सीएकेचे आठ विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादी, ही यशाची परंपरा कायम राहावी - बी जी बोराडे

 सीएकेचे आठ विद्यार्थी शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादी, ही यशाची परंपरा कायम राहावी  -  बी जी बोराडे      



          कोल्हापूर ०५ सिटी न्यूज नेटवर्क 

पश्चिम महाराष्ट्रात श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ने आपले एक स्थान निर्माण केली आहे नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात  आठ विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिल्या दहामध्ये येण्याचा मान मिळविलाआहे भविष्यात ही यशाची परंपरा कायम ठेवावी अशा शब्दात संस्थेचे अध्यक्ष डीजी बोराडे यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या . या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच शिवाजी पेठेतील संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते .                 प्रारंभी सर्वांचे स्वागत करत प्राचार्य सी .एस. दुदगीकर यांनी या दशामध्ये विशेष संस्थेचे पदाधिकारी वर्गाचे प्रोत्साहन प्राध्यापक वर्गाचे सातत्याने  मार्गदर्शन आणि विद्यार्थी वर्गाचे अखंड श्रम  या सर्वांचे योगदान असल्याचे नमूद केले . शिवाजी विद्यापीठाच्या माहे एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदवी परीक्षेचा निकाल जाहिर झाला. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत रिध्दी प्रताप जाधव (पहिला), समृध्दी संदिप पोवार (दुसरा), ओंकार विनोद जाधव (तिसरा), पृथ्वीराज धिरज जाधव (चौथा), उध्दव उमेश साळोखे (पाचवा), सिध्दी सचिन महाजन (आठवा), अमृता रविंद्र शिंदे (नऊवा), आदित्य अशोक खाडे (दहावा) यांनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले तसेच इतर विद्यार्थी प्रथम श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण झाले.  यावेळी संस्थेचे  चेअरमन डॉ. के. जी. पाटील, व्हाईस चेअरमन मा. श्री. डी. जी. किल्लेदार, कॉलेजचे प्राचार्य आर्कि. सी. एस. दुदगीकर तसेच सर्व संचालक, पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सत्कार समारंभानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रसिध्द आर्किटेक्ट टी. डी. गाडगीळ यांचे व्याख्यान संपन्न झाले त्यांनी आपल्या व्याख्यानातून स्थापत्य विश्वातील बदलते प्रवाह आणि आगामी काळातील आव्हाने , ए आय तंत्रज्ञानाचा पूरक त्यांनी वापर अशा विविध पैलूंनी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांचे शंका समाधान ही   केले .

Comments