आजचे राशीभविष्य
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६
. *शुभ कालावधी*
सकाळी ८.२४ ते सकाळी ९.२६ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, नवीन व्यवसाय सुरुवात, शुभ कामे, घर खरेदी, धार्मिक विधी, तीर्थयात्रा.
सकाळी ९.२६ ते सकाळी १०.३० - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, ऑपरेशन्स, औषध योजना, रासायनिक पृथक्करण.
सकाळी १०.३० ते सकाळी११.३२ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे, उच्च शिक्षण, सरकारी कामे, कायदा, व्यवस्थापन.
सकाळी ११.३२ ते दुपारी १२.३५ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, वाहन खरेदी, कपडे, आभूषणे, चैनीच्या वस्तू खरेदी, गृहसजावट, वास्तू, महागड्या वस्तूंची खरेदी, सहल.
दुपारी १२.३५ ते दुपारी १.३७ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण, मोबाइल खरेदी, संगणक, ट्रान्सपोर्ट वाहन खरेदी, कायदा, वकिली, रसायने, विमा पोलिसी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रसिद्धी, अँप्स बनवणे.
दुपारी १.३७ ते दुपारी २.४० - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता, रत्ने खरेदी, संगीत, प्रेम, नातेसंबंध.
दुपारी २.४० ते दुपारी ३.४३ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग, देणे फेडणे, पूर्वजांचे स्मरण, माघार घेणे, तह, शांतता करार,
दुपारी ३.४३ ते दुपारी ४.४५ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, नवीन व्यवसाय सुरुवात, शुभ कामे, घर खरेदी, धार्मिक विधी, तीर्थयात्रा.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
३१ ऑगस्ट रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल, रवी आणि शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव आटोपशीर आहे. आयुष्यात यश आणि कीर्ती झटपट मिळावी अशी अपेक्षा असते. आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान आहात. दृष्टीकोन व्यावहारिक असतो. इच्छाशक्ती तीव्र असते. धर्मादाय संस्था, अपंग संस्था यांसाठी काम करणे आवडते. भिन्न लिंगीव्यक्तीबद्दल जबरदस्त आकर्षण असते. स्वतःच्या कल्पना इतरांच्या मदतीने प्रत्यक्षात आणण्यात तुमचा हातखंडा असतो. तुमची शरीरयष्टी उंच असून डोळे सुंदर असतात. स्वभावात अस्थिरताअसते आणि काही वेळेस अकल्पनिय वागणे असते. भिन्न लिंगी व्यक्तींपासून तुम्हला फायदा होतो. कौटुंबिक जीवन सुखाचे असते. आयुष्यातील ४० नंतर भाग्योदय होतो. पूर्वार्ध कष्टाचा असतो. प्रेमात अनेक अडथळे येतात. आयुष्यात काही असाधारण घटना घडू शकतात. जीवनात अनेक बदल घडतात मित्र, मैत्रिणी देखील बदलत राहतात. स्वभाव चिकित्सक आणि तर्कनिष्ठ आहे. शास्त्रीय पुस्तके, वाङ्मय, याची तुम्हाला आवड आहे. वयाच्या ३१ नंतर तुमचा भाग्योदय होतो. तुम्ही स्वभावाने गरीब दिसत असलात तरी आतून तुम्ही हट्टी असतात. विचाराने स्वतंत्र असतात. प्रत्येक गोष्ट आपल्या राहतात असावी असे तुम्हाला वाटते. तुमच्या योजना तुम्ही काटेकोरपणेआखतात आणि त्यात तुम्हाला यश येते. धोक्यांना सामोरे जाणे तुम्हाला आवडते. तुमच्यात मोठेपणा आणि प्रतिष्ठा असते. व्यवसायात तुम्ही मोठ्या पदावर जातात. तुम्ही उंच आणि देखणे असतात. उत्साह जोमाने प्रगती हे तुमचे वैशिष्ट्ये आहेत. तुमचे आयुष्य अनेक चळवळींनी भरलेले आहे. तुम्हाला अनपेक्षित गोष्टींचा नेहमी अनुभव येतो. तुमच्या मनाची पातळी वरच्या दर्जाची आहे. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे. तुम्ही तुमचे स्वतःचे विचार इतरांवर लादत असतात. तुम्ही वादविवाद टाळले पाहिजेत. त्यामुळे गुप्त शत्रू निर्माण होत असतात आणि गैरसमज पसरत असतात. तुम्हाला थेटर्स, सिनेमा आणि भ्रमंती याची आवड असते. तुम्ही हरहुन्नरी आहात. तुमच्या वागण्यामध्ये एक प्रकारचा रुबाब आहे. आणि तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुमच्या आयुष्यात अनेक बदल घडतात मात्र ते तुमच्या चांगल्यासाठीच असतात. परंपरा, रूढी आणि बंधने तुम्ही तोडून टाकतात. तुमच्या मध्ये मनाचा एककल्लीपणा जाणवतो. तुम्ही इतरांपुढे संपूर्ण व्यक्त होत नाहीत मात्र सर्व प्रकारच्या अडचणींवर तुम्ही सक्षमपणे मात करतात. न आवडणाऱ्या गोष्टींचा तुम्ही जोरदार विरोध करतात. तुमच्या विचारांमध्ये आग्रहीपणा आणि अट्टाहास असतो. तुम्ही सतत कार्य मग्न असतात.
व्यवसाय:- यंत्रसामुग्री, विज्ञान, इलेक्ट्रिसिटी, वाहतूक यंत्रणा, इंजिनिअर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, संशोधन, कारखानदारी, हस्तसामुद्रिक, ज्योतिषी, अध्यात्म, बँकिंग सल्लागार.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, शनिवार.
शुभ रंग:- निळा, पांढरा, मरून.
शुभ रत्न:- हिरा, पोवळे, मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६
श्रावण कृष्ण तृतीया / चतुर्थी. वर्षा ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००
चंद्र नक्षत्र - रेवती.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.
सकाळी ९.०० नंतर चांगला दिवस आहे. चंद्र रेवती नक्षत्रात. संकष्टी चतुर्थी चंद्रोदय मुंबई - रात्री ८.५०. नाशिक - ८.४५
चंद्र केंद्र मंगळ.
चंद्र त्रिकोण गुरू.
चंद्र प्रतियुती शुक्र.
चंद्र युती शनी.
गुरू त्रिकोण शनी.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-
कामाच्या ठिकाणी उत्साह वाढेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत चांगल्या संधी मिळतील. प्रवासाचे नियोजन यशस्वी होईल. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.
वृषभ:-
नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. खर्चाचे योग्य नियोजन करा.
मिथुन:-
व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होतील. महत्त्वाच्या व्यक्तींची भेट लाभदायक ठरेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कर्क:-
भाग्याची साथ लाभेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रवासातून लाभ होईल. उच्च शिक्षण आणि ज्ञानवृद्धीसाठी दिवस चांगला आहे. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
सिंह:-
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अचानक खर्च वाढू शकतो. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. संशोधन आणि गुप्त विषयांमध्ये प्रगती होईल. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
कन्या:-
राशीच्या सप्तमस्थानी चंद्र असल्याने भागीदारी आणि वैवाहिक जीवनाला महत्त्व येईल. चंद्र-गुरू त्रिकोणामुळे सहकार्य आणि लाभ मिळेल. व्यवसायातील महत्त्वाच्या चर्चा यशस्वी होतील. जोडीदाराची साथ लाभेल.
तुळ:-
नोकरी-व्यवसायात कामाचा ताण वाढेल, मात्र मेहनतीचे योग्य फळ मिळेल. चंद्र-मंगळ केंद्र योगामुळे कार्यक्षमता वाढेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या आणि अनावश्यक वाद टाळा.
वृश्चिक:-
सर्जनशील कार्यात यश मिळेल. संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात सकारात्मक वातावरण राहील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. भावनिक निर्णय घेणे टाळा.
धनु:-
घरगुती वातावरणात काही जबाबदाऱ्या वाढतील. मालमत्तेसंबंधी कामात प्रगती होईल. आई-वडील व ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. चंद्र-शनी युतीमुळे संयमाची गरज आहे. घरातील महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
मकर:-
पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. लहान प्रवासातून फायदा होईल. व्यावसायिक संपर्क वाढतील. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत प्रभावीपणे मांडता येईल.
कुंभ:-
आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध होतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. चंद्र-गुरू त्रिकोणामुळे आर्थिक नियोजनाला चांगले परिणाम मिळतील. मात्र अनावश्यक खर्च टाळा.
मीन:-
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. चंद्र-गुरू त्रिकोणामुळे भाग्याची उत्तम साथ लाभेल. चंद्र-मंगळ केंद्र योगामुळे धाडस आणि कार्यक्षमता वाढेल. चंद्र-शनी युतीमुळे जबाबदाऱ्या वाढतील, मात्र संयमाने काम केल्यास यश मिळेल. चंद्र-शुक्र प्रतियुतीमुळे भावनिक बाबतीत संभ्रम निर्माण होऊ शकतो; त्यामुळे महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. गुरू-शनी त्रिकोणामुळे दीर्घकालीन योजना आणि स्थिर निर्णयांना चांगले यश मिळेल.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
8087520521

Comments
Post a Comment