भारतापासून अमेरिकेपर्यंत जिओची 5G साथ कायम; टी-मोबाइलसोबत सीमलेस रोमिंग

 भारतापासून अमेरिकेपर्यंत जिओची 5G साथ कायम; टी-मोबाइलसोबत सीमलेस रोमिंग



• अमेरिकेत पोहोचल्यानंतरही मिळणार 5G स्टँडअलोन नेटवर्कचा अनुभव

• जिओ आणि टी-मोबाइलचा जगातील पहिल्या 5G रोमिंग कनेक्टिव्हिटीचा दावा


मुंबई, 22 सिटी न्यूज नेटवर्क 


अमेरिकेला जाणाऱ्या जिओ ग्राहकांसाठी मोबाईल रोमिंगचा अनुभव आता अधिक सहज आणि अखंडित होणार आहे. भारतातून अमेरिकेत पोहोचल्यानंतर जिओ ग्राहकांना टी-मोबाइलच्या 5G स्टँडअलोन नेटवर्कवर रोमिंगची सुविधा मिळणार आहे. त्याचप्रमाणे, अमेरिकेतून भारतात येणाऱ्या टी-मोबाइल ग्राहकांना जिओच्या 5G स्टँडअलोन नेटवर्कचा वापर करता येणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, दोन देशांमधील 5G स्टँडअलोन नेटवर्क रोमिंगच्या माध्यमातून अशा प्रकारे जोडण्याची ही जगातील पहिलीच सुविधा आहे.


सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, देश बदलल्यानंतरही ग्राहकांना नव्या नेटवर्कवर 5G रोमिंगचा अनुभव घेता येणार आहे. यामुळे अधिक वेगवान इंटरनेट, कमी विलंबता (लो-लेटन्सी) आणि अधिक विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी मिळेल. त्यामुळे व्हिडिओ स्ट्रीमिंग असो, प्रवासातील रील शेअर करायची असो किंवा ऑफिसमधील अॅप्स वापरायचे असोत, भारत आणि अमेरिकेत 5Gचा अनुभव अधिक सहज आणि अखंडित राहणार आहे.


सध्या ही 5G स्टँडअलोन रोमिंग कनेक्टिव्हिटी जिओ आणि टी-मोबाइलच्या नेटवर्कदरम्यान उपलब्ध आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात प्रवास करणाऱ्या या दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना याचा थेट लाभ मिळणार आहे.


टी-मोबाइलचे चीफ नेटवर्क ऑफिसर अंकुर कपूर म्हणाले की, एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचल्यानंतरही ग्राहकांचा 5G अनुभव सहज आणि अखंडित राहील. ग्राहक व्हिडिओ स्ट्रीमिंग करत असो, प्रवासातील रील शेअर करत असो किंवा बिझनेस अॅप वापरत असो, त्यांना कनेक्टिव्हिटीचा सातत्यपूर्ण अनुभव मिळेल. ही सुविधा या तंत्रज्ञानाची मोठी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.


जिओचे हेड – इंटरनॅशनल नेटवर्क, पार्टनरशिप अँड सर्व्हिसेस, मार्क यारकोस्की म्हणाले की, ही उपलब्धी केवळ रोमिंगपुरती मर्यादित नाही. दोन 5G स्टँडअलोन नेटवर्कचे एकत्र येणे भविष्यात ग्राहक आणि व्यवसायांसाठी नवीन सेवांसोबतच एआय-आधारित सेवांचीही दारे खुली करू शकते.


ही रोमिंग कनेक्टिव्हिटी शक्य करण्यात सिनिव्हर्स (Syniverse)च्या प्लॅटफॉर्मची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. जिओ आणि टी-मोबाइलची नेटवर्क्स सुरक्षित पद्धतीने एकमेकांशी जोडण्यासाठी या प्लॅटफॉर्मने मदत केली आहे.

Comments