भाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश; पंचगंगा स्मशानभूमीतील दोन्ही धोकादायक कमानी उतरविल्या
कोल्हापूर, दि. २७ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीवरील स्मशानभूमी परिसरातील धोकादायक झालेल्या कमानी तातडीने उतरविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली होती. यासाठी भाजपा सचिव अमित शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील दोन्ही कमानींचा रंग उडालेला असून, त्यांच्या पाया तसेच बांधकामाला तडे गेल्याने त्या धोकादायक बनल्या होत्या. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कमानी तातडीने उतरविण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे निवेदन देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली होती.
या पाठपुराव्याची दखल घेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आज पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील दोन्ही धोकादायक कमानी पूर्णपणे उतरविण्यात आल्या. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागला आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या कार्यवाहीबद्दल भाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याबद्दल भाजपा युवा मोर्चाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांची सोडवणूक करण्यास भाजपा युवा मोर्चा कटिबद्ध आहे, असे भाजपा सचिव अमित शिंदे यांनी सांगितले.

Comments
Post a Comment