आजचे राशीभविष्य
शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६
शुभ कालावधी
सकाळी ८.२४ ते सकाळी ९.२६ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
सकाळी ९.२६ ते सकाळी १०.३० - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
सकाळी १०.३० ते सकाळी ११.२९ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.
दुपारी ११.२९ ते दुपारी १२.३१ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
दुपारी १२.३१ ते दुपारी १.३३ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
दुपारी १.३३ ते दुपारी २.३४ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.
दुपारी २.३४ ते दुपारी ३.३६ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
दुपारी ३.३६ ते दुपारी ४.३८ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
११ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर चंद्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी तुमचा भावनिक आणि काहीसा स्वार्थी दृष्टीकोन असतो. तुम्ही ध्येयवादी आहात आणि तुमच्या मध्ये प्रचंड कल्पनाशक्ती आहे. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुम्ही अतिशय हळवे असून लवकर अस्वस्थ होतात. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही प्रत्यक्षात रूपांतर करू शकतात. तुम्हाला जुगार किंवा कोडे सोडवण्याचा छंद असतो. तुम्ही कष्टाळू पाहणी शांत असतात मात्र तडजोड करत नाहीत. विनाकारण काळजी करण्याचा स्वभाव असून मन कष्टी असते. भाषणे, लेखन आणि श्रुतिका लिहिणे तुम्हा आवडते. तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुम्हाला मानसन्मान मनापासून आवडतात. तुम्ही समाजामध्ये मिसळतात. कोणत्याही गोष्टीतील नावीन्य आणि प्रवासाची तुम्हाला आवड आहे. तुम्ही हुशार आहात आणि शास्त्राची आवड आहे. तुमचा सहवास इतरांना उत्साहवर्धक वाटतो. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला बरे आणि वाईट नीटपणे समजते. नवनवीन कल्पना आणि भरपूर उत्साह यांचा संगम झाल्याने तुम्ही मोठमोठ्या प्रकल्पात काम करू शकतात. तुम्हाला स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. तुमचा स्वभाव विनम्र असून तुम्ही कायदा प्रेमी आहात. तुम्ही अधिक वयस्कर माणसांकडे आकर्षित होतात.
व्यवसाय:- लेखक, वक्ता, पुढारी, डॉक्टर, केमिस्ट, बँकिंग, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:- पांढरा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६
श्रावण अमावस्या / भाद्रपद शुक्ल प्रतिपदा.
वर्षा ऋतू. पराभव नाम संवत्सर.
शके १९४८, संवत २०८२.
🪔 राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
"आज वर्ज्य दिवस आहे. त्यामुळे नवीन कामाची सुरुवात, महत्त्वाचे आर्थिक व्यवहार आणि मोठे निर्णय शक्यतो टाळावेत. नियमित कामे नियोजनपूर्वक करता येतील. शांतपणे आणि विचारपूर्वक वागल्यास दिवस समाधानकारक जाईल."
🌙 चंद्रनक्षत्र - पूर्वा फाल्गुनी / उत्तरा फाल्गुनी.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी - सिंह / संध्याकाळी ७.०८ नंतर कन्या.
🔭 रवी युती चंद्र.
🔭 चंद्र लाभ मंगळ.
📌 टीप:- नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. चंद्र-मंगळ लाभ योगामुळे प्रयत्नांना चांगले यश मिळेल. घाईघाईने निर्णय घेणे टाळा.
वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आर्थिक बाबतीत लाभाचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. खर्चाचे योग्य नियोजन करा.
मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. संवादकौशल्याचा चांगला उपयोग होईल. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी लाभदायक ठरतील. चंद्र-मंगळ लाभ योगामुळे आर्थिक बाबतीत फायदा होऊ शकतो.
कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
कामात उत्साह राहील. वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारातून लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह:- (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. रवी-चंद्र युतीमुळे मनात काही चढ-उतार जाणवू शकतात. चंद्र-मंगळ लाभ योगामुळे कार्यक्षमता आणि धाडस वाढेल. नवीन संधी मिळतील; मात्र वर्ज्य दिवस असल्याने मोठे निर्णय टाळा.
कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
संध्याकाळी ७.०८ नंतर राशीस्थानी चंद्र येणार असल्याने आत्मविश्वास वाढेल. आर्थिक बाबतीत सकारात्मक बदल घडतील. कामातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न यशस्वी होतील. अनावश्यक चिंता टाळा.
तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
नोकरी-व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नवीन संपर्क भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. महत्त्वाची कामे विचारपूर्वक करा.
वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
कामाचा ताण वाढेल, मात्र मेहनतीचे योग्य फळ मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यातून मानसिक समाधान मिळेल.
धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भागीदारीच्या कामात सहकार्य मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. नवीन योजना आखण्यासाठी दिवस योग्य आहे; मात्र त्यांची अंमलबजावणी करताना घाई करू नका. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे.
मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. कामातील अडचणी दूर होतील. आर्थिक नियोजनावर भर द्या.
कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
सर्जनशील कार्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. नवीन कल्पनांचा योग्य उपयोग करता येईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवा.
मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. चंद्र-मंगळ लाभ योगामुळे प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. भावनिक निर्णय घेणे टाळा.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
📞 8087520521

.jpg)
Comments
Post a Comment