आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६. 




*शुभ कालावधी*


सकाळी ८.२२ ते सकाळी ९.२६ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 


सकाळी ९.२६ ते सकाळी १०.३० - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.



सकाळी १०.३० ते सकाळी ११.३५  - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.


दुपारी ११.३५ ते दुपारी १२.४० - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.


दुपारी १२.४० ते दुपारी १.४३ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.


दुपारी १.४३ ते दुपारी २.४७ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.


दुपारी २.४७ ते दुपारी ३.५१ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  


दुपारी ३.५१ ते दुपारी ४.५६ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


१४ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर बुध, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही दिसायला चांगले असून लोकप्रिय आहात. दुसर्यांना 'न' दुखवण्याचा स्वभाव आहे. इतरांना सहकार्य देण्याचा कल असतो. कोडे सोडवण्याचा छंद असतो. तुमचे व्यक्तिमत्व धीरगंभीर असून आदरास पात्र  असते.लोकांची तुमच्यावर भक्ती असते. शब्दात अन कृतित ठामपणा असतो. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. तुमची स्वतःची स्वतंत्र विचार पद्धती असते. तुम्ही दयाळू आणि स्वातंत्र्य प्रिय असतात. बोलण्यात हुशार असतात. घरातील दुर्बल व्यक्तीची तुंचायवर जबाबदारी असते. इतरांवरहुकूमतगाजवणे तुम्हाला आवडते. तुम्ही कठोर स्वभावाचे असतात आणि इतरांवर टीका करतात. तुम्ही उंच आणि देखणे आहात. इतरांनातुम्ही दुखावत नाहीत.स्त्रिया सुखी असतात मात्र संतती होताना त्रास होऊ शकतो.कोडे सोडवण्याचा, लॉटरी आणि जुगार याचा छंद असू शकतो. इतरांची तुमच्यावर भक्ती असते. तुम्ही मितभाषी असतात.  तुम्ही अत्यंत हुशार, बुद्धिमान, संशोधक, शास्त्राची आवड असणारे, व्यापारी वृत्तीचे आणि व्यवहार चतुर असतात. तुमच्या व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्हाला आळशी पण आवडत नाही. कोणत्याही कामाच्या तुम्ही उत्तम पूर्व नियोजन करतात. अवघड परिस्थितीतून बाहेर कसे पडावे याचे तुम्हाला आपोआप मार्गदर्शन मिळते. तुमच्यात कधी कधी नैराश्य आणि अस्वस्थपणा येतो मात्र तो लवकरच निघून जातो. मनाने तुम्ही विशाल आहात. तुम्हाला थेटर्स, सिनेमा आणि सहली यांची आवड आहे. तुम्ही उत्तमपणे प्रशिक्षण वर्ग चालवू शकतात. निसर्गाशी एकरूप होऊन त्याचा आनंद लुटणे तुम्हाला आवडते. तुमच्यामध्ये अनेक कला असतात. तुमची वृत्ती साशंक असते. तुमची चटकन खात्री होत नाही आणि विश्वास बसत नाही. तुम्ही नेहमीच सावध असतात. तुम्ही महत्त्वाकांक्षा आणि उत्साह आहात. हुशार आणि बुद्धिमान लोकांकडे तुमचा ओढा असतो. धर्म, तत्त्वज्ञान, ज्योतिष यांची तुम्हाला आवड असते.


व्यवसाय:-  बँकिंग वैद्यकीय क्षेत्र संशोधन गणित कंपनी सेक्रेटरी भौतिकशास्त्र रसायनशास्त्र केमिस्ट


शुभ दिवस:- बुधवार शुक्रवार शनिवार


शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा


शुभ रत्न:- पाचवा आणि हिरा

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त


साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.


डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६


बारसे - १,३,५,१५,१६,३०


जावळ - ५,९,२६,२७,२८.  


गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६

श्रावण शुक्ल द्वितीया / तृतीया. वर्षा ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


"आज उत्तम दिवस असून महत्त्वाची कामे, आर्थिक व्यवहार, नवीन योजना आणि शुभ कार्यांसाठी अनुकूल वेळ आहे."


नक्षत्र - पूर्वा फाल्गुना.

आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह. (परीघ योग)


टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

नवीन कामांना चांगली सुरुवात होईल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रांचे सहकार्य लाभेल.


वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. दैनंदिन कामे सुरळीत पूर्ण होतील. मान-सन्मान वाढेल.


मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

संवादकौशल्यामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. व्यवसायात नवीन संधी मिळतील. प्रवास लाभदायक ठरेल.


कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.


सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजना यशस्वी ठरतील.


कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

विचारपूर्वक निर्णय घेतल्यास लाभ होईल. घरगुती कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.


तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आर्थिक व्यवहारात यश मिळेल. नवीन संपर्क लाभदायक ठरतील.


वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

बोलण्यातील प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यवसायात प्रगती होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभाची शक्यता आहे.


धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन संधी मिळतील. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.


मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

कामातील अडचणी दूर होतील. वरिष्ठांची कृपा लाभेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नियोजनबद्ध कामातून यश मिळेल.


कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

नवीन कल्पना यशस्वी ठरतील. स्पर्धात्मक क्षेत्रात प्रगती होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. मानसिक उत्साह वाढेल.


मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सर्जनशील कार्यात प्रगती होईल. दिवस आनंददायी आणि समाधानकारक जाईल.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521

Comments