ॲड. पी आर मुंडरगी स्मृति महाराष्ट्र राज्य महिला निवड बुद्धिबळ स्पर्धापुण्याची निहिरा कौल अजिंक्य.

 ॲड. पी आर मुंडरगी स्मृति महाराष्ट्र राज्य महिला निवड बुद्धिबळ स्पर्धापुण्याची निहिरा कौल अजिंक्य.. 



सांगलीची श्रेया हिप्परगी उपविजेती तर पुण्याची श्रावणी उंडाळे तृतीय* 


 कोल्हापूर २९ सिटी न्यूज नेटवर्क 

- ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम येथे चेस असोसिएशन कोल्हापूर ने आयोजित केलेल्या ॲड. पी आर मुंडरगी स्मृति एचटूई महाराष्ट्र राज्य महिला निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ  स्पर्धा आज संपन्न झाल्या.

आज झालेल्या अंतिम आठव्या फेरीनंतर अग्रमानांकित पुण्याच्या निहिरा कौलने आठ पैकी  सात गुण मिळवून अजिंक्यपद मिळविले. तिला रोख 15000 व चषक देऊन गौरविण्यात आले. द्वितीय मानांकित सांगलीची श्रेया हिप्परगी ने साडेसहा गुण व 42 टायब्रेक गुणासह उपविजेतेपद  पटकाविले तिला 13000 रुपये व चषक देऊन गौरविले. पुण्याची श्रावणी उंडाळे साडेसहा गुण व 37 टायब्रेक गुण घेत तृतीय स्थान संपादिले तिला रोख दहा हजार व चषक देऊन सन्मानित केले. कोल्हापूरची दिशा पाटील ने सहा गुण व साडे सदतीस टायब्रेक गुणासह चौथे स्थान मिळविले तिला रोख 9000 रुपये व चषक प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजी नगरची भूमिका वागळे ला सहा गुण व 37 टायब्रेक गुणासह पाचवे स्थान मिळाले तिला रोख सात हजार रुपया चे बक्षीस मिळाले.

 स्पर्धेचा बक्षीस समारंभ इंजिनिअरिंग असोसिएशन कोल्हापूरचे उपाध्यक्ष व युवा उद्योजक श्रीकांत दुधाणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉक्टर दीपक आंबर्डेकर, उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी संचालक नंदकुमार मराठे,संतोष कोडोलीकर, पूजा जोशी अनुराधा गोसावी व वृषाली कुलकर्णी स्पर्धेच्या मुख्य आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर  चेस असोसिएशन कोल्हापूरचे भरत चौगुले, मनीष मारुलकर, धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे, प्रीतम घोडके, अनिश गांधी व आरती मोदी उपस्थित होते.

इतर बक्षीस विजेते

6) सई पाटील पुणे 7) वृतिका गमे नागपूर  8) सानिया तडवी जळगाव 9) प्रीषा मरगज मुंबई  10) ईश्वरी जगदाळे सांगली.

*उत्तेजनार्थ बक्षीस :-*

 *पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट:-* तन्मय घाटे सातारा, संस्कृती सुतार कोल्हापूर

 *तेरा वर्षाखालील उत्कृष्ट :-* प्रणिता भावा मुंबई, सान्वी गोरे सोलापूर 

 *अकरा वर्षाखालील उत्कृष्ट:-* नित्या बंग मुंबई, शिवन्या तत्ते पुणे  

 *नऊ वर्षाखालील उत्कृष्ट:-* आदिना मोहन्ती पुणे, ओवी घावटे पुणे  

 *सात वर्षाखालील उत्कृष्ट:-* सानवी खोत कोल्हापूर

तेलंगणा येथे 18 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय महिला निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी पुढील चार बुद्धिबळपटूंची निवड महाराष्ट्र संघात केली आहे. 1) निहिरा कौल पुणे  2) श्रेया हिप्परगी सांगली  3) श्रावणी उंडाळे पुणे  4) दिशा पाटील कोल्हापूर

Comments