आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

शनिवार, २६ सप्टेंबर २०२६





 २६ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर शनि आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्हाला नीटनेटकेपणा, गृह सजावट, सौंदर्यप्रसाधने यांची आवड आहे. तुम्हाला मित्रमैत्रिणी आणि प्रवास प्रिय असतो. तुम्ही आर्थिक बाबतीत नशीबवान असतात. तुम्ही मोठमोठ्या योजना सहजपणे पार पाडू शकतात. तुमच्यात रसरशीत जिवंतपणा आणि उत्स्फूर्तपणा आहे.   तुमचे ध्येय आणि महत्वाकांक्षा उच्च प्रतीच्या आहेत. तुम्हाला चाकोरीबद्ध होणे आवडत नाही. तुम्ही शांतताप्रिय असून उत्कृष्ट संघटक आहात. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी आहे. तुम्ही स्वाभिमानी आहात. तुम्हाला गूढ विद्याची आवड आहे. तुमचा संशोधनाकडे ओढा असतो. तुमच्या जीवनात बऱ्याच वेळेला कोणतीही गोष्ट वेळच्यावेळी होत नाही. शिस्त, गांभीर्य, दृढपणा आणि कर्तव्याची जाण तुमच्यामध्ये आहे. तुम्ही अत्यंत विचारी आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुमचे विचार समतोल असून कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू बघण्याकडे तुमचा कल असतो. तुमच्याबद्दल इतरांचे बरेच गैरसमज होतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून सतत कामात मग्न राहणे तुम्हाला आवडते. तुम्ही धोरणी, हुशार, कार्यशील आणि दुर्बल लोकांबद्दल आदर दाखवणारे आहात. तुम्हाला निसर्ग सौंदर्य, फुले आणि संगीत यांची आवड असते. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न आहे. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात आणि इतरांकडून काम करून घेणे तुम्हाला चांगले जमते. तुम्ही न्यायप्रिय आहात मात्र तुम्हाला अनेकदा नैराश्य जाणवते आणि जीवनामध्ये एकाकी वाटते. तुमच्यामध्ये अधिकार, वचक आणि जोम या गोष्टी भरपूर आहेत. व्यवहारातील सर्व गोष्टी सुलभ पणे हाताळण्यात तुम्हाला यश येते. आर्थिक बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक नियोजन करतात, इतरांना तुमची मदत होते कारण इतरांचे दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. आपण जीवनात अधिकार गाजवावे असे तुम्हाला कायम वाटते. तुम्ही दिर्घउद्योगी आहात. लोकांची नावे आणि चेहरे लक्षात ठेवण्यात तुम्ही तरबेज असतात. तुम्हाला तुमच्या पद्धतीने काम केल्यास यश मिळते पण त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे आणि जोरदार प्रयत्न केले पाहिजेत. तुमच्यात चंचलपणा आणि अस्वस्थता आहे. तुमच्या प्रेम प्रकरणात समस्या निर्माण होऊ शकतात. भिन्न लिंगी व्यक्तींबद्दल तुम्ही आक्रमक पवित्रा घेतात.


व्यवसाय:-  भौतिक, रसायन, वैद्यकीय शास्त्र, गणित, पतपेढी व्यवस्थापक, पॅथॉलॉजी, जिथे तर्कनिष्ठता आणि बुद्धी लागते असे क्षेत्र तसेच वकिली.


शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शनिवार.


शुभ रंग:- निळा, जांभळा, हिरवा, राखाडी.


शुभ रत्न:- इंद्रनील, पाचू लसण्या, अमेथीस्ट.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


शनिवार, २६ सप्टेंबर २०२६. भाद्रपद शुक्ल पौर्णिमा. वर्षा ऋतू, पराभवनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०


"आज सकाळी ११.०० नंतर चांगला दिवस आहे."


*प्रोष्ठपदी पौर्णिमा. भागवत सप्ताह समाप्ती.*


नक्षत्र - पूर्वा भाद्रपदा / सकाळी ११.३२ नंतर उत्तरा भाद्रपदा. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन. (गंड योग, विष्टी करण)


रवी प्रतियुती चंद्र, रवी प्रतियुती नेपच्यून, चंद्र त्रिकोण मंगल, चंद्र केंद्र लाभ हर्षल, चंद्र युती नेपच्यून.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या "राशीभाव" या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) व्यय स्थानी चंद्र आहे. संमिश्र दिवस आहे. मन प्रसन्न राहील. खरेदीचे योग आहेत. आर्थिक लाभ होतील. महिलांना अलंकार व आभूषणांची खरेदी करता येईल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. महत्त्वाची कामे पूर्ण करा. व्यवसायात प्रगती होईल. कलाकारांना यश मिळेल. नवीन संधी प्राप्त होतील.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल ग्रहमान आहे. कामे मनासारखी होतील. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. खर्च वाढला तरी आनंददायी घटना घडतील.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) अत्यंत अनुकूल दिवस आहे. शुभ ग्रहमानाचा लाभ मिळेल. स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करा. नवीन संधीचे सोने करा. मान-सन्मान मिळेल.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) संमिश्र दिवस आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांना सहकार्य कराल. सरकारी कामांना गती मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.


कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) उत्तम ग्रहमान आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तीर्थयात्रेचा योग येईल. सरकारी कामे मार्गी लागतील. वाहनसुख लाभेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल दिवस आहे. काही सुखद घटना घडतील. आर्थिक स्थिती सुधारेल. भेटवस्तू मिळतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) उत्तम दिवस आहे. सर्वच क्षेत्रात प्रगती अनुभवायला येईल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) संमिश्र दिवस आहे. काही चांगले अनुभव येतील. हरवलेली वस्तू सापडू शकते. घरगुती कामे पूर्ण होतील. कुटुंबासोबत वेळ घालवाल.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. अर्थप्राप्ती होईल. व्यवसायात यश मिळेल. संततीकडून चांगली बातमी समजेल. नवीन संधी मिळतील.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. त्यातून लाभ होतील. वाहनसुख लाभेल. कौटुंबिक सौख्य मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.


मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सकाळी ११.०० नंतर दिवस अनुकूल आहे. तुमच्याच राशीत चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. मित्रांची साथ मिळेल. आध्यात्मिक कार्यात मन रमेल.


* - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments