ॲड.पी आर मुंडरगी स्मृति महाराष्ट्र राज्य महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेत निहिरा,श्रेया,वृतिका व दिशा आघाडीवर
ॲड.पी आर मुंडरगी स्मृति महाराष्ट्र राज्य महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेत निहिरा,श्रेया,वृतिका व दिशा आघाडीवर
कोल्हापूर २८ सिटी न्यूज नेटवर्क
ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम येथे सुरू असलेल्या ॲड.पी आर मुंडरगी स्मृति एचटूई महाराष्ट्र राज्य महिला आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेर अग्रमानांकित पुण्याच्या निहिरा कौल सह द्वितीय मानांकित श्रेया हिप्परगी सांगली, सातवी मानांकित वृतीका गमे नागपूर व आठवी मानांकित दिशा पाटील कोल्हापूर या चौघीजणी साडेचार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. भूमिका वागळे छत्रपती संभाजीनगर, ईश्वरी जगदाळे सांगली, सई पाटील पुणे, सानिया तडवी जळगाव, श्रावणी उंडाळे पुणे, द्रिषा नाईक मुंबई व मानसी टिळेकर पुणे या सातजणी चार गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. माधुरी पाटील कोल्हापूर, क्रिती पटेल मुंबई व शर्वरी कबनूरकर कोल्हापूर या तिघीजणी साडेतीन गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.
आज झालेल्या पाचव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर अग्रमाणांकित पुण्याची निहिरा कौल व द्वितीय मानांकित सांगलीची श्रेया हिप्परगी यांच्यातील तुल्यबळ लढतीची सुरुवात फ्रेंच बचाव एक्सचेंज व्हेरिएशनने झाली होती परंतु दोघींनी कोणताही धोका न पत्करता अवघ्या बारा चालीनंतर डाव बरोबरीत सोडविण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या पटावर कोल्हापूरच्या दिशा पाटील विरुद्ध मुंबईच्या क्रिती पटेल यांच्यातील सामना क्लोज गायको पियानो प्रकाराने सुरु झाला.क्रितीने राजाच्या बाजूने दिशावर आक्रमण करण्यास सुरुवात केली परंतु दिशाने सुंदर बचाव करत क्रितीचा घोडा मिळविला व कॅसलिंग न झालेल्या क्रितीच्या राजावर वजीर व दोन हत्तींनी जोरदार आक्रमण करुन राजावर मात केली. तिसऱ्या पटावर नागपूरच्या वृत्तिका गमेने कोल्हापूरच्या शर्वरी कबनूरकर वर विजय मिळवला चौथ्या पटावर सांगलीच्या ईश्वरी जगदाळेने सातारच्या तन्मयी घाटेला पराभूत केले तर पाचव्या पटावर छत्रपती संभाजी नगरच्या भूमिका वागळे पुण्याच्या राजेश्वरी देशमुख वर मात केली. उद्या स्पर्धेच्या अंतिम आठव्या फेरीनंतर साडेतीन वाजता बक्षीस समारंभ होणार आहे.

Comments
Post a Comment