शिंगणापूरच्या श्री पंचगंगा दूध संस्थेच्या चेअरमनपदी भगवान पाटील; व्हा. चेअरमनपदी दीपक पाटील यांची निवड

 शिंगणापूरच्या श्री पंचगंगा दूध संस्थेच्या चेअरमनपदी भगवान पाटील; व्हा. चेअरमनपदी दीपक पाटील यांची निवड 



कोल्हापूर (शिंगणापूर) २३ सिटी न्यूज नेटवर्क 

शिंगणापूर ता . करवीर येथील श्री पंचगंगा दूध संस्थेच्या चेअरमनपदी भगवान पाटील, तर व्हा. चेअरमनपदी दीपक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते चेअरमन प्रकाश चौगले आणि व्हा. चेअरमन अर्जुन गुरव यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या दोन्ही पदांसाठी ही निवड प्रक्रिया पार पडली.



निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सुभाष पाटील होते. यावेळी अमर पाटील, रविंद्र पाटील आणि जोतिराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन्ही पदांसाठी एकमताने निवड झाल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.



दरम्यान, नूतन चेअरमन भगवान पाटील आणि व्हा. चेअरमन दीपक पाटील यांचा बौद्ध समाज आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


सत्कार कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासो कांबळे, हौसिंग सोसायटीचे चेअरमन तुषार कांबळे, बुद्ध विहारचे अध्यक्ष विजय यशपुत्त, माजी उपसरपंच कौतुक कांबळे, नालंदाचे अध्यक्ष रामचंद्र कांबळे, राजेंद्र कांबळे, धोंडीराम कांबळे आणि अनिल कांबळे आदी उपस्थित होते.


नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ, सभासद आणि विविध मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले.

Comments