आजचे राशीभविष्य
१७ सप्टेंबर २०२६
१७ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये, राशिभविष्य शुभ कालावधी आणि मुहूर्त:-
तुमच्यावर शनि आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. त्यामुळे जीवनात बऱ्याच वेळेला कोणतीही गोष्ट वेळच्यावेळी होत नाही. तुमचे ध्येय आणि महत्त्वाकांक्षा उच्च प्रतीच्या असतात. तुम्हाला परंपरा आणि रूढी फारशा आवडत नाहीत. धर्म, परंपरा याबद्दल तुमच्या कल्पना जरा चमत्कारिक असू शकतात. तुम्हाला ठराविक चाकोरीतून जाणे आवडत नाही. तुमचे विचार क्रियाशील आणि विधायक असतात. तुम्ही एक चांगले संघटक आहात. तुम्ही शांतता प्रिय असून लोकांच्या आणि समाजाच्या कल्याणाकरता प्रयत्न करतात. गूढ विद्या, हिप्नॉटिझम अशाबद्दल तुम्हाला आकर्षण असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी असून धाडसी आणि तुम्ही स्वाभिमानी आहात. भावनांच्या बाबतीत मात्र तुम्ही काहीसे थंड असतात. ज्ञान, संशोधन याकडे तुमचा ओढा असतो. काही वेळा तुमच्यातला भित्रेपणा तुम्हाला धक्का देतो याचे मुख्य कारण म्हणजे तुम्हाला नेतृत्व गाजवण्याची हौस असली तरी तुमच्यातील अत्यंत भावनिक गोष्टींचा तुम्हाला विसर पडतो. तुम्ही खूप जोरदार प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वतःच्या कल्पनेत आणि विचारातून तुम्हाला यश मिळते. शिस्त, गांभीर्य, दृढपणा आणि कर्तव्याची जाण तुमच्यामध्ये आहे. तुम्ही अत्यंत विचारी आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुमचे विचार समतोल असून कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू बघण्याकडे तुमचा कल असतो. तुमच्याबद्दल इतरांचे बरेच गैरसमज होतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून सतत कामात मग्न राहणे तुम्हाला आवडते. तुम्ही धोरणी, हुशार, कार्यशील आणि दुर्बल लोकांबद्दल आदर दाखवणारे आहात. तुम्हाला निसर्ग सौंदर्य, फुले आणि संगीत यांची आवड असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात आणि इतरांकडून काम करून घेणे तुम्हाला चांगले जमते. तुम्ही न्यायप्रिय आहात मात्र तुम्हाला अनेकदा नैराश्य जाणवते आणि जीवनामध्ये एकाकी वाटते. तुमच्यामध्ये अधिकार, वचक आणि जोम या गोष्टी भरपूर आहेत. व्यवहारातील सर्व गोष्टी सुलभ पणे हाताळण्यात तुम्हाला यश येते. आर्थिक बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक नियोजन करतात, इतरांना तुमची मदत होते कारण इतरांचे दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. आपण जीवनात अधिकार गाजवावे असे तुम्हाला कायम वाटते. तुम्ही दिर्घउद्योगी आहात. लोकांची नावे आणि चेहरे लक्षात ठेवण्यात तुम्ही तरबेज असतात.
व्यवसाय:- भौतिक, रसायन, वैद्यकीय शास्त्र, गणित, पतपेढी व्यवस्थापक, पॅथॉलॉजी, जिथे तर्कनिष्ठता आणि बुद्धी लागते असे क्षेत्र तसेच वकिली.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.
शुभ रंग:- निळा, जांभळा, हिरवा, राखाडी.
शुभ रत्न:- इंद्रनील, पाचू लसण्या, अमेथीस्ट.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*
*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*
गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६. भाद्रपद शुक्ल षष्ठी / सकाळी १०.४८ नंतर सप्तमी. वर्षा ऋतू. क्रोधीनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
"आज संध्याकाळी ८.०० पर्यंत चांगला दिवस आहे"
चंद्र नक्षत्र - अनुराधा / संध्याकाळी ९.५४ नंतर ज्येष्ठ. राशी - वृश्चिक.
गौरी आवाहन.
चंद्र लाभ बुध, चंद्र त्रिकोण शनी, चंद्र प्रतियुती हर्षल.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रवास घडतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भाग्याची साथ मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. एखादी चांगली बातमी मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहार जपून करा. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) अनुकूल ग्रहमान आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. सरकारी कामे मार्गी लागतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. प्रवास कार्यसाधक ठरतील. कामातील अडथळे दूर होतील. नवीन संधी मिळू शकतात.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) दिवस आनंददायी आहे. संततीकडून चांगली बातमी मिळेल. आर्थिक लाभ होतील. गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नवीन संधी मिळतील. मात्र अनावश्यक घाई टाळा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक बाजू मजबूत होईल. कामात यश मिळेल. शत्रूंचा त्रास कमी होईल. गुपिते कोणाशीही बोलू नका.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) दिवस चांगला आहे. व्यवसायात लाभ होईल. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. प्रेमप्रकरणात संयम ठेवावा.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) घरगुती कामात वेळ जाईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहारात फायदा होईल. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. कलाकारांना चांगल्या संधी मिळतील. सरकारी कामे मार्गी लागतील.
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६. *शुभ कालावधी*
सकाळी ८.२३ ते सकाळी ९.२५ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे, मुलाखत, सरकारी नोकरी.
सकाळी ९.२५ ते सकाळी १०.२८ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, नृत्य, करमणूक.
सकाळी १०.२८ ते सकाळी ११.२९ - बुध - व्यापार, गणित, वाचन, लेखन, बुद्धिमत्ता, ज्योतिषी, मार्केटिंग, भाषण, दळणवळण,
सकाळी ११.२९ ते दुपारी १२.२९ - चंद्र - चांदी, दागिने, पांढरे वस्त्र, प्रवास, कला, प्रेम, द्रव पदार्थ, श्री. महादेव उपासना, प्राणायाम, छंद, मानसिक शांतता.
दुपारी १२.२९ ते दुपारी १.३० - शनी - लोखंड खरेदी, तेल, नोकर चाकर, कष्ट, मेहनत, त्याग.
दुपारी १.३० ते दुपारी २.३१- गुरू - व्यापार, नोकरी, वाणिज्य, शिक्षण, ज्ञान, दानधर्म.
दुपारी २.३१ ते दुपारी ३.३२ - मंगल - जमीन व्यवहार, शेती, क्रीडा, कोर्ट, वादविवाद, स्पर्धा, तंत्रज्ञान.
दुपारी ३.३२ ते दुपारी ४.३३ - सूर्य - राजकारण, शासकीय कामे, धाडस, आक्रमकता, तंटे सोडवणे.
दुपारी ४.३३ ते संध्याकाळी ५.३५ - शुक्र - दागिने खरेदी, प्रवास, कलाविष्कार, प्रेम, विवाह चर्चा, जोडीदाराची साथ, भौतिक सुखे, घर खरेदी, नृत्य, करमणूक.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.
सप्टेंबर २०२६ महिन्यातील मुहूर्त:-
साखरपुडा ;-१२,१३,१५, १७,१९,२१,२३,२६
डोहाळजेवण:- १३,१६,१७
बारसे:- १२,१३,१५,१७,२१,२३, २४
जावळ:- १३,२३,२४,२५.
गृहप्रवेश :- १२,१३,१७,१९,२१,२३, २४.
-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521..

Comments
Post a Comment