एकमुखी दत्त मंदिर आयोजित श्रावण मास कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न- करवीर मठात अभिवादन - आरती महाप्रसादाने सांगता

 एकमुखी दत्त मंदिर आयोजित श्रावण मास कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न- करवीर मठात अभिवादन - आरती महाप्रसादाने सांगता .



कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क 

पुरातन संदर्भ असलेल्या मंगळवार पेठेतील अंखड धुनी च्या एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने आयोजित श्रावण मास कावड यात्रा प्रंचड भक्तीमय वातावरणात संपन्न झाली . सकाळ च्या मंगलमय वातावरणात पंचगंगा नदी त विधीवत  दत्त पादूका जल स्नान - आरती करण्यात आली . त्यानंतर   'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ' च्या निनादात  स्वामी सेवक मिलिंद धोंड , संजय घाटगे - मामा,पारस ओसवाल फौजी विरेंद्र हारुगले , किशोर घाटगे नितीन केरकर आदि मान्यवरांनी मानाच्या कावडी चे पूजन करुन श्रीफळ वाढवले . आणि कावड यात्रेस प्रांरभ झाला .



या वेळी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज ' रात्री उशिरा पोलिस प्रशासनाने नियोजित मार्गावर कावड यात्रा नेऊ नका असे कळवले मात्र तमाम भाविकांच्या उत्साहावर त्याचा काही किचिंत ही परिणाम झालेला नाही मात्र प्रशासनाचा मान राखत ही कावड यात्रा करवीर शंकराचार्य मठ मठापर्यंत मठात देण्याचा निर्धार घोषित केला .      या नंतर हलगी च्या निनादात ही काव यात्रा सुरु झाली . यामधे  गिरनार दत्तभक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्राचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

करवीर निवासिनी श्री अंबाबाई माता व श्री गुरुदत्तात्रेय यांना साक्षी ठेवून श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी शिव परमात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पंचगंगा मातेचे पवित्र जल कावडी अभिवादन करण्याचा उपक्रम भविष्यात करवीरची नवी ओळख ठरेल अशा शब्दात करवीर पीठाचे शंकराचार्य  विद्या नरसिंह भरती यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या .

या आध्यात्मिक आनंद सोहळ्यात सर्व गुरुबंधू, दत्तभक्त, दत्तसंप्रदायातील माता-भगिनी तसेच युवकांनी मंदिरा मार्फत दिलेले टी-शर्ट घालून तसेच पिवळ्या आणि भगव्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावड यात्रेची शोभा वाढवली . या कावड यात्रेच्या यशस्वी साठी मठाधिपती गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली  पारस ओसवाल किशोर घाटगे मिलिंद कुलकर्णी राजेंद्र मकोटे संतोष गोसावी अरुण गवळी राजन बोधे सागर ठाणेकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्ते कार्य रत सहकार्य होते .

Comments