गणेशोत्सव काळात शहराचा पाणीपुरवठा अखंडित व नेहमी ठेवावा -- शिवसेनेची मागणी*

गणेशोत्सव काळात शहराचा पाणीपुरवठा अखंडित व नेहमी ठेवावा -- शिवसेनेची मागणी



कोल्हापूर ०९ सिटी न्यूज नेटवर्क 

 गणेशोत्सव हा प्रमुख सण असून राज्य शासनाने सुद्धा याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे या काळात कोल्हापूर महापालिकेचा मागील कारभार पाहता दर दोन दिवसात कोणत्यान कोणत्या दिवशी  वीज पुरवठ्यासाठी किंवा दुरुस्ती सह अन्य कारणाने सतत पाणीपुरवठा बंद असतो तरी गणेशोत्सव काळात कोणत्याही परिस्थितीत आमच्या माता भगिनींना रस्त्यावर यावं लागू नये तसेच या काळात पाणीपुरवठा ची वसुली देखील महापालिका प्रशासनाने करू नये .



गणेशोत्सव काळात पाणीपुरवठा अखंडित व नेहमी ठेवावा  अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महापौर रूपा राणी निकम यांना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे परिवहन सदस्य रोहन अतिग्रे अमर क्षीरसागर  सुरज धनवडे अनंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले यावेळी महापौर रूपाने निकम यांनी तशा सूचना प्रशासनाला देऊ असे सांगितले.

Comments