कोल्हापूर जिल्हा महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेत जयसिंगपूरची दिव्या पाटील अजिंक्य तर नांदणीची संस्कृती सुतार उपविजेती
कोल्हापूर जिल्हा महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेत जयसिंगपूरची दिव्या पाटील अजिंक्य तर नांदणीची संस्कृती सुतार उपविजेती
कोल्हापूर १६ सिटी न्यूज नेटवर्क
अयोध्या टॉवर, दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूर ने आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा महिला निवड बुद्धिबळ स्पर्धेत जयसिंगपूरच्या दिव्या पाटील ने पाच पैकी पाच गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. नांदणीच्या संस्कृती सुतार ने चार गुण व पंधरा टायब्रेक गुण मिळवून विजेतेपद मिळविले., कोल्हापूरच्या माधुरी पाटील ला चार गुण व चौदा टायब्रेक गुणासह तृतीय स्थान मिळाले तर जयसिंगपूरच्या दिशा पाटील ला चार गुण व तेरा टायब्रेक गुण घेत चौथे स्थान निश्चित केले. या चौघींना रोख चार हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. या चौघींची निवड कोल्हापूर येथे 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर संघात झाली आहे. या स्पर्धा डॉ. प्रविणा गिरी (नुट्रीशनिस्ट व डायटिशन) यांनी पुरस्कृत केल्या होत्या तर युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिस चे कॅप्टन उत्तम पाटील यांनी स्पर्धेसाठी हॉल उपलब्ध करून दिला होता.
या स्पर्धेत जयसिंगपूर, इचलकरंजी, चंदगड व स्थानिक कोल्हापूर येथील नामवंत 32 महिला बुद्धिबळपटू सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ राष्ट्रीय महिला बुद्धिबळपटू माधुरी पाटील व प्राध्यापक अंकुश बनसोड यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले.तर बक्षीस समारंभ स्पर्धा पुरस्कर्त्या डॉक्टर प्रवीणा गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भरत चौगुले, धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे, प्रीतम घोडके, आरती मोदी उपस्थित होते.
उत्तेजनार्थ बक्षीसे पुढील प्रमाणे
पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू सृष्टी जोशीराव (कोल्हापूर)
तेरा वर्षाखालील उत्कृष्ट (बुद्धिबळपटू) सिद्धी कर्वे जयसिंगपूर
18 वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू - नारायणी घोरपडे (कोल्हापूर)
नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू - शनाया मालानी (इचलकरंजी)
सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू - इनाया मुजावर (कोल्हापूर)
सर्वात लहान पाच वर्षाची बुद्धिबळपटू- शान्वी खोत (रेंदाळ)
.jpg)
Comments
Post a Comment