वर्षा नगरमध्ये धोकादायक झाडांच्या फांद्या हटवल्या
कोल्हापूर ०४ सिटी न्यूज नेटवर्क
वर्षा नगर मित्र मंडळ परिसरात धोकादायक स्थितीत असलेल्या तसेच गणपती उत्सवाच्या काळात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून हटविण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते इस्माईल बागवान यांनी पुढाकार घेत हा उपक्रम राबविला.
परिसरातील काही झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकलेल्या असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती व मिरवणुकीच्या वाहतुकीलाही अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन इस्माईल बागवान यांनी पुढाकार घेत संबंधित फांद्या तोडून घेतल्या.
या कामामुळे परिसरातील नागरिकांची सुरक्षितता वाढण्याबरोबरच गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची ये-जा आणि वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल इस्माईल बागवान यांच्या सामाजिक कार्याचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. वर्षा नगर मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



Comments
Post a Comment