंपरा याबद्दलच्या तुमच्या कल्पना जरा वेगळा असून इतरांना त्या लवकर समजत नाहीत. तुमची वृत्ती खर्चिक आहे. तुमच्या आयुष्य आरामदायक, श्रीमंत, आनंदात जाते. इतरांच्या आदरास तुम्ही पात्र असतात. तुमचे मन विशाल आहे. व्यवसायामध्ये तुम्ही उच्च पदावर जातात. सिनेमा नाटक यांचे तुम्हाला आवड आहे. तुम्हाला जर मान सन्मान मिळाला तर तुम्ही खुश होतात आणि अधिक चांगले नेतृत्व करतात. इतरांनी कौतुक न केल्यास तुमचा विरस होतो. तुम्ही अत्यंत अभ्यासू वृत्तीचे आहात. वृत्तीने तुम्ही गंभीर असतात आणि तुमचा मित्रपरिवार फार जास्त नसतो. आयुष्यात तुम्हाला एकटेपणाची जाणीव होत राहते. तुम्ही उत्साही आणि महत्त्वाकांक्षा असून तुमच्या कामात सातत्य आहे. अहंगंड आणि इतरांवर स्वतःची मते लादणे टाळावे.
व्यवसाय:- गृह सजावट. दागिने विक्री, संगीतज्ञ, हॉटेल मॅनेजर, मिठाईचा व्यवसाय, जमीन खरेदी विक्री, तयार कपडे, कॉस्मेटिक्स, सुवासिक अत्तरे.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.
शुभ रंग:- निळा, गुलाबी.
शुभ रत्न:- पाचू, मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
सोमवार, २४ ऑगस्ट २०२६.
श्रावण शुक्ल द्वादशी. वर्षा ऋतू.
पराभव नाम संवत्सर, शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
राहूकाळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र व राशी
नक्षत्र - पूर्वाषाढा / (रात्री ८.२८ नंतर) उत्तराषाढा
राशी - धनु.
भागवत एकादशी.
आजचा दिवस
"आज उत्तम दिवस आहे." धार्मिक, आध्यात्मिक आणि शुभ कार्यांसाठी दिवस अनुकूल आहे.
ग्रहयोग
चंद्र केंद्र शुक्र
चंद्र केंद्र शनी
टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष :-
आजचा दिवस उत्साहवर्धक राहील. भाग्याची उत्तम साथ मिळेल. धार्मिक व आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाची कामे पूर्ण होतील.
वृषभ :-
आर्थिक बाबतीत दिवस समाधानकारक राहील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. महत्त्वाचे निर्णय घेताना व्यवहारिक दृष्टिकोन ठेवा.
मिथुन :-
कामाच्या ठिकाणी प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागू शकते. संपर्क आणि संवादातून महत्त्वाचे काम साध्य होईल.
कर्क :-
भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रवासाचे योग संभवतात. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सिंह :-
आर्थिक व्यवहारांसाठी दिवस चांगला आहे. अचानक लाभाची संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन संपर्क उपयोगी ठरतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. मन प्रसन्न राहील.
कन्या :-
कामाचा वेग वाढेल. चंद्र-शुक्र योगामुळे आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. सौंदर्य, कला व सर्जनशील क्षेत्रातील व्यक्तींना चांगल्या संधी मिळतील.
तुळ :-
नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. नवीन जबाबदारी मिळू शकते. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
वृश्चिक :-
आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. मनातील एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. नवीन संपर्क भविष्यात लाभदायक ठरतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.
धनु :-
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष अनुकूल आहे. नवीन योजना सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासाचे योग संभवतात.
मकर :-
खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्याकडे ओढ राहील. काही महत्त्वाच्या गोष्टींचा शांतपणे विचार कराल. परदेश किंवा दूरच्या प्रवासासंबंधी हालचाली होऊ शकतात.
कुंभ :-
मित्रांचे व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील. सामाजिक संपर्क वाढतील. एखादी महत्त्वाची योजना मार्गी लागेल.
मीन :-
कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील व्यक्तींकडून आनंदाची बातमी मिळू शकते.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
संपर्क - 8087520521


Comments
Post a Comment