आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

 बुधवार, ९ सप्टेंबर २०२६.





 शुभ कालावधी


सकाळी ८.२३ ते सकाळी ९.२७ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.


सकाळी ९.२७ ते सकाळी १०.२८ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.


सकाळी १०.२८ ते सकाळी ११.३० - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.


सकाळी ११.३० ते दुपारी १२.३०  - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.


दुपारी १२.३० ते दुपारी १.३४ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.


दुपारी १.३४ ते दुपारी २.३५ - बुध -  व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,  

 

दुपारी २.३५ ते दुपारी ३.३७ - चंद्र -  चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता. 


दुपारी ३.३७ ते दुपारी ४.३९ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग, पूर्वज, दानधर्म.


दुपारी ४.३९ ते संध्याकाळी ५.४१ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म, तीर्थयात्रा, प्राणायाम, दैवी उपासना.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क - 8087520521


९ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर मंगळ आणि बुध या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही आक्रमक, धाडसी आणि तडफदार आहात. लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्ही विनाकारण इतरांची कुरापत काढतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून आपल्या विषयाची संपूर्ण माहिती तुम्हाला असते. स्वतःच्या कर्तृत्वावर तुमचा विश्वास असतो आणि ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. अनेकदा तुम्ही उतावळेपणाने नवीन नवीन योजनांमध्ये प्रवेश करतात. संभाषण कलेत तुम्ही प्रवीण आहात. तुम्हाला जीवनामध्ये अधिकार आणि मानसन्मान मिळतो. अनेकदा तुमची चूक तुम्ही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळ आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. तुम्हाला गरिबांवर दया करण्यात एक आनंद मिळतो. आजारी लोकांना तुम्ही स्वतःच्या इच्छाशक्तीने बरे करू शकतात. तुम्ही तापट आहात मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतात. तुमचे विचार ठाम असतात आणि त्यात नैतिकता असते. तुम्हाला तुमचे कुटुंब प्रिय असते आणि कायद्याचे पालन करणे आवडते. तुम्ही अत्यंत विश्वासू आहात आणि जबाबदारीच्या जागा सांभाळू शकतात. तुम्ही पोकळ दिमाख, गर्व, अहंकार, खोटा अभिमान टाळला पाहिजे तसेच इतरांवर टीका करताना शब्द काळजीपूर्वक वापरावेत.


व्यवसाय:-  राजकीय क्षेत्र, डॉक्टर, केमिस्ट, लोखंडाशी संबंधित व्यवसाय, इंजीनियरिंग, खाण, बांधकाम, पुढारी.


शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.


शुभ रंग:- तांबडा, हिरवा आणि पिवळा.


शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


बुधवार, ९ सप्टेंबर २०२६


श्रावण कृष्ण त्रयोदशी / दुपारी १२.३१ नंतर चतुर्दशी. वर्षा ऋतू.

पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.


राशिभविष्य – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क – 8087520521


राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०


आज वर्ज्य दिवस आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे, नवीन करार किंवा मोठे निर्णय शक्यतो टाळावेत. नियमित कामकाज मात्र नियोजनपूर्वक करता येईल. दुपारी ३.१५ नंतर चंद्र सिंह राशीत प्रवेश करेल. शांतपणे आणि विचारपूर्वक काम केल्यास दिवसाचा योग्य उपयोग करता येईल.


नक्षत्र – आश्लेषा / दुपारी ३.१५ नंतर मघा.

चंद्र राशी – कर्क / दुपारी ३.१५ नंतर सिंह.


चंद्र लाभ शुक्र.


टीप:

नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)

कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांशी संवाद साधताना संयम ठेवा. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. दुपारी ३.१५ नंतर कामात उत्साह वाढेल. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकला.


वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)

आर्थिक बाबतीत चांगली संधी मिळू शकते. चंद्र-शुक्र लाभ योगामुळे आर्थिक नियोजनातून फायदा होईल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. अनावश्यक खर्च टाळा.


मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)

नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. नवीन संपर्क उपयोगी ठरतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची योग्य तपासणी करा. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.


कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)

राशीस्थानी चंद्र असल्याने मनात काही संभ्रम निर्माण होऊ शकतो. चंद्र-शुक्र लाभ योगामुळे आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत फायदा होईल. दुपारी ३.१५ नंतर चंद्र राशी बदलणार असल्याने कामात नवीन उत्साह येईल. शांतपणे निर्णय घ्या.


सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)

दुपारी ३.१५ नंतर राशीस्थानी चंद्र येत असल्याने आत्मविश्वास वाढेल. चंद्र-शुक्र लाभ योगामुळे सामाजिक आणि आर्थिक बाबतीत अनुकूल परिणाम मिळतील. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. मात्र वर्ज्य दिवस असल्याने मोठे निर्णय टाळा.


कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)

कामातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. कौटुंबिक वातावरणात संयम राखा.


तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)

नोकरी-व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. चंद्र-शुक्र लाभ योगामुळे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन योजना आखता येतील; मात्र प्रत्यक्ष सुरुवात करण्यास घाई करू नका.


वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)

व्यावसायिक क्षेत्रात जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. मानसिक ताण कमी करण्यासाठी विश्रांतीला महत्त्व द्या. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला.


धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)

भागीदारीच्या कामात काही नवीन संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे नियोजन होऊ शकते. चंद्र-शुक्र लाभ योगामुळे सामाजिक संपर्कातून फायदा होईल. अनावश्यक वाद टाळा.


मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)

नोकरी-व्यवसायात मेहनत वाढवावी लागेल. वरिष्ठांच्या सूचनांकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.


कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)

विद्यार्थ्यांसाठी दिवस मिश्र स्वरूपाचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. सर्जनशील कार्यात नवीन कल्पना सुचतील. मित्रांचे सहकार्य लाभेल. वर्ज्य दिवस असल्याने महत्त्वाचे निर्णय टाळणे योग्य ठरेल.


मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)

कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. चंद्र-शुक्र लाभ योगामुळे घरगुती आणि आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम मिळतील. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. भावनिक निर्णय घेणे टाळा.


ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.

संपर्क – 8087520521

Comments