आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 मंगळवार, १ सप्टेंबर २०२६. 



शुभ कालावधी


सकाळी ८.२४ ते सकाळी ९.२७ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, वाहन खरेदी, कपडे, आभूषणे, चैनीच्या वस्तू खरेदी, गृहसजावट, वास्तू, महागड्या वस्तूंची खरेदी, सहल, नृत्य, करमणूक.


सकाळी ९.२७ ते सकाळी १०.३० - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण, मोबाइल खरेदी, संगणक, ट्रान्सपोर्ट वाहन खरेदी, कायदा, वकिली, रसायने, विमा पोलिसी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रसिद्धी, अँप्स बनवणे,   


सकाळी १०.३० ते सकाळी  ११.३३ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता, रत्ने खरेदी, संगीत,  प्रेम, नातेसंबंध.


सकाळी ११.३३ ते दुपारी १२.३४- शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग, देणे फेडणे, पूर्वजांचे स्मरण, माघार घेणे, तह, शांतता करार, 


दुपारी १२.३४ ते दुपारी १.३७ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, नवीन व्यवसाय सुरुवात, शुभ कामे, घर खरेदी, धार्मिक विधी, तीर्थयात्रा.


दुपारी १.३७ ते दुपारी २.४० - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, ऑपरेशन्स, औषध योजना, रासायनिक पृथक्करण.


दुपारी २.४० ते दुपारी ३.४२ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे, उच्च शिक्षण, सरकारी कामे, कायदा, व्यवस्थापन.


दुपारी ३.४२ ते दुपारी ४.४५ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, वाहन खरेदी, कपडे, आभूषणे, चैनीच्या वस्तू खरेदी, गृहसजावट, वास्तू, महागड्या वस्तूंची खरेदी, सहल, नृत्य, करमणूक.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


सप्टेंबर २०२६ महिन्यातील मुहूर्त:-


साखरपुडा ;-१२,१३,१५, १७,१९,२१,२३,२६


डोहाळजेवण:- १३,१६,१७


बारसे:- १२,१३,१५,१७,२१,२३, २४


जावळ:- १३,२३,२४,२५.


गृहप्रवेश :- १२,१३,१७,१९,२१,२३, २४.


१ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर रवी आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही हुशार, बुद्धिमान, शास्त्राची आवड असलेले आहात. तुमची वृत्ती व्यापारी आहे. तुमचा कामाचा झपाटा मोठा असतो. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून क्रीडा प्रकारांची आवड आहे. स्वतःचे विचार तुम्ही मित्रांना उत्तम प्रकारे समजून सांगू शकतात. एखाद्या कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम पूर्वनियोजन करतात. तुम्हाला गूढ विद्या आवडतात. तुम्ही एक कलाकार आहात आणि जीवनाच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला ओढ आहे. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. नीती अनीती आणि परंपरा याच्या कल्पना तुमच्या जरा वेगळ्या असतात. तुम्ही सतत उद्योगप्रिय असतात. तुमच्यामध्ये उत्साह आहे तुम्ही इतरांचा आदर करतात. इतरांच्या गुप्त गोष्टींचा तुम्ही बाहेर उच्चार करत नाहीत. तुमच्याशी सल्लामसलत केल्यास तुमचे मित्र निराशा आणि तणाव यापासून मुक्त राहतात. तुम्ही एक उत्तम सल्लागार आहात. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये तुम्ही मिसळतात. तुम्ही फारसा सखोल अभ्यास करत नाहीत मात्र वक्तृत्व चांगले असते. तुमच्या संशोधनातून जगाला फायदा होतो. इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही काम करत असतात. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. तुमचे व्यक्तिमत्व दुहेरी आहे. तुम्ही एकाच वेळी व्यवहारी देखील असतात आणि ध्येयवादी सुद्धा असतात.

     


व्यवसाय:-  जाहिरात माध्यम, वृत्तपत्र, इंटरियर डेकोरेटर, चित्रपट निर्माते, चित्रपट दिग्दर्शक, स्टुडिओ मॅनेजर, वेशभूषा सल्लागार, प्रोग्रॅम डायरेक्टर, बँकिंग, औषध, वैद्यकीय क्षेत्र, वकील.


शुभ दिवस:- रविवार आणि गुरुवार.


शुभ रंग:- सोनेरी, पिवळा, नारंगी आणि जांभळा.


शुभ रत्न:- पाचू आणि माणिक.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


मंगळवार, १ सप्टेंबर २०२६

श्रावण कृष्ण चतुर्थी / पंचमी. वर्षा ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

(संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०


"आज क्षय तिथी आहे."


चंद्रनक्षत्र - अश्विनी.

आज जन्मलेल्या बाळाची राशी - मेष.


रवी त्रिकोण चंद्र.

मंगळ केंद्र शनी.

बुध लाभ मंगळ.

बुध षडाष्टक शनी.


टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. रवी-चंद्र त्रिकोणामुळे भाग्याची साथ लाभेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. धाडसी निर्णय घेताना संयम बाळगा.


वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

आर्थिक बाबतीत लाभाचे संकेत आहेत. नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अनावश्यक खर्च टाळा.


मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

बुध-मंगळ लाभ योगामुळे व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होतील. संवादकौशल्याचा चांगला उपयोग होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.


कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

नोकरी आणि व्यवसायात जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.


सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. सर्जनशील कार्यात प्रगती होईल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस चांगला आहे.


कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

घरगुती वातावरण सुखद राहील. मालमत्तेसंबंधी कामात प्रगती होईल. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. घरातील महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या.


तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. लहान प्रवास लाभदायक ठरेल. महत्त्वाच्या चर्चेत यश मिळेल. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.


वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

आर्थिक लाभाचे संकेत आहेत. बुध-मंगळ लाभ योगामुळे नवीन उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. बोलण्याच्या प्रभावामुळे महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा.


धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजना यशस्वी होतील. आर्थिक प्रगतीसाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरतील.


मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

नोकरी-व्यवसायात कामाचा ताण वाढेल. मंगळ-शनी केंद्र योगामुळे संयमाने काम करण्याची गरज आहे. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवा.


कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

भाग्याची साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रवासाचे योग संभवतात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नवीन संधींचा योग्य उपयोग करा.


मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. बुध-मंगळ लाभ योगामुळे आर्थिक लाभाच्या संधी प्राप्त होतील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. मात्र बुध-शनी षडाष्टक योगामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना सावधगिरी बाळगा.


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

  8087520521

Comments