आजचे राशीभविष्य

आजचे राशीभविष्य 

रविवार, २७ सप्टेंबर २०२६.






 २७ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर मंगळ आणि बुध या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा असतो. तुम्ही अत्यंत भावनाशील आणि संवेदनशील आहात. इतरांना तुमच्या स्वभावाचा नेमका अंदाज येत नाही. तुम्हाला न्याय आणि त्याग या भावनांबद्दल विलक्षण आदर असतो. त्यासाठी तुम्ही स्वतःच्या खिशातून खर्च करण्यास देखील तयार असतात. तुम्ही सभ्य आणि प्रामाणिक आहात. कोणतीही जबाबदारी घेतली तरी त्यात तुम्हाला यश मिळते. स्वातंत्र्य, वक्तृत्व, मोठेपणा, मानिपणा, प्रतिष्ठा, हरहुन्नरी स्वभाव ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. स्वतः सतत अभ्यास करणे आणि इतरांना त्यासाठी प्रवृत्त करणे तुम्हाला आवडते. तुम्ही एक उत्तम शिक्षक असू शकतात. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळते. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. तुम्ही आक्रमक, धाडसी आणि तडफदार आहात. लढाऊ वृत्तीचे आहात. तुम्ही विनाकारण इतरांची कुरापत काढतात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून आपल्या विषयाची संपूर्ण माहिती तुम्हाला असते. स्वतःच्या कर्तृत्वावर तुमचा विश्वास असतो आणि ध्येयपूर्ती झाल्याशिवाय तुम्ही थांबत नाहीत. अनेकदा तुम्ही उतावळेपणाने नवीन नवीन योजनांमध्ये प्रवेश करतात. संभाषण कलेत तुम्ही प्रवीण आहात. तुम्हाला जीवनामध्ये अधिकार आणि मानसन्मान मिळतो. अनेकदा तुमची चूक तुम्ही मान्य करत नाहीत. तुम्हाला मैदानी खेळ आणि शक्तिशाली व्यायामाची आवड असते. तुम्हाला गरिबांवर दया करण्यात एक आनंद मिळतो. आजारी लोकांना तुम्ही स्वतःच्या इच्छाशक्तीने बरे करू शकतात. तुम्ही तापट आहात मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतात. तुमचे विचार ठाम असतात आणि त्यात नैतिकता असते. तुम्हाला तुमचे कुटुंब प्रिय असते आणि कायद्याचे पालन करणे आवडते. तुम्ही अत्यंत विश्वासू आहात आणि जबाबदारीच्या जागा सांभाळू शकतात. तुम्ही पोकळ दिमाख, गर्व, अहंकार, खोटा अभिमान टाळला पाहिजे तसेच इतरांवर टीका करताना शब्द काळजीपूर्वक वापरावेत. तुमच्या आयुष्यावर तुमच्या जीवनातील वैवाहिक समस्यांचा परिणाम दिसून येऊ शकतो. तुमचे व्यक्तिमत्व विरोधाभासी आहे. भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल तुम्हाला जबर आकर्षण असते. अंतर तुम्ही त्याबाबतीत नियंत्रण ठेवले पाहिजे. काही वेळेस तुम्ही हट्टी पणा करतात. तुमचा स्वभाव घमेंड करण्याचा असू शकतो. ते टाळले पाहिजे.  


व्यवसाय:-  राजकीय क्षेत्र, डॉक्टर, केमिस्ट, लोखंडाशी संबंधित व्यवसाय, इंजीनियरिंग, खाण, बांधकाम, पुढारी.


शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार.


शुभ रंग:- तांबडा, हिरवा आणि पिवळा.


शुभ रत्न:- पुष्कराज, मोती, माणिक.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


रविवार, २७ सप्टेंबर २०२६. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा. वर्षा ऋतू. पराभवनाम संवत्सर. राशिभविष्य - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. (संपर्क - 8087520521)


राहुकाळ - दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.००


"आज चांगला दिवस आहे."


महालय प्रारंभ. वृद्धी योग.


नक्षत्र - उत्तरा भाद्रपदा / सकाळी ११.०८ नंतर रेवती. आज जन्मलेल्या बाळाची राशी - मीन.


चंद्र त्रिकोण गुरू, चंद्र युती शनी.


टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या.


मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. मन प्रसन्न राहील. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.


वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) आध्यात्मिक कार्यात मन रमेल. दानधर्म कराल. खर्च वाढू शकतो. आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. आत्मविश्वास कायम ठेवा.


मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) लाभदायक दिवस आहे. मन उत्साही राहील. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. अडथळे दूर होतील. मित्रांकडून सहकार्य मिळेल.


कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) आज अधिक काम करावे लागेल. नोकरीच्या ठिकाणी चांगले अनुभव येतील. ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. कामात प्रगती होईल.


सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) कामानिमित्त प्रवास घडू शकतो. मन प्रसन्न राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तीर्थयात्रेचा योग येईल. आर्थिक लाभ होतील.


कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र दिवस आहे. अपेक्षित यशासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीची काळजी घ्या. संयमाने निर्णय घ्या.


तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) सप्तम स्थानी चंद्र आहे. बरेच दिवस वाट पाहत असलेली व्यावसायिक संधी चालून येईल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. महत्त्वाचे करार होऊ शकतात.


वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक लाभ होतील. नवीन संधी मिळतील. नोकरीच्या इच्छुकांना चांगली बातमी मिळू शकते. मेहनत वाढवावी लागेल.


धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) पंचम चंद्रामुळे प्रेरणा मिळेल. नवीन ज्ञान प्राप्त होईल. गूढ विषयांमध्ये रस वाढेल. नातेवाईकांची भेट होईल. संततीकडून आनंदाची बातमी मिळेल.


मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) राहत्या जागेजवळ भाग्योदय होईल. शेती किंवा स्थावर मालमत्तेतून लाभ होऊ शकतो. नवीन ओळखी होतील. राजकीय क्षेत्रात यश मिळेल.


कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) लाभदायक दिवस आहे. पराक्रम गाजवाल. भावंडांची भेट होईल. नातेसंबंधातून लाभ मिळतील. रखडलेली कामे मार्गी लागतील.


मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) तुमच्याच राशीत चंद्र आहे. चंद्राचा गुरूशी शुभ त्रिकोण असल्याने आत्मविश्वास वाढेल. धनप्राप्ती होईल. आध्यात्मिक लाभ होतील. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा.


- ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Comments