आजचे राशीभविष्य
शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६.
शुभ कालावधी
सकाळी ८.२४ ते सकाळी ९.२७ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
सकाळी ९.२७ ते सकाळी १०.३० - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
सकाळी १०.३० ते सकाळी ११.३३ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.
दुपारी ११.३३ ते दुपारी १२.३३ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
दुपारी १२.३३ ते दुपारी १.३६ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
दुपारी १.३६ ते दुपारी २.३८ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.
दुपारी २.३८ ते दुपारी ३.४० - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
दुपारी ३.४० ते दुपारी ४.४३ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
दुपारी ४.४३ ते संध्याकाळी ५.४५ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
सप्टेंबर २०२६ महिन्यातील मुहूर्त:-
साखरपुडा ;-१२,१३,१५, १७,१९,२१,२३,२६
डोहाळजेवण:- १३,१६,१७
बारसे:- १२,१३,१५,१७,२१,२३, २४
जावळ:- १३,२३,२४,२५.
गृहप्रवेश :- १२,१३,१७,१९,२१,२३, २४.
४ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल आणि बुध ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात आणि विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. तुम्हाला काही विलक्षण घटनांचा जीवनात अनुभव येतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे आणि व्यापारी वृत्ती आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि शास्त्रीय आहे. उत्साह, प्रगती आणि जोम ही तुमचे वैशिष्ट्ये आहेत. जीवनात अनेक चढउतार अनुभव येतात. कोणत्याही कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम नियोजन करतात. मानवतेच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला नाविन्य आणि प्रवासाची आवड असते. तुम्हाला जुन्या परंपरा आणि रूढी आवडत नाहीत. जीवनात सतत बदल असावा असा तुमचा विचार असतो. तुमचा मित्र परिवार सतत बदलत असतो. तुम्ही अहंकार आणि हट्टीपणा टाळला पाहिजे आणि डोके शांत ठेवून काम केले पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये ठामपणे असतो.
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, इंटरियर डेकोरेटर, राजदूत, बँकिंग, आयात निर्यात, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, डॉक्टर, कान -नाक- डोळे स्पेशालिस्ट, संशोधन, ज्योतिष.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार आणि शनिवार.
शुभ रंग:- तपकिरी, निळा आणि पांढरा.
शुभ रत्न:- हिरा, पोवळे आणि मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६.
श्रावण कृष्ण अष्टमी.
पराभव नाम संवत्सर.
शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क – 8087520521)
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
“आज उत्तम दिवस आहे.”
नक्षत्र – रोहिणी.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृषभ.
ग्रहयोग:
चंद्र केंद्र बुध.
चंद्र लाभ गुरू.
चंद्र लाभ शनी.
टीप: नावाप्रमाणेच तुमची राशी असेलच असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष :- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
आर्थिक बाबतीत चांगली प्रगती होईल. चंद्र-गुरू लाभ योगामुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
वृषभ :- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. चंद्र-बुध केंद्र योगामुळे बुद्धिमत्ता आणि निर्णयक्षमता वाढेल. चंद्र-गुरू व चंद्र-शनी लाभ योगामुळे आर्थिक आणि व्यावसायिक प्रगती होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे.
मिथुन :- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतील. परदेशाशी संबंधित कामात प्रगती होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. चंद्र-बुध योगामुळे लेखन, वाचन आणि संवादाच्या कामात यश मिळेल.
कर्क :- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
सिंह :- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. चंद्र-गुरू लाभ योगामुळे भाग्याची साथ लाभेल. महत्त्वाच्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल.
कन्या :- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. उच्च शिक्षणाशी संबंधित कामात यश मिळेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.
तुळ :- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
आर्थिक व्यवहारात लाभ मिळेल. अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या कामात यश मिळेल. कर्ज किंवा जुने आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.
वृश्चिक :- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
जोडीदार आणि भागीदारांचे सहकार्य लाभेल. चंद्र-गुरू लाभ योगामुळे संबंधांमध्ये सकारात्मकता राहील. व्यवसायातील महत्त्वाची चर्चा यशस्वी होईल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
धनु :- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
नोकरीच्या ठिकाणी कामाचा वेग वाढेल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. चंद्र-शनी लाभ योगामुळे स्पर्धेत यश मिळवण्याची संधी आहे. आरोग्याची योग्य काळजी घ्या.
मकर :- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. सर्जनशील कामात यश मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. चंद्र-गुरू लाभ योगामुळे आर्थिक लाभाची संधी मिळेल.
कुंभ :- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
घरगुती वातावरण आनंददायी राहील. मालमत्ता किंवा वाहनासंबंधी कामात प्रगती होईल. कुटुंबातील ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. मानसिक समाधान मिळेल.
मीन :- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
पराक्रम आणि आत्मविश्वास वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. चंद्र-बुध केंद्र योगामुळे संवादकौशल्याचा चांगला उपयोग होईल. लहान प्रवास आणि व्यावसायिक संपर्क लाभदायक ठरतील.
— ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
8087520521
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, विवाह, स्वभाव, भाग्योदय, आरोग्य, शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षणासाठी कृपया संपर्क करा – 8087520521.


Comments
Post a Comment