मेन राजाराम मध्ये श्रावणधारा काव्य संमेलन उत्साहात संपन्न

 मेन राजाराम मध्ये श्रावणधारा काव्य संमेलन उत्साहात संपन्न 



कोल्हापूर १७ सिटी न्यूज नेटवर्क 

येथील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या प्रशालेत श्रावण मासानिमित्ताने  कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी **श्रावणधारा काव्य संमेलन**घेण्यात आले.

  यामध्ये विद्यार्थ्यांनी निसर्ग कविता, देशभक्तीपर स्वरचित कविता घेतल्या होत्या.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

  या उपक्रमात/स्पर्धेत अनुक्रमे विजेते विद्यार्थी

 कु.सोनल सुनिल पाल(प्रथम क्रमांक)

  श्रेया विश्वनाथ पसारे (द्वितीय क्रमांक)

अक्षरा राजकुमार चौहान(तृतीय क्रमांक)

सायली संतोष खंदारे (तृतीय क्रमांक)

  विजेत्या स्पर्धकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रशालेचे प्राचार्य डॉ गजानन खाडे , उपप्राचार्या मा वनिता खडके ,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मा संदिप पाटील यांनी प्रमाणपत्र, आकर्षक बक्षिसे देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

  स्वरचित काव्य संमेलनाचे संयोजन प्रा सुषमा पाटील यांनी केले होते.यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा बी पी माळवे,प्रा अनिल लाड,प्रा बी टी धराडे,प्रा भाऊसाहेब धराडे, प्रा राहूल देशमुख,प्रा अयोध्या धुमाळ,प्रा प्रमिला मळगे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

Comments