आजचे राशीभविष्य
शनिवार, २९ ऑगस्ट २०२६.
![]() |
शुभ कालावधी
सकाळी ८.२४ ते सकाळी ९.२६ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
सकाळी ९.२६ ते सकाळी १०.३० - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
सकाळी १०.३० ते सकाळी ११.३२- शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.
सकाळी ११.३२ ते दुपारी १२.३५ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
दुपारी १२.३५ ते दुपारी १.३८ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
दुपारी १.३८ ते दुपारी २.४१ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
दुपारी २.४१ ते दुपारी ३.४४ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.
दुपारी ३.४४ ते संध्याकाळी ४.४७ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
दुपारी ४.४७ ते संध्याकाळी ५.५० - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त
साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.
डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६
बारसे - १,३,५,१५,१६,३०
जावळ - ५,९,२६,२७,२८.
गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०
२९ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र आणि रवी या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही इतरांना सहकार्य करतात मात्र त्यामागे इतर अनेक उद्देश असतात. तुम्ही इतरांना सहजपणे समजून घेतात त्यामुळे सर्वत्र तुमचे कौतुक होते. आयुष्यात धोका पत्करण्याची तुमची तयारी असते. तुम्ही धाडसी आणि धीट आहात. मात्र कामात सातत्य नसते. घराबद्दल तुम्हाला विल्सखान ओढ असते. संसारात मतभेद होऊ शकतात. तुमचे आयुष्य अत्यंत उलढालीचे असते. तुम्हाला भरपूर मित्र असतात आणि स्त्रियांपासून तुम्हाला फायदा होतो. तुम्ही लेखक म्हणून प्रसिद्धीस येतात. तुमचा भाग्योदय पाणथळ जागी होतो. लोकांच्या कल्याणाचा तुम्हाला ध्यास असतो. तुम्ही प्रेमळ आणि दयाळू आहात. तुम्हाला उपजतच वरच्या दर्जाची कल्पनाशक्ती आणि उच्च ध्येयवादअसतो. इतरांना तुमच्याबद्दल विलक्षण आकर्षण असते. समारंभात तुम्हाला मानाचा स्थान असते. सूक्ष्म आणि गूढ बाबींकडे तुमचा ओढा असतो. मनाची सूक्ष्म शक्ती तुमच्याजवळ असते. पुढे घडणाऱ्या घटना अनेकदा तुमहाला आधीच समजतात. आयुष्यात सर्वसाधारण यश मिळते. मित्रांशी तुम्ही प्रामाणिक असतात. गुप्त शत्रूंपासून सावध राहिले पाहिजे. तुम्ही मानसिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या उच्च प्रतीचे आहात. तुम्ही ध्येयवादी असून तुमच्या मध्ये जबरदस्त कल्पनाशक्ती आहे. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याची तुम्ही प्रत्यक्षात चांगल्या प्रकारे रूपांतर करू शकतात. तुम्ही विचारी आहात आणि निस्वार्थी तसेच विचारवंत देखील आहात. इतरांच्या भावनांचे तुम्ही कदर करतात. तुम्ही एक उत्तम सहकारी असतात. कोणत्याही कामाचे तुम्ही उद्दिष्ट विसरत नाहीत. तुमच्यामध्ये व्यवस्थितपणा आणि टापटीप आहे. तुम्हाला बऱ्याच वेळेला समाजापासून एकटे राहणे आणि स्वप्नात रंगणे आवडते. तुमच्यावर प्रतिष्ठा, कल्पकता आणि अधिकार असतो. मानवी जीवनाचे तुम्हाला उत्तम आकलन होते. कोणत्याही व्यवसाय मध्ये तुम्ही सर्वोच्च पद गाठू शकतात. तुम्हाला थिएटर्स, सहली, प्रवास, सिनेमा, भ्रमंती यांची आवड असते. तुमच्यामध्ये अनेक कला असतात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब असतो. तुम्ही लोकांना आकर्षित करून घेऊ शकतात.
व्यवसाय:- संगीतकार, कथालेखक, कादंबरी लिखाण, पेंटिंग्स, कविता, नाट्यकृती लिहिणे, द्रव पदार्थ संबंधित व्यवसाय, ज्योतिषी, केमिस्ट, प्रयोगशाळा संबंधित व्यवसाय, दंतवैद्य, बँकिंग, सर्जरी.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, बिस्किटी.
शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
शनिवार, २९ ऑगस्ट २०२६
श्रावण कृष्ण प्रतिपदा / द्वितीया. वर्षा ऋतू.
पराभव नाम संवत्सर – शके १९४८ – संवत २०८२.
चंद्र – कुंभ राशीत / रात्री ९.३८ नंतर मीन.
नक्षत्र – पूर्वाभाद्रपदा.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
संपर्क – 8087520521
राहुकाळ – सकाळी ९.०० ते १०.३०
"आज चांगला दिवस आहे."
टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)
भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. चंद्र-हर्षल योगामुळे नवीन संधी अचानक उपलब्ध होऊ शकतात. महत्त्वाच्या चर्चेत सकारात्मक निष्कर्ष मिळतील.
वृषभ (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)
कामाचा ताण वाढू शकतो, परंतु मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक नियोजनावर भर द्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल.
मिथुन (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)
विद्यार्थी आणि बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक दिवस आहे. चंद्र-नेपच्यून योगामुळे कल्पनाशक्ती वाढेल. नवीन कल्पना आणि सर्जनशील कार्याला चांगला प्रतिसाद मिळेल.
कर्क (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)
संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील. सर्जनशील कार्यात यश मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राहील.
सिंह (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)
घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. घरासंबंधी एखादी महत्त्वाची योजना मार्गी लागू शकते.
कन्या (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)
पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रवासातून लाभ संभवतो. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. महत्त्वाची कामे नियोजनपूर्वक पूर्ण करा.
तुळ (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)
आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन खरेदीचा योग संभवतो. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)
आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. काही जुन्या गोष्टींचा विचार मनात येईल. संयमाने वागा.
धनु (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)
मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन संपर्क भविष्यात फायदेशीर ठरतील.
मकर (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)
कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल.
कुंभ (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. चंद्र-हर्षल लाभ योगामुळे अचानक एखादी चांगली संधी मिळू शकते. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
मीन (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)
रात्री ९.३८ नंतर चंद्र राशीत येणार असल्याने भावनिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. भाग्याची साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521


Comments
Post a Comment