मनपा रावबहादूर विचारे विद्यालयाच्या नूतन इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन
कोल्हापूर 09 सिटी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सानेगुरुजी वसाहत येथील मनपा रावबहादूर विचारे विद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नामदार एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्ष, कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते तथा माजी स्थायी समिती सभापती शारंगधर वसंतराव देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाकडून रावबहादूर विचारे विद्यालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून साकारलेल्या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन उपमहापौर अक्षय जरग यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी महिला व बालकल्याण समितीचे सभापती कौसर बागवान, प्रभाग समितीच्या सभापती अनुराधा खेडकर, पाणीपुरवठा समितीच्या सभापती संगीता सावंत, तसेच प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापती शिला सोनुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महानगरपालिकेचे नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, रत्नेश शिरोळकर, विजय उर्फ रिंकू देसाई, अभिजीत खतकर, सामजिक कार्यकर्ते तात्या खेडकर, किरण पाटील , दीपक बराले आदी तसेच विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
नूतन इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून विद्यालयाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे निमंत्रक शारंगधर वसंतराव देशमुख यांनी नूतन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच शाळेची प्रगती कशी झाली आणि या भागातील चांगली पटसंख्या असलेली एक आदर्श शाळा बनली आहे. शाळेच्या विकासासाठी भविष्यातही आवश्यक ते सहकार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केली.
यावेळी भागातील नागरिक आणि पालकवर्ग मोठ्या प्रमाणात हजर होता.

Comments
Post a Comment