आजचे राशीभविष्य
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६.
शुभ कालावधी
सकाळी ८.२४ ते सकाळी ९.२६ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे, मुलाखत, सरकारी नोकरी.
सकाळी ९.२६ ते सकाळी १०.३० - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, नृत्य, करमणूक.
सकाळी १०.३० ते सकाळी ११.३१ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
सकाळी ११.३१ ते दुपारी १२.३४ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, प्रेम, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
दुपारी १२.३४ ते दुपारी १.३६ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
दुपारी १.३६ ते दुपारी २.३९ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.
दुपारी २.३९ ते दुपारी ३.४१ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
दुपारी ३.४१ ते दुपारी ४.४३ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
दुपारी ४.४३ ते संध्याकाळी ५.४६ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, नृत्य, करमणूक.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
सप्टेंबर २०२६ महिन्यातील मुहूर्त:-
साखरपुडा ;-१२,१३,१५, १७,१९,२१,२३,२६
डोहाळजेवण:- १३,१६,१७
बारसे:- १२,१३,१५,१७,२१,२३, २४
जावळ:- १३,२३,२४,२५.
गृहप्रवेश :- १२,१३,१७,१९,२१,२३, २४.
३ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर गुरु आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून मान मरातब आणि प्रतिष्ठा या गोष्टींची जपणूक करतात. तुम्हाला शुद्ध प्रेम आणि न्याय आवडतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. स्वतःबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा डोळसपणे करतात. तुम्ही टापटीप, व्यवस्थित आणि काटेकोर असतात. तुमची बुद्धिमत्ता व्यवहारात उपयोगी पडते. इतरांसाठी तुम्ही कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकार आणि गुढविद्या आवडतात तसेच धर्म आणि तत्वज्ञान याची देखील आवड आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुम्ही त्याकडे संयमाने बघतात. तुमची उपस्थिती इतरांना आवडते. तुम्ही सावधपणे पावले टाकतात आणि उत्तम सल्लागार असून जीवनातील समस्यांवरती योग्य मार्ग शोधून काढतात.
व्यवसाय:- राजकीय नेते, न्यायाधीश, सचिव, धार्मिक शिक्षक, डॉक्टर, केमिस्ट, शैक्षणिक क्षेत्र.
शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.
शुभ रंग:- पिवळा, जांभळा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथीस्ट आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६.
श्रावण कृष्ण सप्तमी.
पराभव नाम संवत्सर.
शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क – 8087520521)
राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.००
“आज वर्ज्य दिवस आहे.”
नक्षत्र – कृतिका.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष / सकाळी ७.२६ नंतर वृषभ.
आजचा योग – व्याघात योग.
करण – विष्टी करण.
आजचे ग्रहयोग:
चंद्र युती हर्षल.
चंद्र लाभ नेपच्यून.
टीप: नावाप्रमाणेच तुमची राशी असेलच असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आजचा दिवस सावधगिरीचा आहे. चंद्र-हर्षल युतीमुळे अचानक बदल किंवा अनपेक्षित घटना घडू शकतात. महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. सकाळी ७.२६ पूर्वी चंद्र राशीत असल्याने भावनिक अस्थिरता जाणवू शकते. वाहन चालवताना काळजी घ्या.
वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
सकाळी ७.२६ नंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने आत्मविश्वास वाढेल. मात्र चंद्र-हर्षल युतीमुळे मनात अस्वस्थता किंवा अचानक बदल होऊ शकतात. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आज नवीन कामाची सुरुवात टाळलेली चांगली.
मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात. चंद्र-नेपच्यून लाभ योगामुळे कल्पकता वाढेल, मात्र निर्णय घेताना संभ्रम होण्याची शक्यता आहे. कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक तपासा. अनावश्यक खर्च टाळा.
कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
नोकरी-व्यवसायात जबाबदाऱ्या वाढू शकतात. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. सामाजिक क्षेत्रात काही अनपेक्षित बदल संभवतात. वर्ज्य दिवस असल्याने महत्त्वाच्या कामात घाई न करता परिस्थितीचा अंदाज घ्या.
सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
भाग्याच्या बाबतीत दिवस संमिश्र आहे. प्रवासाचे नियोजन पुढे ढकलणे योग्य ठरेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक विषयात रुची वाढेल. चंद्र-नेपच्यून योगामुळे कल्पनाशक्ती वाढेल, मात्र भावनिक निर्णय घेणे टाळा.
कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. अचानक खर्च किंवा अनपेक्षित आर्थिक परिस्थिती निर्माण होऊ शकते. भागीदारीच्या व्यवहारात स्पष्टता ठेवा. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी नीट तपासणी करा.
तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
जोडीदार किंवा व्यावसायिक भागीदारासोबत काही मतभेद होऊ शकतात. चंद्र-हर्षल युतीमुळे संबंधांमध्ये अचानक बदल जाणवू शकतात. शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. नवीन करार टाळणे योग्य.
वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
नोकरी-व्यवसायात कामाचा ताण वाढू शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. चंद्र-हर्षलमुळे कामाच्या पद्धतीत अचानक बदल होऊ शकतात. सहकाऱ्यांशी वाद टाळा आणि महत्त्वाची कामे काळजीपूर्वक करा.
धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
संतती आणि शिक्षणाच्या बाबतीत दिवस संमिश्र राहील. सर्जनशीलतेला चंद्र-नेपच्यून योगामुळे चांगली चालना मिळेल. मात्र प्रेमसंबंधात गैरसमज निर्माण होऊ शकतात. भावनिक निर्णय टाळा.
मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
घरगुती वातावरणात काही अनपेक्षित बदल संभवतात. मालमत्ता किंवा घरासंबंधी निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरेल. चंद्र-हर्षल युतीमुळे मानसिक अस्वस्थता वाढू शकते. ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
संवाद साधताना विशेष काळजी घ्या. भावंडे किंवा जवळच्या व्यक्तींशी गैरसमज होऊ शकतात. प्रवासात अडथळे येण्याची शक्यता आहे. चंद्र-नेपच्यून योगामुळे कल्पकता वाढेल, त्यामुळे लेखन आणि सर्जनशील कार्यासाठी दिवस चांगला आहे.
मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. चंद्र-नेपच्यून लाभ योगामुळे काही चांगल्या संधी दिसतील, मात्र त्यातील वास्तवता तपासणे आवश्यक आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल. वर्ज्य दिवस असल्याने मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा.
— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
8087520521
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, विवाह, स्वभाव, भाग्योदय, आरोग्य, शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षणासाठी संपर्क करा – 8087520521.

Comments
Post a Comment