आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६.


 शुभ कालावधी


सकाळी ८.२४ ते सकाळी ९.२७ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 


सकाळी ९.२७ ते सकाळी १०.३० - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.


सकाळी १०.३० ते सकाळी ११.३३  - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.


दुपारी ११.३३ ते दुपारी १२.३५ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.


दुपारी १२.३५ ते दुपारी १.३८ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.


दुपारी १.३८ ते दुपारी २.४१ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.


दुपारी २.४१ ते दुपारी ३.४४ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  


दुपारी ३.४४ ते दुपारी ४.४७ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 


दुपारी ४.४७ ते संध्याकाळी ५.५० - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त


साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.


डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६


बारसे - १,३,५,१५,१६,३०


जावळ - ५,९,२६,२७,२८.  


गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०


२८ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही उदार आणि निस्वार्थी आहात. शाळा, शैक्षणिक संस्था, दवाखाने या सारख्या सामाजिक संस्थांत काम करणे तुम्हाला मनापासून आवडते. काही वेळी तुमचे वैयकीत आणि सामाजिक जीवनातअडचणी येतात. त्यासाठी तुम्ही योग्य सल्ला घेतला पाहिजे. जीवनाचा साथीदार निवडताना अत्यंत सजग असले पाहिजे. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुमच्यात भरपूर उत्साह आहे. कोणताही विषय ठराविक पद्धतीने हाताळणे तुम्हाला आवडते. शास्त्र, संशोधन, शोध प्रबंध यात तुम्हाला रस असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतः आणि त तेही झटपट घेतात. विविध मैदानी खेळांची आवड असते. तुम्ही अत्यंत उतावीळ असतात. इतरांची सिक्रेटस तुम्ही जपून ठेवतात. त्याचा गैरवापर किंवा उच्चार करत नाहीत. तुम्ही यशस्वी, प्रामाणिक आहेत. मात्रतुम्हाला समजून घेणे इतरांना कठीण जाते. बोलण्यापेक्षा लेखनातून तुम्हीं अधिक चांगले व्यक्त होऊ शकतात. तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि ज्ञानामुळे इतरांच्या मनात तुमच्याबद्दल आदराची भावना निर्माण होते. वडील, सासरे, बायको, आई इत्यादी नातेवाईकांच्या मुळे तुम्हाला आर्थिक फायदा होतो. वयाच्या 46 व्या वर्षापासून तुम्हाला यश मिळते. तुम्ही नोकरीत चांगल्या पदावर कार्यरत असतात आणि तुम्हाला धंद्यातही यश मिळते. तुम्ही प्रामाणिक आहात. स्वतःच्या विचारशक्तीमुळे आणि स्वभाव वैशिष्ट्यांमुळे तुम्हाला कीर्ती मिळते किंवा कधी कधी अपकर्ती देखील होऊ शकते. तुमचे आरोग्य चांगले असते आणि आजारपणातून तुम्ही लवकर बरे होतात. तुम्ही चाकोरीच्या बाहेर जाऊन इतरांना मदत करतात. मात्र तुम्हाला तसेच सहकार्य मिळेलच असे नाही. तुम्ही अत्यंत कल्पक, चपळ, उत्साही आणि कला प्रिय आहात. तुम्हाला निसर्गाची आवड आहे. जीवनातला आनंद तुम्ही उपभोगत असतात. तुमचा स्वभाव काहीसा संशयी आहे आणि निर्णय घेण्यास तुम्हाला वेळ लागतो. तुम्ही समाजाच्या सर्व थरामध्ये सहज मिसळू शकतात. अनेकदा तुम्हाला एकटेपणा जाणवतो. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. बऱ्याच विषयाचे तुम्हाला चटकन आकलन होते. तुम्ही बुद्धिमान आहात आणि सभा संमेलना तुम्ही गाजवू शकतात. तुमची इच्छा शक्ती जबरदस्त आहे. तुमच्यामध्ये नेतृत्व गुण आहेत.  तुम्ही आशावादी असतात. कधी कधी तुम्ही अधिक काटकसरी आणि व्यवहारिक होतात. दुराग्रही स्वभाव, इतरांवर टीका करणे आणि त्यांचे दोष दाखवणे तुम्ही टाळले पाहजे.


व्यवसाय:-   जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शक, मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, कॅन्टीन, बँकिंग, सेल्स मॅनेजर, पुस्तक विक्रेता, आणि आयात निर्यात अधिकारी.


शुभ दिवस:- रविवार, सोमवार, मंगळवार.


शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, जांभळा.


शुभ रत्न:- माणिक, पुष्कराज, अंबर.

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६


श्रावण पौर्णिमा. वर्षा ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521


राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००


"आज उत्तम दिवस आहे."


चंद्रनक्षत्र - शततारका.

राशी - कुंभ.

अतिगंड योग.

रक्षाबंधन. वरदलक्ष्मी व्रत.


रवी प्रतियुती चंद्र.

रवी केंद्र हर्षल.

चंद्र त्रिकोण मंगळ.

चंद्र प्रतियुती बुध.

चंद्र केंद्र हर्षल.

बुध केंद्र हर्षल.


टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)

पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. चंद्र-मंगळ त्रिकोणामुळे धाडसी निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. नवीन योजना यशस्वी होतील. प्रवासाचे योग संभवतात.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)

आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत आहेत. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. नवीन खरेदीचा योग संभवतो. बोलताना संयम ठेवा. महत्त्वाचे व्यवहार विचारपूर्वक पूर्ण करा.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)

राशीस्वामी बुधाच्या प्रभावामुळे बौद्धिक कार्यात यश मिळेल. शिक्षण, लेखन आणि व्यवसायात प्रगती होईल. बुध-हर्षल योगामुळे नवीन कल्पना सुचतील. अचानक एखादी चांगली संधी मिळू शकते.


कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)

घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्ता आणि घरासंबंधी कामे मार्गी लागतील. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. मानसिक समाधान मिळेल.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)

भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या चर्चा यशस्वी होतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नवीन करार आणि व्यावसायिक संबंध लाभदायक ठरतील.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)

कामाचा ताण वाढू शकतो. मात्र चंद्र-मंगळ त्रिकोणामुळे मेहनतीने अडथळ्यांवर मात कराल. नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.


तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)

मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रात नवीन संपर्क निर्माण होतील. सर्जनशील कार्यात यश मिळेल. एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)

कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. चंद्र-मंगळ त्रिकोणामुळे निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. मान-सन्मान वाढेल.


धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. गुरूजनांचे मार्गदर्शन लाभेल. नवीन योजना भविष्यात लाभदायक ठरतील.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)

आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. नवीन संधी मिळतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. महत्त्वाचे निर्णय घेताना व्यवहारिक दृष्टिकोन ठेवा.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)

राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. चंद्र-मंगळ त्रिकोणामुळे उत्साह आणि पराक्रम वाढेल. चंद्र-हर्षल योगामुळे अचानक लाभदायक संधी मिळू शकते. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)

खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. गुप्त लाभाची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या.


कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521.

Comments