आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६. 


२४ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर शुक्र आणि बुध ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्ही विलक्षण कर्तृत्ववान आणि कायदाप्रेमी आहात. तुम्हाला बुद्धिमान वर्तुळात वावरणे आवडते. तुमचे सामाजिक वजन चांगले असते. त्यामुळे तुमच्याकडे उच्च वर्तुळातील लोकांचे येणे - जाणे असते. तुम्हाला भिन्न लिंगी व्यक्तीकडून लाभ होतात. तुमचा भाग्योदय विवाहानंतर होतो आणि तुमचा विवाह श्रीमंत व्यक्तीशी होतो. वयाच्या ३३ व्या वर्षीपासून प्रगती होते. तुमचे वक्तृत्व चांगले असते. तुम्ही झटपट निर्णय घेतात. तुमचे विचार स्वतंत्र असतात. आपल्या आयुष्यात काहीतरी सनसनाटी घडावे असे तुमहाल सतत वाटत असते. मोठेपणा, प्रतिष्ठा मान सन्मान यास तुम्ही अधिक महत्व देतात. तुम्ही सतत कामात मग्न असतात. गूढ विषयांचे तुम्हाला आकर्षण असते. तुम्ही संशोधक वृत्तीचे, आशावादी, दिमाखदार आहात. तुम्हाला जुगार, कोडी, शेअर्स यांचा छंद असतो. तुम्ही एक बुद्धिमान कलाकार असतात. तुमच्या कलेचा तुम्ही व्यवसायिक दृष्ट्या पूर्ण वापर करतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असते आणि त्याचा उपयोग व्यवसायात होतो. तुमचा सहवास इतरांना सुखावतो. नीती आणि अनिती याबद्दलच्या तुमच्या कल्पना जरा वेगळ्या असतात त्यामुळे इतरांना त्या समजत नाहीत. तुम्ही जुन्या परंपरा पाळत नाहीत. स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल तुम्हाला पूर्ण विश्वास असतो. स्वतःचे निर्णय तुम्ही स्वतःच घेतात. तुमचे वक्तृत्व चांगले असते. जीवनात तुम्हाला अधिकार आणि मानसन्मान मिळतो. तुमचे आयुष्य आरामदायक आणि भौतिक सुखाने पूर्ण असते. उत्तम कपडे, सुगंधीत द्रव्य आणि महागड्या गाड्यांची तुम्हाला आवड असते. प्रेमात तुम्ही संशयी असतात.


व्यवसाय:- संगीतकार, दागिने विक्री, आर्किटेक्ट, बेकरी, हॉटेल मॅनेजमेंट, बँकिंग, मेडिकल स्टोअर्स, शेअर ब्रोकर, कमिशन एजंट, इस्टेट ब्रोकर.


शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार.


शुभ रंग:- निळा आणि गुलाबी.


शुभ रत्न:- पाच मोती आणि हिरा.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


गुरुवार, २४ सप्टेंबर २०२६. भाद्रपद शुक्ल त्रयोदशी. वर्षा ऋतू. पराभवनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी १.३० ते दुपारी ३.००


"आज शुभ दिवस आहे." *प्रदोष*


नक्षत्र - धनिष्ठा / सकाळी १०.३५ नंतर शततारका. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ.


धृती योग.


रवी ष चंद्र, चंद्र त्रिकोण शुक्र, चंद्र केंद्र हर्षल.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) कामाच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. मन उत्साही राहील. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. नवीन जबाबदारी स्वीकाराल.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) भाग्योदयाचा दिवस आहे. प्रयत्नांना यश मिळेल. प्रवास कार्यसाधक होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मेहनतीचे फळ मिळेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) संमिश्र दिवस आहे. ग्रहमान बऱ्यापैकी अनुकूल राहील. मन प्रसन्न राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. हरवलेली वस्तू सापडू शकते.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) नोकरी-व्यवसायात संमिश्र अनुभव येतील. सरकारी कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. जोडीदाराची मोलाची मदत मिळेल.


कन्या:- (टो, पा,पी,पू,षा, णा,ठा,पे,पो) आर्थिक लाभ होतील. प्रवास कार्यसाधक ठरतील. समाधानकारक प्रगती होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) पंचम चंद्रामुळे आनंददायी घटना घडतील. संततीकडून चांगली बातमी समजेल. गुंतवणुकीत लाभ होऊ शकतो. कला क्षेत्रात यश मिळेल.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) घरगुती कामात वेळ व्यतीत होईल. प्रिय व्यक्तीची मर्जी संपादन कराल. कौटुंबिक सौख्य लाभेल. पाण्याजवळील ठिकाणी प्रवासाचा योग येईल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आर्थिक बाजू मजबूत होईल. स्पर्धेत यश मिळेल. शत्रूंचा त्रास कमी होईल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आपली गुपिते कोणालाही सांगू नका.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) चांगला दिवस आहे. अनुकूल ग्रहमानामुळे भरघोस यश मिळेल. कामात प्रगती होईल. विनाकारण धाडस करू नका. प्रेमाच्या बाबतीत सावध राहा.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. चंद्राचा शुक्र व हर्षलशी शुभ संबंध असल्याने अत्यंत अनुकूल दिवस आहे. महत्त्वाची कामे मार्गी लावा. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. अकल्पित लाभ होऊ शकतात.



मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. कलाकारांना नवीन संधी मिळतील. सरकारी कामे मार्गी लागतील. आर्थिक व्यवहारात सावध राहा.


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments