आजचे राशीभविष्य
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६
शुभ कालावधी
सकाळी ८.२४ ते सकाळी ९.२६ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, नवीन व्यवसाय सुरुवात, शुभ कामे, घर खरेदी, धार्मिक विधी, तीर्थयात्रा.
सकाळी ९.२६ ते सकाळी १०.२८ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, ऑपरेशन्स, औषध योजना, रासायनिक पृथक्करण.
सकाळी १०.२८ ते सकाळी११.३० - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे, उच्च शिक्षण, सरकारी कामे, कायदा, व्यवस्थापन.
सकाळी ११.३० ते दुपारी १२.३२ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, वाहन खरेदी, कपडे, आभूषणे, चैनीच्या वस्तू खरेदी, गृहसजावट, वास्तू, महागड्या वस्तूंची खरेदी, सहल.
दुपारी १२.३२ ते दुपारी १.३४ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण, मोबाइल खरेदी, संगणक, ट्रान्सपोर्ट वाहन खरेदी, कायदा, वकिली, रसायने, विमा पोलिसी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रसिद्धी, अँप्स बनवणे.
दुपारी १.३४ ते दुपारी २.३६ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता, रत्ने खरेदी, संगीत, प्रेम, नातेसंबंध.
दुपारी २.३६ ते दुपारी ३.३९ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग, देणे फेडणे, पूर्वजांचे स्मरण, माघार घेणे, तह, शांतता करार,
दुपारी ३.३९ ते दुपारी ४.४१ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, नवीन व्यवसाय सुरुवात, शुभ कामे, घर खरेदी, धार्मिक विधी, तीर्थयात्रा.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
सप्टेंबर २०२६ महिन्यातील मुहूर्त:-
साखरपुडा ;-१२,१३,१५, १७,१९,२१,२३,२६
डोहाळजेवण:- १३,१६,१७
बारसे:- १२,१३,१५,१७,२१,२३, २४
जावळ:- १३,२३,२४,२५.
गृहप्रवेश :- १२,१३,१७,१९,२१,२३, २४.
७ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर बुध आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही मनातून कायम अस्वस्थ असतात. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतात. तुमचे ध्येय आणि महत्त्वाकांक्षा उच्च प्रतीचे असतात. परंपरागत रुढीन बद्दल तुम्हाला तिरस्कार असतो. मैदानी खेळ आणि प्रवास यांची आवड असते. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगणे तुम्हाला आवडते. तुम्ही चटपटीत असून तुम्हाला आळशी पण आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि विचार तर्कशुद्ध असतात. तुमचा दूर देशाशी किंवा परदेशाशी संबंध येतो. तुम्ही सर्वसाधारण लोकांमध्ये सहजासहजी मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकात तुम्ही तासान तास डोकं घालून बसतात. स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुमची वृत्ती साशंक असते आणि खात्री झाल्याशिवाय तुम्ही कोणावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. तुमच्यामध्ये धूर्त व्यापार वृत्ती असते. तुम्ही तुमचा अहंकार जोपासतात. मनाने तुम्ही मोकळे असून कृतीत मुक्तपणा असावा असे तुम्हाला वाटते. तुम्ही अस्वस्थता निर्माण करणाऱ्या भावनांना आवर घातला पाहिजे कारण तुमच्याकडून इतरांना स्फूर्ती मिळते.
व्यवसाय:- दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक, वैद्यकीय क्षेत्र, आयात निर्यात, परदेशाशी संबंधित व्यवसाय.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार.
शुभ रंग:- पिवळा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, मोती आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
सोमवार, ७ सप्टेंबर २०२६
श्रावण कृष्ण एकादशी. वर्षा ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
चंद्र नक्षत्र - पुनर्वसू / पुष्य.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - मिथुन / दुपारी १२.३९ नंतर कर्क. (व्यतिपात / वरिया योग)
सकाळी ७.०० नंतर चांगला दिवस आहे. चंद्र पुनर्वसू नक्षत्रात असून दुपारी १२.३९ नंतर पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. *अजा एकादशी.*
चंद्र लाभ बुध.
चंद्र केंद्र शुक्र.
चंद्र त्रिकोण नेपच्यून.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-
कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त होतील. वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल घडतील. महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क वाढतील. निर्णय घेताना भावनेपेक्षा व्यवहाराला प्राधान्य द्या.
वृषभ:-
नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक नियोजनातून फायदा होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. अनावश्यक खर्च टाळा.
मिथुन:-
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. चंद्र-बुध लाभ योगामुळे बुद्धिमत्ता आणि संवादकौशल्याचा चांगला उपयोग होईल. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी लाभदायक ठरतील. नवीन संधींचा फायदा घ्या. दुपारी १२.३९ नंतर मानसिक स्थैर्य वाढेल.
कर्क:-
दुपारी १२.३९ नंतर राशीस्थानी चंद्र येत असल्याने उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. चंद्र-शुक्र केंद्र योगामुळे कौटुंबिक आणि सामाजिक संबंध सुधारतील. आर्थिक बाबतीत लाभदायक संधी मिळतील. महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या.
सिंह:-
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. दूरच्या प्रवासाचे किंवा महत्त्वाच्या कामाचे नियोजन होऊ शकते. मनातील संभ्रम दूर करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा.
कन्या:-
नोकरी-व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन संपर्क भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मात्र कोणत्याही व्यवहारात कागदपत्रांची योग्य तपासणी करा.
तुळ:-
व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. चंद्र-शुक्र केंद्र योगामुळे संबंधांमध्ये सकारात्मकता राहील. कामाचा ताण वाढला तरी योग्य नियोजन केल्यास यश मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक:-
भाग्याची साथ लाभेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. उच्च शिक्षण, ज्ञानवृद्धी आणि प्रवासासाठी दिवस अनुकूल आहे. महत्त्वाच्या व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका.
धनु:-
आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. जुनी रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे किंवा कुटुंबातील व्यक्तीचे सहकार्य लाभेल. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
मकर:-
नोकरी-व्यवसायात सहकार्य मिळेल. भागीदारीच्या कामात सकारात्मक परिणाम मिळतील. महत्त्वाच्या चर्चा यशस्वी होऊ शकतात. जोडीदाराची साथ लाभेल. चंद्र-शुक्र केंद्र योगामुळे संबंधांमध्ये गोडवा वाढेल.
कुंभ:-
कामाचा व्याप वाढेल, मात्र मेहनतीचे योग्य फळ मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत शिस्त आणि योग्य नियोजन ठेवल्यास फायदा होईल.
मीन:-
व्यावसायिक आणि आर्थिक क्षेत्रात चांगल्या संधी मिळतील. नवीन संपर्कातून फायदा होऊ शकतो. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. सर्जनशील कार्यात प्रगती होईल. चंद्र-नेपच्यून त्रिकोणामुळे कल्पनाशक्ती वाढेल; मात्र महत्त्वाचे निर्णय घेताना वास्तवाचा विचार करा.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
8087520521


Comments
Post a Comment