आजचे राशीभविष्य
मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६.
शुभ कालावधी
सकाळी ८.२४ ते सकाळी ९.२६ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, वाहन खरेदी, कपडे, आभूषणे, चैनीच्या वस्तू खरेदी, गृहसजावट, वास्तू, महागड्या वस्तूंची खरेदी, सहल, नृत्य, करमणूक.
सकाळी ९.२६ ते सकाळी १०.२८ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण, मोबाइल खरेदी, संगणक, ट्रान्सपोर्ट वाहन खरेदी, कायदा, वकिली, रसायने, विमा पोलिसी, इलेक्ट्रॉनिक्स, प्रसिद्धी, अँप्स बनवणे,
सकाळी १०.२८ ते सकाळी ११.३० - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता, रत्ने खरेदी, संगीत, प्रेम, नातेसंबंध.
सकाळी ११.३० ते दुपारी १२.३२ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग, देणे फेडणे, पूर्वजांचे स्मरण, माघार घेणे, तह, शांतता करार,
दुपारी १२.३२ ते दुपारी १.३४ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, नवीन व्यवसाय सुरुवात, शुभ कामे, घर खरेदी, धार्मिक विधी, तीर्थयात्रा.
दुपारी १.३४ ते दुपारी २.३६ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, ऑपरेशन्स, औषध योजना, रासायनिक पृथक्करण.
दुपारी २.३६ ते दुपारी ३.३८ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे, उच्च शिक्षण, सरकारी कामे, कायदा, व्यवस्थापन.
दुपारी ३.३८ ते दुपारी ४.४० - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, वाहन खरेदी, कपडे, आभूषणे, चैनीच्या वस्तू खरेदी, गृहसजावट, वास्तू, महागड्या वस्तूंची खरेदी, सहल, नृत्य, करमणूक.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
८ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर शनि आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे जीवनात बऱ्याच वेळेला कोणतीही गोष्ट वेळच्यावेळी होत नाही. शिस्त, गांभीर्य, दृढपणा आणि कर्तव्याची जाण तुमच्यामध्ये आहे. तुम्ही अत्यंत विचारी आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुमचे विचार समतोल असून कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू बघण्याकडे तुमचा कल असतो. तुमच्याबद्दल इतरांचे बरेच गैरसमज होतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून सतत कामात मग्न राहणे तुम्हाला आवडते. तुम्ही धोरणी, हुशार, कार्यशील आणि दुर्बल लोकांबद्दल आदर दाखवणारे आहात. तुम्हाला निसर्ग सौंदर्य, फुले आणि संगीत यांची आवड असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात आणि इतरांकडून काम करून घेणे तुम्हाला चांगले जमते. तुम्ही न्यायप्रिय आहात मात्र तुम्हाला अनेकदा नैराश्य जाणवते आणि जीवनामध्ये एकाकी वाटते. तुमच्यामध्ये अधिकार, वचक आणि जोम या गोष्टी भरपूर आहेत. व्यवहारातील सर्व गोष्टी सुलभ पणे हाताळण्यात तुम्हाला यश येते. आर्थिक बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक नियोजन करतात, इतरांना तुमची मदत होते कारण इतरांचे दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. आपण जीवनात अधिकार गाजवावे असे तुम्हाला कायम वाटते. तुम्ही दिर्घउद्योगी आहात. लोकांची नावे आणि चेहरे लक्षात ठेवण्यात तुम्ही तरबेज असतात.
व्यवसाय:- भौतिक, रसायन, वैद्यकीय शास्त्र, गणित, पतपेढी व्यवस्थापक, पॅथॉलॉजी, जिथे तर्कनिष्ठता आणि बुद्धी लागते असे क्षेत्र तसेच वकिली.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.
शुभ रंग:- निळा, जांभळा, हिरवा, राखाडी.
शुभ रत्न:- इंद्रनील, पाचू लसण्या, अमेथीस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
मंगळवार, ८ सप्टेंबर २०२६
श्रावण कृष्ण द्वादशी / त्रयोदशी. वर्षा ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
(संपर्क - 8087520521)
राहुकाळ - दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
दुपारी ३.०० पर्यंत चांगला दिवस आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. नियोजनपूर्वक आणि शांतपणे केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. दुपारनंतर निर्णय घेताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. *भौम प्रदोष*
चंद्रनक्षत्र - पुष्य / दुपारी ४.४० नंतर आश्लेषा.
चंद्र राशी - कर्क.
चंद्र युती गुरू.
चंद्र त्रिकोण शनी.
चंद्र लाभ हर्षल.
टीप:
नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल घडतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.
वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभाचे योग आहेत. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या व्यक्तींच्या संपर्कातून फायदा होईल. खर्चाचे योग्य नियोजन करा.
मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
कामातील अडचणी दूर होतील. संवादकौशल्याचा चांगला उपयोग होईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक व्यवहारात फायदा होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे दुपारी ३.०० पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
राशीस्थानी चंद्रामुळे आत्मविश्वास वाढेल. चंद्र-गुरू युतीमुळे योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक विचार मिळतील. चंद्र-शनी त्रिकोणामुळे संयम आणि स्थिरता वाढेल. चंद्र-हर्षल लाभ योगामुळे अचानक चांगली संधी मिळू शकते. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. जुन्या कामांना गती मिळेल. मानसिक ताण कमी करण्यासाठी विश्रांतीला महत्त्व द्या.
कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
नोकरी-व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन संपर्क भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. महत्त्वाच्या कामात योग्य नियोजन करा.
तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक बाबतीत फायदा होऊ शकतो. कामाचा ताण वाढला तरी संयम ठेवा.
वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
भाग्याची साथ लाभेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. उच्च शिक्षण आणि ज्ञानवृद्धीसाठी दिवस अनुकूल आहे. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका.
धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. कामातील अडथळे दूर करण्यासाठी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. दुपारी ३.०० पूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करा.
मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या चर्चा सकारात्मक होतील. नवीन करार किंवा योजना पुढे नेण्यासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
नोकरी-व्यवसायात मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कामाचा व्याप वाढेल, मात्र कार्यक्षमता चांगली राहील. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा.
मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
सर्जनशील कार्यात यश मिळेल. संततीकडून आनंददायक बातमी मिळू शकते. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक वातावरणात सकारात्मकता राहील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. अचानक मिळणाऱ्या संधींचा योग्य फायदा घ्या.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
8087520521

Comments
Post a Comment