आजचे राशीभविष्य
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६.
२५ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-
तुमच्यावर बुध आणि नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव हरहुन्नरी आहे. तुम्हाला प्रवासाची आवड आहे. दूर देशाशी तुमचा संबंध येतो. तुम्ही प्रामाणिक आणि विश्वासू आहात. तुमचा स्वभाव चंचल आहे. मात्र स्मरणशक्ती उत्तम आहे. तुम्हाला इतरांचे वर्चस्व सहन होत नाही. लेखन नी वक्तृत्व तुम्हाला आवडते आणि त्यात तुम्हाला यश देखील मिळते. तुम्ही फार काळ एखाद्या विषयात रमत नाहीत. तुमचा स्वभाव विनोदी असून तुम्ही मनाने उदार आहात. प्रकृती बाबत तुमची सतत कुरबुर चालू असते. वैवाहिक जीवनात काहीतरी न्यून जाणवत असते. वरून तुम्ही शांत दिसत असला तरी मनात सदैव खळबळ चालू असते. त्यामुळे अनेकदा थोडासा रागीटपणा वाढतो. इतरांची लुडबुड आणि ढवळाढवळ तुम्हाला सहन होत नाही. तुम्ही नम्र आणि विनायशील असून स्वतःच्या अधिकाराचा बडेजाव करत नाहीत. तुमच्या वागण्यामध्ये सावधगिरी असते. तुम्हाला विश्रांतीची गरज असते. कामाबाबत अभ्यासु वृत्ती आणि पद्धतशीर पणा असतो. रहस्य कथा आणि विनोदी चित्रपट तुम्हाला आवडतात. दुसऱ्याच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी असून बारीक-सारीक गोष्टी सुद्धा तुमच्या लक्षात राहतात. एकाच वेळी तुम्ही सामर्थ्य आणि कमकुवतपणा या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेतात. तुमचे ध्येय आणि महत्त्वाकांक्षा उच्च प्रतीच्या असतात. परंपरागत रुढी बद्दल तुम्हाला फारशी आत्मीयता नसते. मैदानी खेळ आणि प्रवास यांची आवड असते. स्वतःचे विचार इतरांना समजून सांगणे तुम्हाला आवडते. तुम्ही चटपटीत असून तुम्हाला आळशी पण आवडत नाही. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आणि विचार तर्कशुद्ध असतात. तुम्ही सर्वसाधारण लोकांमध्ये सहजासहजी मिसळत नाहीत. आवडत्या पुस्तकात तुम्ही तासंतास डोकं घालून बसतात. स्वतःचे ज्ञान आणि अधिकार यांची तुम्हाला पूर्ण जाणीव आहे. तुमची वृत्ती साशंक असते आणि खात्री झाल्याशिवाय तुम्ही कोणावर विश्वास ठेवत नाहीत. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. तुमच्यामध्ये धूर्त व्यापारी वृत्ती असते. तुम्ही तुमचा अहंकार जोपासतात. मनाने तुम्ही मोकळे असून कृतीत मुक्तपणा असावा असे तुम्हाला वाटते. तुम्ही अस्वस्थता निर्माण करणाऱ्या भावनांना आवर घातला पाहिजे कारण तुमच्याकडून इतरांना स्फूर्ती मिळते.
व्यवसाय:- दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, साबण, केमिकल्स, इलेक्ट्रॉनिक, वैद्यकीय क्षेत्र, आयात निर्यात, परदेशाशी संबंधित व्यवसाय.
शुभ दिवस:- रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार.
शुभ रंग:- पिवळा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पुष्कराज, पाचू, मोती आणि लसण्या.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६. भाद्रपद शुक्ल चतुर्दशी. वर्षा ऋतू, पराभवनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)
राहुकाळ - सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
"आज चांगला दिवस आहे." *अनंत चतुर्दशी*
चंद्रनक्षत्र - शततारका / सकाळी ११.२३ नंतर पूर्वा भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - कुंभ.
शूल योग.
रवी त्रिकोण प्लूटो.
टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) लाभ स्थानातील चंद्रामुळे खर्च कमी होतील. मात्र योग्य कारणांसाठी खर्च होईल. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. दूरचे प्रवास घडू शकतात.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) दशम स्थानी चंद्र असला तरी सर्व कामे मार्गी लागतील. नवीन वस्तूची खरेदी होईल. आशा-आकांक्षा पूर्ण होतील. आर्थिक लाभ मिळतील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाचे बदल संभवतात. बौद्धिक क्षमता वापरून अडचणींवर मात कराल. अधिकार वाढतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अनुकूल ग्रहमान आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. ज्येष्ठ व्यक्तींची पसंती लाभेल. दूरचे प्रवास घडतील. मान-सन्मान मिळेल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहा. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. कामानिमित्त भटकंती होईल.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा, णा,ठा,पे,पो) प्रवास घडतील. वक्तृत्व चमकेल. वाहनसुख लाभेल. प्रतिस्पर्धी डोके वर काढतील. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अर्थकारण सुधारेल. नवीन संधी प्राप्त होतील. प्रतिष्ठा टिकवण्यासाठी खर्च करावा लागू शकतो. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नवीन विद्या प्राप्त होतील. गूढ विषयांचे आकर्षण वाटेल. आर्थिक व्यवहारात सावध राहा. संततीची काळजी घ्या.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अधिकाराचा लाभ मिळेल. कनिष्ठ सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. घरगुती कामासाठी वेळ द्याल. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल ग्रहयोग सौख्य प्रदान करेल. छोटे प्रवास घडतील. ऐश्वर्य प्राप्त होईल. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचे सहकार्य मिळेल.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) तुमच्याच राशीत चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. चिंता कमी होतील. महत्त्वाचे करार पूर्ण होतील. नवीन संधी प्राप्त होतील.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. कामातील अडथळे दूर होतील. प्रवासाचे योग येतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल.
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521
- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments
Post a Comment