शिवप्राण क्रिएशनच्या हस्तनिर्मित कलावस्तूंच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 शिवप्राण क्रिएशनच्या हस्तनिर्मित कलावस्तूंच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद



कोल्हापूर ०६ सिटी न्यूज नेटवर्क 

कलात्मक हस्त वस्तु निर्मिती कलाकार व दंतवैद्य डॉ. अक्षरा महेश्वर शितोळे यांच्या संकल्पनेतून व निर्मितीतून साकारलेल्या ‘शिवप्राण क्रिएशन’च्या हस्तनिर्मित कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन राजाराम १ गल्ली येथील शितोळे हॉस्पिटल हॉलमध्ये सुरू आहे. या प्रदर्शनाला कलाप्रेमी, महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  डॉक्टर अश्विनी आरगडे यांनी याचे उद्घाटन केले 



या प्रदर्शनामध्ये घराच्या सजावटीपासून धार्मिक व सणासुदीच्या वापरासाठी उपयुक्त अशा विविध कलात्मक वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये रेडिमेड मॅट रांगोळी, गौरीचे मुखवटे व पावले, मोत्यांची तोरणे, पाईप क्लिनरपासून तयार केलेली आकर्षक फुले व हार, हळद-कुंकू करंड, अन्नपूर्णा देवीचे कमळ आसन आदी हस्तनिर्मित वस्तूंचा समावेश आहे.



पारंपरिक कलाकुसरीला आधुनिक सजावटीची जोड देत तयार करण्यात आलेल्या या वस्तू प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरत आहेत. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने महिला व नागरिकांकडून खरेदीसाठी विशेष पसंती दिली जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या सौ . चित्रा  शिवाजीराव कवाळे ,वैशाली कांबळे सह मान्यवरांनी या प्रदर्शनात भेट देऊन त्यांचे कौतुक केले .

‘शिवप्राण क्रिएशन’च्या माध्यमातून आपला वैधकीय पेशा जपत हस्तकला  कलात्मक वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न डॉ. अक्षरा शितोळे यांनी केला आहे.

Comments