शालेय जिल्हास्तर 14 17 व 19 वर्षाखालील मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा शिरोळच्या मुलींची बाजी...दिशा, संस्कृती व सिद्धी अजिंक्य तर दिव्या, सिद्धी व स्वरा उपविजेती
शालेय जिल्हास्तर 14 17 व 19 वर्षाखालील मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धा
शिरोळच्या मुलींची बाजी...दिशा, संस्कृती व सिद्धी अजिंक्य तर दिव्या, सिद्धी व स्वरा उपविजेती
कोल्हापूर २३ सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या 14, 17 व 19 वर्षाखालील शालेय मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. शिरोळ तालुक्यातील मुलींनी तिन्ही गटात विजेते व उपविजेतेपद संपादन करुन आपले वर्चस्व सिद्ध केले.
आचार्य विद्यानंद संस्कृती भवन महावीर महाविद्यालय कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सहाव्या फेरीमध्ये 14 वर्षाखालील मुलींच्या गटात पहिल्या पटावर अग्रमानांकित शिरोळच्या सिद्धी कर्वे ने चंदगडच्या निधी पोटे वर मात केली. हातकणंगलेच्या मृणाल पांडवने गडहिंग्लजच्या ऋतुजा शेंडगे वर विजय मिळविला तर शिरोळच्या स्वरा पाटनी ने तृतीय मानांकित हातकणंगलेच्या श्रुती पांडव ला पराभवाचा धक्का दिला. गडहिंग्लजच्या आदिती गाडवी ने चंदगडच्या रसिका तेली ला हरविले. अग्रमानांकित शिरोळची सिद्धी कर्वे ने सहा पैकी सहा गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. तब्बल सहा खेळाडू समान पाच गुणांवर राहिल्यामुळे शिरोळची स्वरा पाटणी 23 (26) सरस टायब्रेक गुनानुसार उपविजेती ठरली तर चंदगडची निधी पोटे 23 (25.5) टायब्रेक गुणासह तृतीय स्थानी राहिली. अग्रमानांकित हातकणंगलेची मृणाल पांडव ला 20.5 टायब्रेक गुणामुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गडहिंग्लज च्या आदिती गाडवी ने 18.5 टायब्रेक गुणासह पाचवे स्थान निश्चित केले.
17 वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम सहाव्या फेरीमध्ये पहिला पटावर अग्रमानांकित शिरोळची संस्कृती सुतार व द्वितीय मानांकित शिरोळचीच सिद्धी बुबने या दोघींनी कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडविला. गडहिंग्लजच्या प्रगती भनवसे ने शाहूवाडी च्या श्वेता मोरे ला पराभूत केले. करवीरच्या पद्मश्री वैद्यने गडहिंग्लजच्या नीता धुळाज वर विजय मिळविला तर शाहूवाडी च्या जान्वी स्वामीने कागलच्या सान्वी फल्ले वर मात केली. अग्रमानांकित शिरोळच्या संस्कृती सुतारने साडेपाच गुण व 23.5 टायब्रेक गुण घेत अजिंक्यपदाला गवसणी घातली तर द्वितीय मानांकित शिरोळच्या सिद्धी बुबणे ला साडेपाच गुण व 20.5 टायब्रेक गुणासह उपविजेतेपद मिळाले. शाहूवाडी ची जान्वी स्वामी ने पाच गुण व 22 टायब्रेक गुनासह तृतीय स्थान मिळविले. करवीरची पद्मश्री वैद्य पाच गुण व 21 टायब्रेक गुण घेऊन चौथे स्थान निश्चित केले तर गडहिंग्लजच्या प्रगती भानवसे ने पाच गुण व 18 टायब्रेक गुणासह पाचवे स्थान प्राप्त केले.
19 वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम सहाव्या फेरीत पहिल्या पटावर द्वितीय मानांकित शिरोळच्या दिशा पाटील ने शिरोळच्या सांची चौधरीचा पराभव केला तर दुसऱ्या पटावर अग्रमानांकित शिरोळच्या दिव्या पाटील ला शिरोळच्याच तन्वी पाटीलने बरोबरीत रोखले. तिसऱ्या पटावर शिरोळच्या झरीन नदाफ ने शाहूवाडीच्या दुर्गा जाधव वर मात केली चौथ्या पटावर गडहिंग्लजच्या अन्नपूर्णा मगदूमने आजर्याच्या श्रावणी पोवार ला हरविले.द्वितीय मानांकित शिरोळच्या दिशा पाटील साडेपाच गुण मिळवून अजिंक्यपदाची मानकरी ठरली तर अग्रमानांकित शिरोळची दिव्या पाटील पाच गुण व साडे बावीस टायब्रेक गुण घेऊन उपविजेती झाली. गडहिंग्लजच्या अन्नपूर्णा मगदूम ला पाच गुण व साडेअठरा टायब्रेक गुणामुळे तिसरे स्थान मिळाले. शिरोळच्या झरीन नदाफ ला पाच गुण व 18 टायब्रेक गुणाानुसार चौथा क्रमांक मिळाला तर शिरोळच्याच तन्वी पाटील ने साडेचार गुणासह पाचवे स्थान ग्रहण केले.
क्रीडा अधिकारी सीमा पाटील यांनी स्पर्धेचे व्यवस्थापन केले तर चेस असोसिएशन कोल्हापूरचे भरत चौगुले,मनिष मारुलकर,आरती मोदी, रोहित पोळ, किरण शिंदे, माधुरी पाटील,विजय सलगर व शंकर सावंत यांनी पंच म्हणून काम पाहिले.
सांगली येथे 30 सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी गटनिहाय पुढील प्रमाणे खेळाडूंची निवड करण्यात आली.
14 वर्षाखालील मुली :-1) सिद्धी कर्वे शिरोळ 2) स्वरा पाटणी शिरोळ 3) निधी पोटे चंदगड 4) मृणाल पांडव हातकणंगले 5) आदिती गाडवी गडहिंग्लज
17 वर्षाखालील मुली :-1) संस्कृती सुतार शिरोळ 2) सिद्धी बुबणे, शिरोळ 3) जान्हवी स्वामी शाहूवाडी 4) पद्मश्री वैद्य करवीर 5) प्रगती भानवसे गडहिंग्लज
19 वर्षाखालील मुली :- 1) दिशा पाटील शिरोळ 2) दिव्या पाटील शिरोळ 3) अन्नपूर्णा मगदूम गडहिंग्लज 4) झरीन नदाफ शिरोळ 5) तन्वी पाटील शिरोळ

Comments
Post a Comment