जुने लॅपटॉप-डेस्कटॉप बनणार आणखी पॉवरफुल, जिओ पीसी देणार 16GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज
• सर्व इंटरनेट युजर्ससाठी उपलब्ध
• 8 वर्षे जुना कॉम्प्युटरही एआय रेडी करण्याचा दावा, प्लॅन ₹1,000 पासून सुरू
कोल्हापूर ०२ सिटी न्यूज नेटवर्क
जुना लॅपटॉप किंवा डेस्कटॉप स्लो झाला असेल, तर लगेच नवीन कॉम्प्युटर खरेदी करण्याची गरज कदाचित भासणार नाही. रिलायन्स जिओचे जिओ पीसी जुन्या कॉम्प्युटरला क्लाउडच्या क्षमतेच्या मदतीने अधिक पॉवरफुल बनवणार आहे. युजर्सना त्यांच्या सध्याच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर कोणतेही नवीन हार्डवेअर खरेदी न करता 16GB पर्यंत RAM आणि 1TB पर्यंत स्टोरेजचा ॲक्सेस मिळू शकेल.
JioPC ची सेवा स्टँडअलोन सब्सक्रिप्शन म्हणून कोणताही इंटरनेट युजर घेऊ शकतो. म्हणजेच इंटरनेट कनेक्शन कोणत्याही टेलिकॉम किंवा ब्रॉडबँड कंपनीचे असले, तरी JioPC वापरता येईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही सेवा पाच मिनिटांपेक्षा कमी वेळेत ॲक्टिव्हेट करता येते. यासाठी डेटा माइग्रेशनची किंवा नवीन हार्डवेअर बसवण्याची आवश्यकता नाही. यापूर्वी JioPC केवळ जिओ होम ब्रॉडबँड ग्राहकांसाठी मर्यादित होते.
जिओचा दावा आहे की JioPC जुन्या कॉम्प्युटरला इतके पॉवरफुल बनवू शकते की AI-संबंधित हेवी प्रोसेसिंग आणि स्टोरेजच्या गरजाही सहज पूर्ण करता येतील. यासाठी कॉम्प्युटिंगचा मोठा भाग JioPC च्या क्लाउडवर होईल. कंपनीच्या मते, 8 वर्षे जुना कॉम्प्युटरही आजच्या AI-पॉवर्ड ॲप्ससाठी आवश्यक परफॉर्मन्स, स्टोरेज आणि क्षमता मिळवू शकतो.
JioPC चे प्लॅन ₹1,000 पासून सुरू होतील. 8GB RAM आणि 500GB स्टोरेज असलेला दोन महिन्यांचा प्लॅन ₹1,000 मध्ये मिळेल, तर 16GB RAM आणि 1TB स्टोरेज असलेल्या JioPC Ultra ची किंमत दोन महिन्यांसाठी ₹1,200 असेल. पाच महिन्यांचे प्लॅन अनुक्रमे ₹2,000 आणि ₹2,500 मध्ये उपलब्ध असतील. तर 12 महिन्यांचा म्हणजेच 10+2 महिन्यांचा प्लॅन अनुक्रमे ₹4,000 आणि ₹5,000 मध्ये मिळेल. सर्व किमतींमध्ये GST समाविष्ट आहे.
JioPC क्लाउडवर चालत असल्याने यासाठी चांगले आणि स्थिर इंटरनेट कनेक्शन आवश्यक असेल. ब्रॉडबँडसोबतच विश्वासार्ह 4G किंवा 5G कनेक्शनवरही JioPC वापरता येईल.

Comments
Post a Comment