मार्केट सेस रद्द न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा; कोल्हापुरातील व्यापारी परिषदेत एकमुखी ठराव
कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून आकारला जाणारा मार्केट सेस तातडीने रद्द करावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्रातील व्यापारी संघटनांनी दिला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (KCCI) येथे झालेल्या राज्यस्तरीय व्यापारी परिषदेत हा निर्णय घेण्यात आला.
परिषदेत राज्य शासनाने व्यापाऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील बदल करण्यापूर्वी व्यापारी संघटनांशी चर्चा करावी, बाजार समितीचे परवाने ऑनलाइन उपलब्ध करून द्यावेत, इतर राज्यांप्रमाणे व्यापाऱ्यांना सुलभ परवाना प्रणाली लागू करावी आणि बाजार समित्यांना स्वतंत्र युजर चार्जेस आकारण्याचा अधिकार देऊ नये, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)चे प्रेसिडेंट प्रवीण आगरवाल, चेअरमन मोहन गुरनानी, दि ड्राय फ्रूट्स अँड ऑईल सीड्स मर्चंट्स असोसिएशन, मुंबईचे अध्यक्ष विजय भालसिंगारे, दि पूना मर्चंट्स चेंबरचे राजेंद्र बोधिया, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष जितेंद्र शाह, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय डी. शेटे, जैन मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष संजीव पटेल, अजित कोठारी, वैभव सावर्डेकर, विजय कागले, विवेक शेटे आणि किरण तपकेर उपस्थित होते.
तसेच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष भारत एस. ओसवाल, उपाध्यक्ष राजू टी. पाटील, खजिनदार ज्ञानानंद व्ही. मुंधे, मानद सचिव योगेश एस. कुलकर्णी, मानद सचिव अजित एस. कोठारी, मानद सचिव प्रशांत एस. शिंदे आणि मानद सचिव वैभव एन. सावर्डेकर यांनी परिषदेच्या आयोजनात सहभाग घेतला.
परिषदेत उपस्थित व्यापारी प्रतिनिधींनी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.


Comments
Post a Comment