आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

२१ सप्टेंबर २०२६



 २१ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर गुरु आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही प्रेमळ असून अपत्यांबद्दल विशेष प्रेम असते. तुमचा उत्साह दांडगा असतो. तुमच्या भोवती एक प्रकारचे वलय असून  लोकांना मोहित करू शकतात. पुरुष व स्त्रिया या दोघांमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. वडिलोपार्जित संपत्तीत तुम्हाला वाटा मिळतो. आध्यत्मिक वृत्ती असते. इतरांना तुम्ही योग्य सल्ला देतात. आयुष्यात उशिरा प्रसिद्धी आणि मन सन्मान मिळतात. तुमचा कल सुखासीन जीवनाकडे असतो. इतरांचे बारीक दोष तुम्ही सहजगत्या काढू शकतात. तुम्हाला आपोआप अधिकार आणि प्रतिष्ठा मिळते. इतरांच्या कारस्थानाला तुम्ही बळी पडतात. तुमच्यात अति महत्वाकांक्षा असते. जास्त बडबड केलेली तुम्हाला आवडत नाही. अनाठायी काळजी कर्णयचा तुमचा स्वभाव असतो. विवाहानंतर भाग्योदय होतो. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून मान मरातब आणि प्रतिष्ठा या गोष्टींची जपणूक करतात. तुम्हाला शुद्ध प्रेम आणि न्याय आवडतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला मोठ्याने बोलण्याची सवय असते. स्वतःबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. तुम्ही धर्माची चिकित्सा डोळसपणे करतात. तुम्ही टापटीप, व्यवस्थित आणि काटेकोर असतात. तुमची बुद्धिमत्ता व्यवहारात उपयोगी पडते. इतरांसाठी तुम्ही कष्ट करतात. तुम्हाला क्रीडा प्रकार आणि गुढविद्या आवडतात तसेच धर्म आणि तत्वज्ञान याची देखील आवड आहे. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन विशाल असून तुम्ही त्याकडे संयमाने बघतात. तुमची उपस्थिती इतरांना आवडते. तुम्ही सावधपणे पावले टाकतात आणि उत्तम सल्लागार असून जीवनातील समस्यांवरती योग्य मार्ग शोधून काढतात.



व्यवसाय:-  राजकीय नेते, न्यायाधीश, सचिव, धार्मिक शिक्षक, डॉक्टर, केमिस्ट, शैक्षणिक क्षेत्र.


शुभ दिवस:- मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.


शुभ रंग:- पिवळा, जांभळा आणि हिरवा.


शुभ रत्न:- पुष्कराज, अमेथीस्ट आणि लसण्या.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*



सोमवार, २१ सप्टेंबर २०२६. भाद्रपद शुक्ल दशमी. पराभवनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


चंद्र नक्षत्र - उ. आषाढ. आज जन्मलेल्या बाळाची राशी - धनु / सकाळी ११.१५ नंतर मकर.


"शुभ दिवस आहे." राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००


रवी त्रिकोण चंद्र, चंद्र प्रतियुती मंगल, चंद्र लाभ नेपच्यून, बुध लाभ गुरू.


मेष:- शुभ ग्रहमान आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.


वृषभ:- अनुकूल दिवस आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रवासाचे योग येतील. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई करू नका.


मिथुन:- संमिश्र दिवस आहे. कामाचा ताण जाणवू शकतो. आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधा. वाहन जपून चालवा.


कर्क:- दिवस चांगला आहे. आत्मविश्वास वाढेल. कामात यश मिळेल. आर्थिक लाभ होतील. घरातील वातावरण आनंदी राहील.


सिंह:- अनुकूल दिवस आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाची कामे आजच पूर्ण करा.


कन्या:- संमिश्र दिवस आहे. मनाप्रमाणे काही घटना घडतील. आर्थिक व्यवहारात सावध राहा. संततीशी संवाद साधा. अनावश्यक खर्च टाळा.


तुळ:- शुभ दिवस आहे. मन आनंदी राहील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. आर्थिक लाभ होतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल.


वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. व्यवसायात प्रगती होईल. नवीन कामांना सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक लाभ होतील. मात्र रागावर नियंत्रण ठेवा.


धनु:- तुमच्याच राशीत चंद्र असल्याने दिवस उत्साहवर्धक आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. धाडसी निर्णय घ्याल. प्रतिष्ठा वाढेल. मात्र मनावर ताण घेऊ नका.


मकर:- सकाळी ११.१५ नंतर चंद्र तुमच्या राशीत येत असल्याने दिवसाचा उत्तरार्ध अनुकूल राहील. कामात उत्साह वाढेल. नवीन संधी मिळतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.


कुंभ:- लाभदायक दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.


मीन:- अनुकूल दिवस आहे. मोठी कामे पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. धैर्याने निर्णय घ्याल. आर्थिक लाभ होतील. वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.

Comments