आजचे राशीभविष्य

 आजचे राशीभविष्य 

मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६




२९ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-


     तुमच्यावर चंद्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमचा स्वभाव अभ्यासू असून इतरांना शिकवणे आवडते. तुमचे व्यझक्तिमत्व विरोधाभासी असते. इतरांना मदत करताना कधीकधी घाईने निर्णय घेतले जातात. प्रेमात रूढी मोडतात. तुम्ही जीवनात सावधगिरीने वागतात. उच्च पदस्थ व्यक्तींकडून तुम्हाला मदत मिळते. तुमचा भाग्योदय पाणथळ जागी होतो. मित्र परिवार मोठा असतो. विवाहानंतर भाग्योदय होतो. वैचारिक लेखनाची आवड असते. भोवतो ढोंगी मित्रांचे जाळे असते. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये तुम्ही लोकप्रिय असतात. जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी तुमचा भावनिक दृष्टीकोन असतो. वक्तृत्व आणि शब्दभांडार चांगले असते. आत्मविश्वास असू दुबळ्या लोकांना मदत करणे आवडते. तुम्ही ध्येयवादी आहात आणि तुमच्या मध्ये प्रचंड कल्पनाशक्ती आहे. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुम्ही अतिशय हळवे असून लवकर अस्वस्थ होतात. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही प्रत्यक्षात रूपांतर करू शकतात. तुम्हाला जुगार किंवा कोडे सोडवण्याचा छंद असतो. तुम्ही कष्टाळू पाहणी शांत असतात मात्र तडजोड करत नाहीत. विनाकारण काळजी करण्याचा स्वभाव असून मन कष्टी असते. भाषणे, लेखन आणि श्रुतिका लिहिणे तुम्हा आवडते. तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुम्हाला मानसन्मान मनापासून आवडतात. तुम्ही समाजामध्ये मिसळतात. कोणत्याही गोष्टीतील नावीन्य आणि प्रवासाची तुम्हाला आवड आहे. तुम्ही हुशार आहात आणि शास्त्राची आवड आहे. तुमचा सहवास इतरांना उत्साहवर्धक वाटतो. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला बरे आणि वाईट नीटपणे समजते. नवनवीन कल्पना आणि भरपूर उत्साह यांचा संगम झाल्याने तुम्ही मोठमोठ्या प्रकल्पात काम करू शकतात. तुम्हाला स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. तुमचा स्वभाव विनम्र असून तुम्ही कायदा प्रेमी आहात. तुम्ही अधिक वयस्कर माणसांकडे आकर्षित होतात.


व्यवसाय:- लेखक, वक्ता, पुढारी, डॉक्टर, केमिस्ट, बँकिंग, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव.


शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.


शुभ रंग:- पांढरा, निळा, पिवळा.


शुभ रत्न:- मोती आणि हिरा.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)


*व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या*


*कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. - ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521*


 मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६. भाद्रपद कृष्ण तृतीया/ (संध्याकाळी ५.११ नंतर) चतुर्थी. पराभव नाम संवत्सर. शके १९४८. वर्षा ऋतू.

नक्षत्र - अश्विनी / सकाळी ९.०४ नंतर भरणी. राशी - मेष.


हर्षल योग, विष्टी करण. *अंगारक चतुर्थी* ( चंद्रोदय मुंबई - ८.१३, नाशिक - ८.०७, पुणे ८.१०)


"संध्याकाळी ५.०० नंतर चांगला दिवस आहे."


चंद्र केंद्र गुरू, चंद्र प्रतियुती शुक्र.


मेष:- संमिश्र दिवस आहे. कामात उत्साह राहील. आर्थिक व्यवहारात लाभ होऊ शकतो. मात्र घाईघाईने निर्णय घेणे टाळावे.


वृषभ:- दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील. आर्थिक लाभ होतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.


मिथुन:- अनुकूल दिवस आहे. नवीन संधी मिळतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल.


कर्क:- संमिश्र दिवस आहे. कामात यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. कौटुंबिक बाबतीत संयम ठेवावा.


सिंह:- दिवस चांगला आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते.


कन्या:- अनुकूल दिवस आहे. आर्थिक व्यवहारातून फायदा होईल. कामात प्रगती होईल. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल.


तुळ:- दिवस चांगला आहे. मन प्रसन्न राहील. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल.


वृश्चिक:- अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होतील. कामात प्रगती होईल. मात्र खर्चाचे प्रमाण वाढू शकते.


धनु:- लाभदायक दिवस आहे. नवीन ओळखी होतील. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल उचलावे.


मकर:- दिवस चांगला आहे. कामात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील एखादी शुभवार्ता आनंद देऊ शकते.


कुंभ:- संमिश्र दिवस आहे. कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.


मीन:- अनुकूल दिवस आहे. मोठी कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन कामे करण्याची उमेद राहील.


-ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.

Comments