अनेक अडचणीतून विद्यार्थी घडविण्याचे काम इंग्रजी शाळेतील शिक्षकांकडून : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर २५ सिटी न्यूज नेटवर्क
इंग्रजी शाळांना कोणत्याही पद्धतीचे शासनाचे अनुदान नसते तरीही या शाळा विद्यार्थी घडविण्याचे काम करतात या शाळेतील शिक्षक अहोरात्र झटून या मुलांना ज्ञान देतात त्यांच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहीन अशी ग्वाही कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजिंक आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांनी दिली.इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (EMSA) यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय, प्रेरणादायी व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांचा गौरव करण्यासाठी "EMSA INSPIRE 2026- Maharashtra State-Level Celebration of Educational Excellence" हा राज्यस्तरीय शिक्षक सन्मान व पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी माननीय प्रकाश आबिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना आबिटकर यांनी शिक्षकांना उद्देशून बोलताना आपण विद्यार्थ्यांना घडवितो मात्र हे घडवत असताना स्वतःवरचा विश्वासही वाढवण्याचे काम सर्वांनी करणे आवश्यक असल्याची अपेक्षा व्यक्त केली व मी नेहमीच सगळ्यांचा सहकारी म्हणून सगळ्यांसमोर उभा राहील अशी ग्वाही दिली. इतर शाळांना अनुदान मिळते मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान मिळत नाही शासनाने त्यांच्यासाठी काही योजना केलेला नाहीत मात्र तरीही हे शिक्षक विद्यार्थी घडविण्याचे काम करत आहेत त्यांच्यासारखाच मीही असून तुमच्या व्यथा मला माहित आहेत त्यामुळे मी तुमच्या नेहमी सोबत असेन असे सांगितले.
यावेळी बोलताना अध्यक्ष के.डी. पाटील यांनी शिक्षकांना त्यांच्या कामाची पावती मिळावी त्यांना त्यांचे काम आणि प्रामाणिकपणा याबाबत मान सन्मान व्हावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिक्षकांच्या पाठीशी असोसिएशन नेहमीच उभे राहील असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना महेश पोळ यांनी खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची इमारत उभी करण्याचे काम इंग्रजी शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापक करत आहेत या सर्व शिक्षकांनी भरपूर असे अधिकारी घडविले आहेत असे सांगितले.बाळासाहेब राऊत यांनी सर्व शिक्षकांच्या कामाचे कौतुक करून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी विवेकानंद कॉलेजचे कौस्तुभ गावडे यांनी व्हिडिओद्वारे शिक्षकांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना त्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षक यांनी आतापर्यंत अनेक अधिकारी डॉक्टर इंजिनिअर विद्यार्थी घडविले आहेत आणि यापुढेही ते घडवीत राहतील यासाठी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गणेश नायकुडे यांनी शिक्षकांना पुरस्कार दिला ही त्यांच्या पाठीवरची कौतुकाची थाप जरी असली तरी त्यांची जबाबदारी यापुढे वाढली असल्याचे सांगितले.यावेळी आभार सुहेल बानदार यांनी मानले. सूत्रसंचालन गायत्री कुलकर्णी आणि शशिकांत मुद्दापुरे यांनी मानले.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर एन. एन. काझी, नितीन पाटील, सचिन नाईक, सुहेल बांधार, विल्सन वास्कर, दत्तात्रय रणदिवे, अमर सरनाईक, संजय जाधव आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment