आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 रविवार, ६ सप्टेंबर २०२६



 *शुभ कालावधी*


सकाळी ८.२४ ते सकाळी ९.२६ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  

 

सकाळी ९.२६ ते सकाळी १०.२९ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 


सकाळी १०.२९ ते सकाळी ११.३० - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.


सकाळी ११.३० ते दुपारी १२.३३ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.



दुपारी १२.३३ ते दुपारी १.३५ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.


दुपारी १.३५ ते दुपारी २.३७ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.


दुपारी २.३७ ते दुपारी ३.३९ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.


दुपारी ३.३९ ते दुपारी ४.४१ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.


सप्टेंबर २०२६ महिन्यातील मुहूर्त:-


साखरपुडा ;-१२,१३,१५, १७,१९,२१,२३,२६


डोहाळजेवण:- १३,१६,१७


बारसे:- १२,१३,१५,१७,२१,२३, २४


जावळ:- १३,२३,२४,२५.


गृहप्रवेश :- १२,१३,१७,१९,२१,२३, २४.


६ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर शुक्र आणि बुध ग्रहाचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही एक बुद्धिमान कलाकार असतात. तुमच्या कलेचा तुम्ही व्यवसायिक दृष्ट्या पूर्ण वापर करतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असते आणि त्याचा उपयोग व्यवसायात होतो. तुमचा सहवास इतरांना सुखावतो. नीती आणि अनिती याबद्दलच्या तुमच्या कल्पना जरा वेगळ्या असतात त्यामुळे इतरांना त्या समजत नाहीत. तुम्ही जुन्या परंपरा पाळत नाहीत. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतःच घेतात. तुमचे वक्तृत्व चांगले असते. जीवनात तुम्हाला अधिकार आणि मानसन्मान मिळतो. तुमचे आयुष्य आरामदायक आणि भौतिक सुखाने पूर्ण असते. उत्तम कपडे, सुगंधीत द्रव्य आणि महागड्या गाड्यांची तुम्हाला आवड असते. प्रेमात तुम्ही संशयी असतात.


व्यवसाय:-  संगीतकार, दागिने विक्री, आर्किटेक्ट, बेकरी, हॉटेल मॅनेजमेंट, बँकिंग, मेडिकल स्टोअर्स, शेअर ब्रोकर, कमिशन एजंट, इस्टेट ब्रोकर.


शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.


शुभ रंग:- निळा आणि गुलाबी.


शुभ रत्न:- पाच मोती आणि हिरा.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


रविवार, ६ सप्टेंबर २०२६.

श्रावण कृष्ण दशमी / एकादशी. हेमंत ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.

उत्तरायण.

राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

(संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज सकाळी ९.०० पर्यंत चांगला दिवस आहे"


चंद्रनक्षत्र - आर्द्रा / पुनर्वसू.

आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन.


ग्रहयोग:

रवी लाभ चंद्र.

चंद्र युती मंगळ.

चंद्र केंद्र शनी.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

आज सकाळी ९.०० पर्यंत अनुकूल ग्रहमानाचा लाभ घ्या. भाग्याची साथ मिळेल. महत्त्वाची कामे सकाळच्या सत्रात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर कामाचा ताण वाढू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.


वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. अचानक खर्च किंवा अनपेक्षित जबाबदारी येऊ शकते. चंद्र-मंगळ युतीमुळे घाईघाईने निर्णय घेऊ नका. वाहन आणि यंत्रसामग्री वापरताना काळजी घ्या.


मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. रवी-चंद्र लाभ योगामुळे सकाळी ९.०० पर्यंत चांगल्या संधी मिळतील. मात्र चंद्र-मंगळ युतीमुळे क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. महत्त्वाची कामे सकाळी पूर्ण करा.


कर्क:-(हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. चंद्र केंद्र शनीमुळे कामाचा ताण जाणवेल. आरोग्याची काळजी घ्या. सकाळचा वेळ महत्त्वाच्या कामांसाठी वापरा.


सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सर्जनशील कामात प्रगती होईल. सकाळी ९.०० पूर्वी महत्त्वाच्या योजना पुढे न्या.


कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. सरकारी किंवा महत्त्वाची कामे सकाळच्या सत्रात पूर्ण करणे योग्य ठरेल. चंद्र-मंगळ युतीमुळे वाद टाळा.


तुळ:-(रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

भाग्याची साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यात रुची वाढेल. नवीन संपर्कातून फायदा होऊ शकतो. सकाळी ९.०० पर्यंत अनुकूल ग्रहमानाचा सदुपयोग करा.


वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. अचानक खर्च वाढू शकतो. चंद्र-मंगळ युतीमुळे आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका. जुन्या आर्थिक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करता येतील.


धनु:-(ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

भागीदारी आणि वैवाहिक जीवनात संयम आवश्यक आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल, मात्र चंद्र-मंगळ युतीमुळे किरकोळ मतभेद होऊ शकतात. व्यवसायातील महत्त्वाच्या चर्चा सकाळी पूर्ण करा.


मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

नोकरी-व्यवसायात कामाचा ताण वाढेल. चंद्र केंद्र शनीमुळे जबाबदाऱ्या वाढतील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि अनावश्यक तणाव टाळा.


कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. सर्जनशील क्षेत्रात यश मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक वातावरण राहील. सकाळी ९.०० पर्यंत आर्थिक किंवा महत्त्वाचे निर्णय घेणे लाभदायक ठरेल.


मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

घरगुती वातावरणात काही जबाबदाऱ्या वाढतील. मालमत्ता किंवा घरासंबंधी कामात प्रगती होईल. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. चंद्र-मंगळ युतीमुळे घरातील वाद टाळा आणि शांतता राखा.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

8087520521



कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments