आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६


शुभ कालावधी


सकाळी ८.२३ ते सकाळी ९.२७ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, वाहन खरेदी, कपडे, आभूषणे, चैनीच्या वस्तू खरेदी, गृहसजावट, वास्तू, महागड्या वस्तूंची खरेदी, सहल, नृत्य, करमणूक.


सकाळी ९.२७ ते सकाळी १०.३० - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण, मोबाइल खरेदी, संगणक, ट्रान्सपोर्ट वाहन खरेदी, कायदा, वकिली, रसायने, विमा पोलिसी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रसिद्धी, अँप्स बनवणे,   


सकाळी १०.३० ते सकाळी  ११.३३ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता, रत्ने खरेदी, संगीत,  प्रेम, नातेसंबंध.


सकाळी ११.३३ ते दुपारी १२.३६ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग, देणे फेडणे, पूर्वजांचे स्मरण, माघार घेणे, तह, शांतता करार, 


दुपारी १२.३६ ते दुपारी १.४० - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, नवीन व्यवसाय सुरुवात, शुभ कामे, घर खरेदी, धार्मिक विधी, तीर्थयात्रा.


दुपारी १.४० ते दुपारी २.४३ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, ऑपरेशन्स, औषध योजना, रासायनिक पृथक्करण.


दुपारी २.४३ ते दुपारी ३.४६ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे, उच्च शिक्षण, सरकारी कामे, कायदा, व्यवस्थापन.


दुपारी ३.४६ ते दुपारी ४.५० - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, वाहन खरेदी, कपडे, आभूषणे, चैनीच्या वस्तू खरेदी, गृहसजावट, वास्तू, महागड्या वस्तूंची खरेदी, सहल, नृत्य, करमणूक.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त


साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.


डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६


बारसे - १,३,५,१५,१६,३०


जावळ - ५,९,२६,२७,२८.  


गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०


२५ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर नेपच्यून रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला प्रवासाची आवड आहे. परदेशाशी संबंध येतो. तुम्ही प्रामाणिक, निष्ठावान आहात. स्वभाव विश्वासू पण चंचल आहे. वक्तृत्व चांगले असते. तुम्ही एक उत्तम शिक्षक होऊ शकतात. उत्तम स्मरणशक्तीचे वरदान लाभले आहे. तुम्ही भावनाप्रधान आणि हळवे आहात. जितक्या लवकर तुम्ही अस्वस्थ होतात तितक्याच लवकर तुम्ही शांत होतात. इतरांची लुडबुड तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात सहन होत नाही. प्रकृतीची सतत कुरबुर चालू असते. तसे तुम्हीं शांतताप्रिय आहात. तुम्हाला कष्टाची कामेआवडत नाहीत.तुम्हला कलेत रमणे, निसर्ग, सहली, सिनेमा, नाटक यांची आवड आहे. वैवाहिक जीवनात काहीतरी न्यून जाणवत असते. मनात सदैव खळबळ चालू असते. तुम्ही मनाने विशाल असून जीवनाचे तुम्हाला उत्तम ज्ञान असते. तुम्ही मुलत: स्वतंत्र विचाराचे आहात. दूरवरच्या प्रदेशांबद्दल तुम्हाला आवड असल्याने तुमचा परदेश किंवा दूर देशाशी संबंध येतो. तुमच्यामध्ये अहंकार आहे. तुम्हाला आध्यात्मिक लाभ होतात. कधी कधी तुमचे विचार हट्टी आणि आग्रह होतात त्यामुळे इतरांच्या विचारांची उपेक्षा केले जाते. तुम्ही उत्तम पैसा कमवू शकतात. धर्माविषयी तुमच्या कल्पना चमत्कारिक असतात. ठराविक चाकोरीत वावरणे तुम्हाला आवडत नाही. तुम्ही निसर्गात: अस्वस्थ असतात. तुम्ही भावनाप्रधान असतात आणि तुमच्या भावना तुम्ही मित्रांकडे व्यक्त करत नाहीत. तुम्हाला उच्च प्रतीच्या लोकांमध्ये मिसळणे आवडते. स्वतःचे ज्ञान आणि अधिकार्‍याची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुम्ही उत्तम सल्लागार असतात. तुमचे विचार तर्कशुद्ध असतात. तुमच्या वागण्यात नियमित पणा आणि पद्धतशीर पण आहे. तुम्ही इतरांना उत्साह आणि चांगला सल्ला देतात. तुमचे व्यक्तिमत्व धीर गंभीर आहे. इतरांना तुमच्याबद्दल आदर वाटतो. मनाने तुम्ही मोकळ्या आहात. आणि तुमच्या कृतीमध्ये एक प्रकारचा मुक्तपणा आहे. तुमच्यावर निर्बंध लादल्यास तुम्ही बंडखोरी करतात. ज्ञान उथळ असते.


व्यवसाय:-  आयात निर्यात, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, केमिकल्स, सुगंधी द्रव्य, वैद्यकीय क्षेत्र.


शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार.


शुभ रंग:- हिरवा आणि निळा.


शुभ रत्न:- पुष्कराज आणि पाचू.

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६


श्रावण शुक्ल त्रयोदशी. वृद्धी तिथी. वर्षा ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


"आज चांगला दिवस आहे."


चंद्रनक्षत्र - उत्तराषाढा / रात्री १०.५१ नंतर श्रवण.

राशी - मकर.

भौम प्रदोष.


रवी षडाष्टक चंद्र.

चंद्र त्रिकोण हर्षल.

चंद्र लाभ नेपच्यून.


टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)

कार्यक्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक नियोजनात सुधारणा होईल. महत्त्वाच्या कामांसाठी दिवस अनुकूल आहे.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)

आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत आहेत. चंद्र-हर्षल योगामुळे अचानक एखादी चांगली संधी मिळू शकते. व्यवसायातील नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.


कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)

वैवाहिक आणि भागीदारीच्या क्षेत्रात सकारात्मक घडामोडी होतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाच्या चर्चेतून चांगले निष्कर्ष मिळतील.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)

कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. मात्र मेहनतीचे चांगले फळ मिळेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. दुपारनंतर परिस्थिती अधिक अनुकूल होईल.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)

मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. नवीन संपर्क भविष्यात उपयोगी ठरतील. सर्जनशील कार्यात यश मिळेल. एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.


तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)

घरगुती आणि कौटुंबिक विषयांकडे लक्ष द्यावे लागेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. अचानक खर्च होऊ शकतो. मानसिक शांततेसाठी विश्रांती घेणे आवश्यक राहील. संयमाने वागल्यास दिवस समाधानकारक जाईल.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)

पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. चंद्र-हर्षल योगामुळे नवीन कल्पना सुचतील. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायात नवीन संधी मिळतील. भावंडांचे सहकार्य लाभेल.


धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. बोलण्यातून महत्त्वाची कामे साध्य होतील. नवीन खरेदीचा योग संभवतो. सामाजिक संपर्क वाढतील.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)

राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. नवीन योजना आणि कल्पना यशस्वी ठरतील. चंद्र-हर्षल योगामुळे अचानक लाभदायक संधी मिळू शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष अनुकूल आहे.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)

खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. गुप्त लाभाचे संकेत आहेत. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)

मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नोकरी-व्यवसायात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521.

Comments