आजचे राशीभविष्य
रविवार, १३ सप्टेंबर २०२६.
शुभ कालावधी
सकाळी ८.२६ ते सकाळी ९.२९ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
सकाळी ९.२९ ते सकाळी १०.३२ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
सकाळी १०.३२ ते सकाळी ११.३३ - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
सकाळी ११.३३ ते दुपारी १२.३५ - गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.
दुपारी १२.३५ ते दुपारी १.४० - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
दुपारी १.४० ते दुपारी २.४१ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
दुपारी २.४१ ते दुपारी ३.४३ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी.
दुपारी ३.४३ ते दुपारी ४.४६ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
![]() |
१३ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर हर्षल आणि बुध ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्हाला मोठ्या हुद्द्याच्या जागा मिळतात. तुम्ही चांगले पैसे कमवतात. तुमच्यात चिकाटी असते. इच्छाशक्ती प्रबळ असते. शरीर सुदृढ, स्मरणशक्ती चांगली असते. स्वतःच्या शक्तीचा तुम्हाला स्वतःला परिचय झाल्यास अशक्य असे काहीच उरत नाही. तुम्हाला कला, साहित्य, वाङ्मय, शास्त्रीय पुस्तके यांची आवड असते. तुम्ही विश्वासू असतात. इतरांबद्दल सहानुभूती असते मात्र तुम्ही जरासे हट्टी असू शकतात.
तुमची शरीरयष्टी चांगली आहे. डोळे बोलके असतात. भिन्न लिंगी व्यक्तीपासून फायदा होतो. मित्र परिवार कमी असतो. वाद विवाद झाल्यास त्याची तुम्ही फिकीर करत नाहीत. स्वतःचा व्यवसाय केल्यास यश मिळते. स्वभाव काहिस अस्थिर असू शकतो. आयुष्यच्या उत्तरार्धात मोठे यश मिळते.
तुमच्या जीवनात आणि विचारांमध्ये अनेकदा विरोधाभास जाणवतो. तुम्हाला काही विलक्षण घटनांचा जीवनात अनुभव येतो. तुम्ही कोणत्याही परिस्थितीला समर्थपणे तोंड देऊ शकतात. तुमचा कामाचा वेग प्रचंड आहे आणि व्यापारी वृत्ती आहे. तुमची विचारसरणी तर्कशुद्ध आणि शास्त्रीय आहे. उत्साह, प्रगती आणि जोम ही तुमचे वैशिष्ट्ये आहेत. जीवनात अनेक चढउतार अनुभव येतात. कोणत्याही कार्यात यश कसे मिळवावे याचे तुम्ही उत्तम नियोजन करतात. मानवतेच्या कल्याणासाठी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करतात. तुम्हाला नाविन्य आणि प्रवासाची आवड असते. तुम्हाला जुन्या परंपरा आणि रूढी आवडत नाहीत. जीवनात सतत बदल असावा असा तुमचा विचार असतो. तुमचा मित्र परिवार सतत बदलत असतो. तुम्ही अहंकार आणि हट्टीपणा टाळला पाहिजे आणि डोके शांत ठेवून काम केले पाहिजे. आर्थिक बाबतीत तुम्ही नशीबवान आहात. तुमच्या शब्दांमध्ये आणि कृतीमध्ये ठामपणे असतो.
व्यवसाय:- जाहिरात माध्यम, इंटरियर डेकोरेटर, राजदूत, बँकिंग, आयात निर्यात, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, डॉक्टर, कान -नाक- डोळे स्पेशालिस्ट, संशोधन, ज्योतिष.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार आणि शनिवार.
शुभ रंग:- तपकिरी, निळा आणि पांढरा.
शुभ रत्न:- हिरा, पोवळे आणि मोती.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या* *कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
रविवार, १३ सप्टेंबर २०२६
भाद्रपद शुक्ल द्वितीय / सकाळी ७.०९ नंतर तृतीया. वर्षा ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521
राहुकाळ - सायंकाळी ४.३० ते ६.००
"आज उत्तम दिवस आहे. महत्त्वाची कामे, आर्थिक व्यवहार आणि नवीन योजना राबवण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आत्मविश्वासाने आणि नियोजनपूर्वक केलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल."
नक्षत्र - हस्त / दुपारी १.०७ नंतर चित्रा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी - कन्या.
चंद्र केंद्र मंगळ.
चंद्र लाभ गुरू.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष: (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
कामात उत्साह वाढेल. महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. चंद्र-मंगळ केंद्र योगामुळे कार्यक्षमता वाढेल; मात्र घाईघाईने निर्णय घेणे टाळा.
वृषभ: (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. स्थावर मालमत्तेसंबंधी कामात प्रगती होईल. चंद्र-गुरू लाभ योगामुळे नवीन संधी मिळतील. महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घ्या.
मिथुन: (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
संवादकौशल्याचा चांगला उपयोग होईल. व्यापारी वर्गासाठी दिवस अनुकूल आहे. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक व्यवहारातून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कर्क: (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. नवीन जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. भावनिक निर्णय घेणे टाळा.
सिंह: (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कामात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत चांगली संधी मिळू शकते. धार्मिक किंवा सामाजिक कार्यात सहभाग वाढेल.
कन्या: (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. चंद्र-मंगळ केंद्र योगामुळे कार्यक्षमता वाढेल. चंद्र-गुरू लाभ योगामुळे आर्थिक लाभ आणि योग्य मार्गदर्शन मिळेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे.
तुळ: (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
आर्थिक व्यवहारात लाभ मिळेल. मित्रांचे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन संपर्क भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. कामातील अडचणी दूर होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक: (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
नोकरी-व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. चंद्र-गुरू लाभ योगामुळे महत्त्वाच्या कामात यश मिळेल. संयमाने काम करा.
धनु: (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
भाग्याची साथ लाभेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. प्रवास लाभदायक ठरेल. उच्च शिक्षण आणि ज्ञानवृद्धीसाठी दिवस अनुकूल आहे. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.
मकर: (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
कामाचा व्याप वाढेल, मात्र मेहनतीचे योग्य फळ मिळेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. चंद्र-मंगळ केंद्र योगामुळे काम करण्याची ऊर्जा वाढेल. अनावश्यक वाद टाळा.
कुंभ: (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
नवीन कल्पनांना चालना मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. नवीन योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी दिवस अनुकूल आहे.
मीन: (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. चंद्र-गुरू लाभ योगामुळे भाग्याची साथ मिळेल.
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक.
संपर्क - 8087520521


Comments
Post a Comment