बँक ऑफ इंडिया लक्ष्मीपुरी शाखेचा १२१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर ०७ सिटी न्यूज नेटवर्क
लक्ष्मीपुरी येथील बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती शाखेतर्फे १२१ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाचे औचित्य साधून लक्ष्मीपुरी शाखेत सुंदर रांगोळी व नेत्रदीपक सजावट करण्यात आली होती.
कार्यक्रमाची सुरुवात बँकेचे डेप्युटी झोनल मॅनेजर हितेंद्र श्रीवास्तव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी डेप्युटी झोनल मॅनेजर स्नेहा हलियाळ, मा. डेप्युटी झोनल मॅनेजर श्री. विशाल कुमार सिंह सर मा. डेप्युटी झोनल मॅनेजर (रिकव्हरी) सौ. स्नेहा हळ्याळ मॅडम मा. माजी जनरल मॅनेजर श्री. विजय परळीकर सर
बँकेचे डी वाय झोनल मॅनेजर श्रीमान हितेंद्र श्रीवास्तव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले डी वाय स्नेहा हळीयाळ माजी जनरल मॅनेजर विजय परळीकर ऑफिसर असोसिएशन झोनल सेक्रेटरी सुशांत मुळीक ऑफिसर बेरियर्स ऑफ स्टाफ युनियन अँड SC ST वेल्फेअर असोसिएशन
सर्व माजी निवृत्त कर्मचारी आणि सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया चे कर्मचारी वृंद उपस्थित होते यावेळी सर्व शाखेच्यावतीने केक कापण्याचा व बँकेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा सुंदर नियोजनबद्ध कार्यक्रम घेण्यात आला तसेच वर्धापन दिनानिमित्त
सर्व मान्यवर ग्राहक ऑफिसर्स असोसिएशनचे झोनल सेक्रेटरी श्री. सुशांत मुळीक स्टाफ युनियन संदीप भोरडे वरिष्ठ प्रभंधक मानव संसाधन विभाग सुमित बोबडे मुख्य प्रभंधक मार्केटिंग विभाग तसेच एस.सी.-एस.टी. वेल्फेअर असोसिएशनचे सर्व पदाधिकारीकोल्हापूर येथे वास्तव्यास असलेले सर्व निवृत्त कर्मचारी बांधव आणि आपल्या बँक ऑफ इंडियाच्या परिवारातील सर्व अधिकारी व कर्मचारीवृंद उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त सर्व उपस्थितांच्या उपस्थितीत केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला बँकेचे सर्व माजी निवृत्त कर्मचारी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील बँक ऑफ इंडियाचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या वेळी उत्कृष्ट सेवेबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत वर्धापन दिनानिमित्त 'आरोग्यम पॅथॉलॉजी'च्या सौजन्याने बँकेतर्फे अत्यंत अल्प दरात 'सर्व सर्वसमावेशक रक्त तपासणी शिबिर' (Blood Test Camp) आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्राहक व कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत नेटके व सुंदर पद्धतीने करण्यात आले होते.

Comments
Post a Comment