आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 रविवार, ३० ऑगस्ट २०२६



. शुभ कालावधी


सकाळी ८.२४ ते सकाळी ९.२६ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  

 

सकाळी ९.२६ ते सकाळी १०.२९ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 


सकाळी १०.२९ ते सकाळी ११.३३ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.


सकाळी ११.३३ ते दुपारी १२.३५ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.


दुपारी १२.३५ ते दुपारी १.३८ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.


दुपारी १.३८ ते दुपारी २.४१ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.


दुपारी २.४१ ते दुपारी ३.४३ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.


दुपारी ३.४३ ते दुपारी ४.४६ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


ऑगस्ट २०२६ महिन्यातील मुहूर्त


साखरपुडा - ३,४,५,८,९,१३,१५,१६,१८,२०,२२,२३.


डोहाळजेवण - १६,१७,२०,२३,२६


बारसे - १,३,५,१५,१६,३०


जावळ - ५,९,२६,२७,२८.  


गृहप्रवेश - ३,५,९,१५,१७,२०,२३,२८,३०


३० ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर गुरु रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमच्यात आशावाद, उदारपणा आहे आणि तुम्ही नशीबवान आहात. वृत्ती धार्मिक असून प्रवासाची आवड आहे. तिर्थस्थळांना भेटी देणे तुम्हाला आवडते. शिक्षण क्षेत्रात तुम्ही यश मिळवतात. तुम्ही शांत, प्रामाणिक, कृतिशील आहेत. अडचणींचा तुम्हीजोरदार सामना करू शकतात. तुम्हाला आयुष्यत उशिरा प्रसिद्धी आणि सुख मिळते. तुम्ही अत्यंत गुणवान आहात मात्र स्वभाव संशयी आहे. मान - पान बद्दल तुम्ही जास्त संवेदनशील असतात. तुमच्यात अधिकार वृत्ती, महत्वाकांक्षा, उत्स्फूर्तपणा आणि पोकळ दिखाऊ वृत्ती असते. एकांतवास आवडतो. जीवनाचा आनंद उपभोगता. भिन्न लिंगी व्यक्तीचे आकर्षण असते. तुम्ही मनाने हळुवार आणि संवेदनशील असतात. तुम्ही ध्येयवादी आहात. एक उत्तम व्यवस्थापक आणि प्रशासक असतात.कला, साहित्य, मनोरंजन आणि विज्ञान याची तुम्हाला आवड असते. तुम्ही साहित्य निर्मिती आणि कथा लेखक बनू शकतात. तुम्ही शुद्ध प्रेम असणारे, नैतिक, कायदा प्रेमी, दयावान, न्यायी आणि परोपकारी आहात. इतरांना मदत करणे तुम्हाला आवडते. तुम्ही इतरांशी उत्तम संवाद साधू शकतात. दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी तुम्ही स्वतः मेहनत घेतात. तुम्ही धार्मिक आहात मात्र भावनाशील नाहीत. तुम्ही संयमी आहात. सहसा भावनेच्या आहारी जात नाहीत. तुमच्यामध्ये अफाट इच्छाशक्ती आणि उत्साह आहे. कामामध्ये सातत्य असते. तुम्ही प्रत्येक प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडवतात. स्वतःचे काम स्वतः करणे तुम्हाला आवडते. त्या कामात इतरांनी ढवळाढवळ केलेली चालत नाही. तुम्ही शक्यतो एकटे राहतात. बुद्धिमान व्यक्तींकडे तुमचा ओढा असतो. जीवनात तुम्ही यशस्वी होतात. तुम्ही न्यायाधीश, धर्मगुरू, तत्त्वज्ञानी, शिक्षक होऊ शकतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. दिखाउपणाची जराशी तुम्हाला आवड असते. मनाने तुम्ही तरुण असतात आणि वृत्तीने आनंदी असतात. मैदानी खेळांची तुम्हाला आवड आहे. तुम्ही मनाने उदार आणि सहिष्णू आहात. इतरांचा द्वेष करणे, मत्सर करणे तुम्हाला आवडत नाही. तुमचा गैरफायदा इतरांनी घेऊ नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे.


व्यवसाय:-  न्यायमूर्ती, सेक्रेटरी, राजदूत, मुत्सद्दी, उच्चपदस्थ अधिकारी, संरक्षण खाते, प्राध्यापक, धार्मिक प्रवचनकार, डॉक्टर, शिक्षक, मोल्डिंग, तेल गिरण्या, शेती, जंगल, कारखाने, लाकूड, खनिज द्रव्य, खाद्यपदार्थ.


शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पिवळा, जांभळा, हिरवा.


शुभ रत्न:- पुष्कराज, लसण्या, अमेथीस्ट.

 

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


रविवार, ३० ऑगस्ट २०२६


श्रावण कृष्ण द्वितीया / तृतीया. वर्षा ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521


राहुकाळ - सायंकाळी ४.३० ते ६.००


"आज उत्तम दिवस आहे."


नक्षत्र - उत्तराभाद्रपदा.

राशी - मीन.


रवी षडाष्टक चंद्र.

चंद्र लाभ हर्षल.

चंद्र युती नेपच्यून.


टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ)

भाग्याची उत्तम साथ लाभेल. चंद्र-हर्षल योगामुळे नवीन संधी अचानक उपलब्ध होऊ शकतात. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. नवीन योजना यशस्वी ठरतील.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो)

आर्थिक व्यवहारात लाभाचे संकेत आहेत. अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. व्यवसायातील नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा)

कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल.


कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो)

भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या चर्चेत सकारात्मक निष्कर्ष मिळतील. नवीन करार लाभदायक ठरू शकतात. सामाजिक संबंध दृढ होतील.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे)

कामाचा ताण वाढू शकतो, परंतु नियोजनबद्ध कार्यातून यश मिळेल. विरोधकांवर मात करण्यात यश मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या. नवीन संधींचा लाभ घेता येईल.


कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो)

आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. नवीन खरेदीचा योग संभवतो. चंद्र-हर्षल योगामुळे अचानक लाभदायक संधी मिळू शकते. प्रेमसंबंधात सकारात्मक घडामोडी होतील.


तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)

घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान मिळेल. घरातील एखादी महत्त्वाची योजना मार्गी लागू शकते.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु)

पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. संवादकौशल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. लहान प्रवासाचे योग संभवतात. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील.


धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे)

आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. नवीन खरेदीचा योग संभवतो. बोलण्यातून महत्त्वाची कामे साध्य होतील. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल.


मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी)

मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक आवक वाढेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन संपर्क भविष्यात लाभदायक ठरतील.


कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा)

कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. चंद्र-हर्षल योगामुळे अचानक एखादी चांगली संधी मिळू शकते. जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल.


मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची)

राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. चंद्र-हर्षल योगामुळे नवीन कल्पना आणि संधी मिळतील. चंद्र-नेपच्यून युतीमुळे कल्पनाशक्ती वाढेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी विशेष अनुकूल आहे.


कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.

-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521

Comments